कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका आहाराच्या सहायाने कमी होऊ शकेल का?

Will dietory changes reduce the risk of colorectal cancer

जगात आढळणार्‍या कॅन्सरपैकी कोलोरेक्टल कॅन्सर हा तिसरा क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. फक्त 1.4 दशलक्ष कोलोरेक्टल कॅन्सरची प्रकरणे एकट्या 2012 साली निदान करण्यात आली होती. आत्ताच्या परिस्थितीवरून असा निष्कर्ष काढला जातोय की 2035 सालापर्यंत 2.4 दशलक्ष प्रकरणे प्रतिवर्षी कोलोरेक्टल कॅन्सर चे निदान केली जातील. 1.08 दशलक्ष स्त्रियांमध्ये व 1.36 दशलक्ष पुरुषांमध्ये हे प्रमाण जास्त झालेले आढळेल.

व्यक्तीच्या आहारावर त्या व्यक्तीला कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका निर्माण होईल का नाही हे अवलंबून असते. साहित्य पुनरावलोकनानुसार शाकाहारी भोजन कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात तर जास्त प्रथिने व जास्त फॅटयुक्त आहार ह्या कॅन्सरचा धोका वाढवतात. तसेच आशा प्रकारचा आहाराचे सेवन तुम्ही किती काळ केले ह्यावर ही कॅन्सरचा धोका अवलंबून असतो.

image-2कॅलिफोर्नियातील Loma Linda विद्यापीठात 70,000 लोकांच्या खाण्याच्या सवयीचं विशलेषण केले. ह्या लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका आहे का नाही आणि असल्यास तो किती आहे हे तपासण्यासाठी शाकाहारी भोजन घेणार्‍या व्यक्तींची तुलना मांसाहार घेणार्‍या व्यक्तीबरोबर केली असता शाकाहारी भोजन घेणार्‍या व्यक्तींमध्ये 22% कॅन्सरचा धोका कमी झालेला आढळला जेव्हा ह्याच व्यक्तींची तुलना मासे खाणार्‍या व्हेजिटेरिअन लोकांबरोबर केली असता हा धोका 43%पर्यंत कमी झालेला आढळला. मासे व इतर सीफूड घेणार्‍या व्हेजिटेरिअन लोकांच्या आहाराला pesco-vegetarian डाएट असे संबोधले जाते. वरील शोधप्रबंधाची माहिती JAMA Internal medicine ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

The Adventist Health Study 2 (AHS_2) हया प्रयोगात 96354 लोकांचा सहभाग होता. ह्या सर्व व्यक्तींचा पाठपुरावा 7.3 वर्ष केला असता 380 व्यक्तींना Colon cancer व 110 व्यक्तिंना rectal कॅन्सरचा धोका निर्माण झालेला आढळला तसेच शाकाहार घेणार्‍या व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमीच आढळला. जेव्हा मांसाहार विरूद्ध Pesco-vegetarian आहाराशी तुलना केली असता Pesco-vegetarian आहार घेणार्‍या व्यक्तींमध्ये तो धोका कमी झालेला आढळला. हा शोधप्रबंध JAMA Intern.Medicine 2015; 175 (5):767 – 776 ह्या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

शाकाहार कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका का कमी करताना दिसतात?
Insulin and insulin like growth factor कोलोरेक्टल कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात असे निदर्शनास आले आहे आणि शाकाहारी जेवणामुळे    ह्या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण येते आणि म्हणूनच वेस्टर्न आहाराच्या तुलनेत शाकाहारी जेवणामुळे हा त्रास कमी होत असेल.

• फोलेट, कॅल्शियम, फायबर ह्या सारखे महत्वपूर्ण अन्नघटक जे कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत करतात ते शाकाहारी पदार्थातून मिळतात.

• बर्‍याचदा ज्या पद्धतीने मटण, रेडमीट शिजवले जाते त्यामुळेही कॅन्सरचा धोका वाढतो असे प्रयोगात आढळले आहे, आणि हेच मटण प्रक्रिया केलेले असेल तर हा धोका दुप्पटीने वाढताना दिसतो.

कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो?
कॅन्सरचा धोका किती कालावधीत बदलू शकतो ह्यावर US – BRITISH ह्यांच्या एकत्रित संशोधनात फक्त 2 आठवड्यातच खाण्या पिण्याच्या सवयी बदलीचा कॅन्सरच्या धोक्यावर परिणाम झालेला आढळला.

Imperial College London आणि The University of Pittsburgh ह्या मधील शास्त्रज्ञांनी 20 अफ्रिकन अमेरिकन आणि 20 ग्रामीण साउथ अफ्रिका भागांतील लोकांची प्रयोगासाठी निवड केली. ह्या दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या प्रयोग शाळेत ठेवले. ह्या दोन्ही गटातील लोकांच्या जेवणात वापरण्यात येणारे जिन्नस व त्याची पदार्थ शिजवण्याची पद्धत वापरून त्यांच्या साठी विशेष जेवणाची निर्मिती केली आणि ते पदार्थ त्यांना खाण्यास दिले. African American लोकांना rural African लोकांचा आहार खाण्यास दिला व rural African लोकांना African American लोकांचा आहार खाण्यास दिला. Rural African लोकांना जेव्हा पाश्चात्य पद्धतीचा आहार दिला गेला तर African American लोकांना जास्त फायबर असलेला ज्यात बीन्स डाळी कडधान्य असलेला आहार खाण्यास दिला.

प्रयोग सुरु होण्याआधी व नंतर colonoscopy, bacterial samples आणि कॅन्सरशी निगडित असलेले बाकीचे इतर महत्वाचे biomarkers ह्यांचा तपास केला. ह्या तपासात सुरवातीला असे दिसले की अर्ध्या अधिक अमेरिकन व्यक्ती मधे पॉलीप्स (polyp) दिसून आले ज्यामुळे पुढे जाऊन कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता बळावते. परंतु एकाही अफ्रीकन व्यक्ति मध्ये हा धोका आढळला नाही पण ज्यावेळेस जेवणात अदलाबदल केली तेव्हा मात्र अमेरिकन व्यक्ती मधे अंतर्गत सूजेचे पातळी कमी आणि इतर biomarkers मध्ये लक्षणीय रित्या घट झालेली आढळली आणि अफ्रीकन गटात कॅन्सरचा धोका नाट्यमय रित्या वाढलेला आढळला.

image-3ह्या वरून असे स्पष्ट होते की कमी दिवसातच आहारातील बदल कॅन्सरचा धोका वाढवतो आणि म्हणूनच केव्हाही अगदी ह्या क्षणापासूनही बदल केल्यास तुमचा कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. प्रयोगात असे दिसून आले आहे कि कॅन्सरचा धोका लवकरात लवकर निदर्शनास आल्यास कोलोरेक्टल कॅन्सर बरा होण्यास किंवा टाळण्यास एकदम सोपे आहे आणि त्यासाठीच वेळच्या वेळी तपासणी करणे उपयुक्त ठरू शकते. Continuous Update Project नुसार खाण्या पिण्याच्या सवयी हेल्दी केल्यास, स्मोकिंग बंद केल्यास, दररोज शारीरिक व्यायाम केल्यास, आणि उंची साठी योग्य वजन राखल्यास लोकांचा कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका साधारणतः 47% पर्यंत कमी होतो.

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…