नवीन लेखन...

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय

आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम प्रणालीची आवश्यकता असते. ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती. काही व्यक्तींमध्ये जन्मतःच रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा व्यक्तींना आजारांची लागण पटकन होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात थोडेसे बदल करणं आवश्यक असतं. जर रोग प्रतिकारक शक्ती मजबूत नसेल तर शरीराची रोगांच्या सोबत लढण्याची शक्ती कमी होते ज्यामुळे आपण लवकर आजारी पडतो. रोग प्रतिकारक शक्ती आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची डिफेंस सिस्टम आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जर शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो.  अशातच आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी खाली दिलेल्या गोष्टींचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.

Image result for रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे उपाय

  • शरीरास वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी विटामिन सी अत्यंत फायदेशीर असते. नेहमीच आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेले लिंबू आणि आवळा विटामिन सीचे भांडार आहे. त्यामुळे यांचे नियमित सेवन करा.
  • भरपूर प्रमाणात पोषक घटक पालक या पालेभाजीत असतात. पालकमध्ये असणाऱ्या फॉलेक या घटकामुळे शरीरात नवीन पेशी तयार होण्यास मदत होते. शिवाय पालकमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट, आणि व्हिटॅमिन सी सारखे महत्त्वाचे घटक असतात. हे घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढणवण्यासाठी गरजेचे असतात. पालकात मोठय़ा प्रमाणात व्हिटॅमिन ई आढळते. त्याचप्रमाणे पालक हा व्हिटॅमिन्स ए, सी आणि केचा चांगला स्रोत आहे. पालकाच्या मदतीने प्रतिकार क्षमता वाढवता येते.
  • रोजच्या रोज पर्याप्त झोप नक्की घ्या. तुमचं दैनंदिन जीवन कितीही व्यस्त असले तरिही पूर्ण झोप आपल्या शरीराची गरज आहे. असं दिसण्यात आलं आहे की, ज्या वक्ती पूर्ण झोप घेत नाहीत, त्या जास्त आजारी पडतात. झोपेच्या चक्रात बिघाड झाल्यास त्याचा परिणाम आपोआपच शरिराच्या रोगप्रतिकारशक्तीवर देखिल होतो. सात तासांपेक्षा कमीवेळ झोप घेतल्यास शरिरात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते व शरिर त्याला सक्षमपणे प्रतिकारकरण्यास असमर्थनीय होते.
  • योग्य आहार हा तुमच्या  आरोग्याला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा  आहे.  वेळच्यावेळी व सकस आहार घेतल्याने शरिराला पुरक पोषणद्रव्ये मिळतात. यामुळे शरिराचे कार्य सुरळीत पार पड्ण्यास मदत  होते.
  • मानासिक,शारिरिक वा सामाजिक ताणतणाव तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर घातक परिणाम करतात. दिर्घकाळ तणावाखाली राहिल्याने शारिरात काही हानीकारक हार्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे  शरिरातील रोगप्रतिकारक पेशी कमकुवत होतात परिणामी रोगप्रतिकारशक्ती ढासळते.
  • वजन नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. जर तुमचं वजन जास्त असेल तर शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. याचाच शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवरही परिणाम होतात. त्यामुळे जर तुमचं वजन वाढत असेल तर वजन कमी करा. नियमित व्यायाम केल्याने व शरिराला चालना दिल्याने शरिरातील रक्तप्रवाह सुधरतो, रोगप्रतिकारक पेशी व अन्य घटक यांचा संचार वाढतो. तसेच व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहते व चांगली झोप मिळते. व्यायाम केल्याने वजनही नियंत्रणात राहते.
  • नेहमी आनंदी व हसत राहण्याने ताण-तणाव तुमच्यापासुन दुर राहतो. तसेच रोगप्रतिकारक पेशींचे शरीरात योग्य संतुलन राखण्यास मदत होते. नेहमी आनंदी व हसत राहण्यासाठी स्वतःला कायम चांगले छंद लावा जेणेकरून तुमचे मन प्रसन्न राहण्यास मदत होईल.

— संकेत रमेश प्रसादे

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..