नवीन लेखन...

वॉल्टर एलिआस डिस्नी

अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक वॉल्टर एलिआस डिस्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ रोजी झाला.

वॉल्टर उर्फ वॉल्ट डिस्ने यांचा जन्म शेतकऱ्याच्या कुटुंबातला, अनेक भावंडातला वॉल्टर लहानपणापासूनच कलाकार होता. वयाच्या सातव्या वर्षीच चित्रे काढून शेजाऱ्याना विकून तो काही पैसेही तेव्हापासून मिळवत असे. एका ट्रेनच्या प्रवासात त्याला ‘मिकी माऊस’ गवसला असे म्हणतात. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षीच सैन्यात भरती होण्यास तो गेला पण त्याला प्रवेश नाकारला गेला. मग त्याने रेडक्रॉसमध्ये काम सुरु केले. म्हणजे निसर्गदत्त कलाकार व त्यातही व्यंगचित्र काढण्याची त्याची हातोटी असूनही सुरुवातीला त्याने अगदी विपरीत जीवनकार्य निवडण्याचा प्रयत्न केला. हे असे अनेकांच्या बाबतीत होते. ‘मी कोण’ आहे ‘कोऽहम’ हा तसा सनातन, चिरंतन प्रश्न.

‘मी ब्रह्म आहे’ असे त्याचे अंतिम व आदिम उत्तर. पण त्यामध्ये मी सध्या कोण आहे? या जन्मात माझ्या आत अशा काय क्षमता आहेत की ज्या फक्त व फक्त माझ्यातच आहेत हा शोध महत्त्वाचा आहे. आपला ‘स्व’ कळणे- ‘स्वभाव’ कळणे हे अपरिहार्य आहे. अन्यथा अर्धे आयुष्य किंवा कधीकधी पूर्ण आयुष्यही न आवडणार्या , न कळणार्याय कामात अडकून पडते. वॉल्टर रेडक्रॉसच्या कामासाठी फ्रान्सला गेला, तिथे त्याला अॅम्ब्युलन्स चालवण्याचे काम होते. पण त्याच्या आतला कलाकार गप्प बसेना. असे म्हणतात त्याची अॅम्ब्युलन्स नेहमी गच्च भरलेली असे. पण वैद्यकीय गोष्टींनी नाही तर त्याने काढलेल्या असंख्य कार्टून्सनी! वर्षभरातच वॉल्टर परत आला. त्याने कमर्शियल आर्टमध्येच करिअर करायचे ठरवले. कान्सासमधे स्थानिक व्यवसायांसाठी त्याने अॅनिमेटेड फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली.

‘The Alice Comedies’ ही फिल्म त्याने बनवली. तो कफल्लक झाला. त्याची कंपनी कर्जबाजारी झाली. पण त्याने निराश न होता सुटकेस भरली. अॅलिसची अपूर्ण फिल्म घेऊन त्याने तडक हॉलिवूड गाठले. वॉल्टर त्यावेळेस जेमतेम २२ वर्षाचा होता. भावाचे अडीचशे डॉलर, अधिक काही ५००-६०० डॉलर्सचे कर्ज यातून एका गॅरेजमधे काम सुरू झाले. १९२५ साली वॉल्ट डिस्नी यांचा विवाह व्यंगचित्रकार लिलियन बाऊण्ड्स यांच्याशी झाला. डिस्नी दांपत्य आणि आयवर्क्स यांनी नव्या जोमाने आपल्या स्टुडिओत पुन्हा कामाला सुरूवात केली. वॉल्ट यांनी कॅन्सास स्टुडिओत सहज म्हणून काढलेले उंदराचे चित्र घेऊन त्यावर आयवर्क्सने नवे साज चढविले. या चित्राला आढी मॉर्टिमर असे नाव देण्यात आले. पण लिलियनला ते नाव आवडले नाही. म्हणून मग तिनेच सुचविलेले मिकी माउस हे नाव त्या चित्राला देण्यात आले. मॉर्टीमर नाव पुढे एका खलनायकाच्या चित्रासाठी दिले.

मिकीचा आवाज स्वतः वॉल्ट डिस्नी यांचाच आवाज होता. मिकीचा पहिला मूक चित्रपट Plane Crazy तयार झाला. (१९२८). या काळापर्यंत मूकपटांची मागणी कमी होत गेली होती, प्लेन क्रेझी सपशेल आपटला. १९३७ सालची Snow white & the Seven Dwarfs ही पूर्ण लांबीची, प्रचंड खर्चाची पण सदाबहार अॅनिमेटेड फिल्म त्याने केली. मग डिस्ने स्टुडीओने अनेकानेक क्लासिक्सची निर्मिती केली. विनोदनिर्मितीतून करमणूक करतानाही निरागसता जपणारा चार्ली चॅपलीन हा लहानपणापासून त्याचा आदर्श होता. Pinocchio, Fantasa, Dumbo, Bambi ते Junglebook ह्या सगळ्या फिल्म्स त्याची साक्ष देतात. टेक्नीकलरचे पेटंट त्याने घेतल्याने काही वर्षं कलर फिल्म बनवण्याचा हक्क फक्त त्यांनाच मिळाला. १९३२ च्या फ्लॉवर्स अॅण्ड ट्रीजने त्याला पहिला अॅकेडमी अॅवार्ड मिळवून दिला.

वॉल्ट डिस्नेज फिल्मोग्राफी या शीर्षकाखाली निर्माता म्हणून जवळजवळ ५७६, दिग्दर्शक म्हणून जवळजवळ ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची नावे दिसतात. ही प्रचंड क्रिएटिव्हिटी, Animation या माध्यमातही सतत केलेली नवनिर्मिती ही थक्क करणारी आहे. असंख्य मुलांचे बालपण खुलवणारा, मोठ्यांनाही छोटं करणारा, भाषा, प्रांत, संस्कृती, इतिहास या साऱ्या सीमारेषा पुसून आनंदाचे अपराजित साम्राज्य उभे करणार्याठ वॉल्ट डिस्नेच्या अफाट सृजनशीलतेला व नवनिर्मितीच्या क्षमतेला सांष्टांग दंडवत घालावा असे वाटते.

मिकी, मिनी, डोनाल्ड, मोगली, गुफी, टॉम अॅण्ड जेरी, लायन किंग ही पात्रे आपल्या सर्वांच्या भावविश्वात कायमचे घर करून आहेत. जंगल बुक १९६७ साली सुपरहिट होता, २०१६ सालीही सुपरहिटच आहे. त्या कथेवर TV सिरिअल्सचे असंख्य भाग पाहूनही पुन्हा थिएटरकडे गर्दी होते. तीच गोष्ट टारझन, सिंड्रेला, रॉबिनहूड, अॅलिस यांची. यामागे आनंद वाटण्याची अमर्याद ओढ, तंत्रज्ञानावरची हुकुमत व नवनवीन तंत्रेही सर्वात आधी आत्मसात करण्याची तत्परता या सर्व गोष्टी आहेत. १९९० साली डिस्नेचा २९ वा पूर्ण लांबीचा चित्रपट The Little Mermaid आला.

वॉल्ट डिस्ने यांची कार्टून फिल्म सलग २० वर्षे एबीसी अॅ ण्ड एबीसीसारख्या मोठ्या चॅनलवर प्रसारित होत होती. वॉल्ट डिस्नेने जे पैसे कमावले तेच त्यांनी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट डिस्नेलँडमध्ये गुंतवले. 1१७ जुलै १९५५ रोजी कॅलिफोर्नियामध्ये शेकडो एकर जमिनीवर डिस्नेलँड तयार करताना वॉल्ट डिस्नेने सांगितले होते की, मनोरंजन आणि कुतूहल असलेल्या या जागेला तोपर्यंत पूर्णत्व येणार नाही जोपर्यंत लोकांमध्ये कल्पनाशक्ती आहे. कॅलिफोर्निया, आरलँडो, पॅरिस, टोकियो आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले डिस्नेलँड खरोखर परीकथेतील कल्पनेप्रमाणे आहे. त्यांनी जन्माला घातलेले कार्टून, डिस्नेलँड आणि अॅटम्युझमेंट पार्क आजही मनोरंजन जगात सर्वोच्च पदावर विराजमान झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी हाताने चित्र काढणे व रंगवणे ह्या अत्यंत कष्टप्राय तंत्रातून संगणकीय चित्रांच्या नव्या तंत्राकडे झेप घेतली ती आजतागायत उंच उंच जातच आहे.

लहानपणी वॉल्टला प्राणी, पक्षी, निसर्गाचे खूप कुतूहल होते. त्यांचे चेहरे, लकबी, रंग यांना तो कागदावर आणी पण आपल्या खास शैलीत. त्या कुतूहलातून एक प्रतिसृष्टी निर्माण झाली आणि अजूनही होतच आहे.
वॉल्ट डिस्ने यांचे निधन १५ डिसेंबर १९६६ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2640 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..