नवीन लेखन...

ज्येष्ठ संगीतकार रोशन

हिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७०  हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला  दिली.

आजच्या पिढीला रितिक रोशन नक्कीच माहित आहे. त्याचे वडील कलाकार व निर्माता राकेश रोशन, आणि संगीतकार राजेश रोशन  पण ओळखीचे असतील पण रितिकचे आजोबा राकेश रोशन आणि राजेश रोशनचे वडील महान संगीतकार रोशन माहित असणे कदाचित कठीण आहे. कारण ह्या महान संगीतकाराने त्याच्या वयाच्या अवघ्या पन्न्साव्या वर्षी सन १९६७ या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यापूर्वी त्यांनी साधारणपणे १९५० ते १९६७ या काळात  संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील गाण्यांनी रसिकांना अगदी मोहिनी घातली होती. हिंदी फिल्म जगतातील सुवर्ण युगातील  महान संगीतकारांच्या यादीत श्री रोशन यांना मानाचे स्थान आहे.

रोशन लाल नागरथ म्हणजेज रोशन या महान संगीतकाराचा जन्म १४ जुलै १९१७ मधे गुरीजानवाला पंजाब (आताचे पाकिस्तान) मधे झाला. लहानपणापासूनच   रोशन यांना संगीताची चांगली जाण होती. संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यानी marris college (आजची भातखंडे म्युझिक संस्था) लखनौ येथे पंडित एस एन रत्नजंकार यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. सन १९४० मधे ख्वाजा खुर्शीद अन्वर यांच्या सहयोगाने All इंडिया रेडीओ Delhi वर काम करण्याची संधी मिळाली. संगीत निर्मिती बरोबर श्री रोशन ‘इसराज’ नावाचे वाद्य वाजवीत. हे वाद्य साधरण पणे दिलरुबा सारखे असुन पंजाबी संगीतात प्रसिद्ध आहे. रोशनजीनी साधारण ८ वर्षे  All इंडिया रेडीओ Delhi येथे काम केले. त्यानंतर ते १९४८ साली त्यांनी नोकरी सोडली आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपले नशीब अजमावण्यासाठी मुंबईला आले. सुरवातीला त्यांनी ख्वाजा खुर्शीद अन्वर यांचा सहायक म्हणून ‘सिंगार’ या चित्रपटा साठी कामं केले. रोशन यांना संगीतकार म्हणून पहिली संधी प्रसिध्द चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्री केदार शर्मा यांनी त्यांच्या” नेकी और बडी” (१९४९) या चित्रपटा द्वारे दिली. हा चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही मात्र त्यांनतर आलेल्या बावरे नैन (१९५०) या चित्रपटाने रोशन यांना नाव मिळवून दिले.या चित्रपटात राज कपूर आणि गीता बाली हे प्रमुख कलाकार होते. यातील मुकेश  यांचे’ तेरी दुनियामे दिल लागता नही’ हे दर्दभर गीत खूप गाजल. त्यानंतर रोशन यांच्या संगीताची जादू  रसिकांना भावली आणि रोशन हळू हळू हिंदी चित्रपट सृष्टीत स्थिरावले. त्यानंतर त्यांनी साधारण पन्नास पेक्षा ज्यास्त चित्रपटाना संगीत दिले. रोशन यांचे संगीत खूप श्रवणीय होते. रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील गाणी पहिली की त्यांच्या संगीताची उंची जाणवते. रोशन यांनी दिलेल्या गाण्यांवर  शास्त्रीय संगीताचा चांगलाच प्रभाव दिसतो.त्याच प्रमाणे त्यांनी  गझल, कव्वाली, फोक  आदि अनेक प्रकारच्या स्वर रचना रसिकांना दिल्या. रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपटांवर नुसती नजर टाकली तरी रोशन यांच्या संगीताच्या उंचीचा अंदाज येतो

रोशन यांनी संगीत दिलेले काही निवडक चित्रपट:-

बावरे नैन (१९५०), हम लोग (१९५१), अनहोनी (१९५२),अजि बस शुक्रिया (१९५८),मैने जिना सिख लिया (१९५९),बरसात की रात (१९६०),आरती (१९६२),दिल ही तो है (१९६३),ताजमहल(१९६३),चित्रलेखा(१९६४),ममता(१९६६),बहूबेगम (१९६७),नूरजहान (१९६७),अनोखी रात (१९६८).

विशेष म्हणजे शास्त्रीय संगीत आणि कव्वाली या दोन्ही प्रकारचे संगीतप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. खाली रोशन यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गाणी दिली आहेत.

गीताचे बोल गायक/गायिका चित्रपट
सारी सारी रात तेरी लता अजी बस शुक्रिया
मै दिल हू एक तलत अनहोनी
जिंदगी भर नाही भूलेगी रफी बरसात की रात
मैने शायद तुम्हे रफी बरसात की रात
ना तो कारवा की तलाश मन्नाडे/आशा/सुधा बरसात की रात
ये इश्क इश्क है रफी/मन्नाडे/सुधा बरसात की रात
अब क्या मिसाल दु रफी आरती
आपने याद दिलाया रफी /लता आरती
लागा चुनरी मी दाग मन्नाडे दिल ही तो है
तुम अगर मुझको न चाहो तो मुकेश दिल ही तो है
निगाहे मिलाने को जी चाहता आशा दिल ही तो है
जो बात तुझमे है रफी ताजमहल
पाव छु लेने दो लता /रफी ताजमहल
जो वाद किया वो लता /रफी ताजमहल
काहे तरसाये जियरा आशा/उषा चित्रलेखा
संसार से भागे लता चित्रलेखा
मन रे तू काहे न धीर धरे रफी चित्रलेखा
रहे ना रहे हम रफी /सुमन ममता
रहे ना रहे हम लता ममता
इन बहारो मे अकेले ना आशा/रफी ममता
रहते ते कभी लता ममता
हम इंतजार करेंगे आशा/रफी बहु बेगम
दुनिया करे सवाल लता बहु बेगम
ओहरे ताल मिले नदी के मुकेश अनोखी रात
ख़ुशी ख़ुशी करलो लता अनोखी रात
मिले ना फुल तो रफी अनोखी रात

 

 रोशन यांचा एकूण कल शास्त्रीय संगीताकडे झुकणारा असला तरी त्यांनी दिलेल्या कव्वाली पण तितक्याच गाजल्या. दिल ही तो है मधली आशा भोसले यांच्या आवाजातील “निगाहे मिलाने को जी चाहता है” ही कव्वाली तसेच बरसात की रात मधील ‘ना तो कारवा की तलाश है आणि ये इश्क इश्क है इश्क ह्या दोन्ही कव्वालीस आजही रसिकांना खूप आनंद देऊन जातातच पण ह्या दोन्ही कव्वाली हिंदी चित्रपट सृष्टीतील उत्कुष्ट कव्वाली मधे गणल्या जातात.

रोशन यांना त्यांच्या सुरवातीच्या काळात चित्रपट सृष्टीत स्थिरावण्यासाठी खूप झगडावे लागले. त्यांचा स्वभाव खूप साधा होता. सर्व गायक कलाकार, निर्माते यांच्याशी खूप चांगले संबध होते. त्यांनी कधीही आपल्या संगीतासाठी मानधनाची मागणी केली नाही. निर्माता देई ते मानधन ते आनंदाने स्वीकारत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विख्यात गायिका लता मंगेशकर, आशा भोसले. सुमन कल्याणपूर. तसेच गायक मोहमंद रफी, तलत मेहमूद, मन्नाडे, मुकेश यांच्या बरोबर काम केले. विख्यात सिने अभ्यासक श्री अन्नु कपूर यांच्या रोशन विषयी आठवणीत त्यांनी म्हटलंय की श्री रोशन यांना १९५४ साली र्हुदयविकाराचा त्रास झाला होता आणि त्यांना  बाय पास सर्जरी करायला सांगितले होते. रोशन यांच्या मिळेल ते मानधन निर्मात्या कडून स्वीकारण्याच्या साधेपणामुळे त्यांच्याकडे विशेष सेविंग नव्हते. त्याकाळी बाय  पास सर्जरी ही खूप खर्चिक होती, त्यांची ही अडचण ओळखून त्यांचे हितचिंतक आणि खूप जवळचे मित्र ख्वाजा खुर्शीद अन्वर आणि बलराज सहानी यांनी रोशन यांच्या नकळत सर्व  व्यवस्था करून त्यांना रशियात पाठवले आणि तिथे त्यांची बाय पास सर्जरी झाली. त्यानंतर  रोशन यांनी यांनी आपली दुसरी इनिंग धडाकेबाज पणे सुरु केली आणि  एका पेक्षा एक हिट चित्रपट त्यांच्या संगीताने गाजवले. १९६३ साली “ताजमहल” फिल्म साठी श्री रोशन यांना फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. ताजमहलच्या गाण्यांवर नजर टाकली तरी आपल्या लक्षात येईल की किती उच्च दर्जाचे संगीत रोशन यांचे आहे. रफीच्या आवाजात ‘जो बात तुझमे है’  हे गीत किंवा लता रफी यांचे ‘पाव छु ले ने दो’  आणि “जो वादा किया वो निभाना पडेगा” ही दोन युगल गीते  रोशनच्या संगिताची नजाकत दाखवते. चित्रलेखा मधील शास्त्रीय संगीतावरील आधारित गाणी   आशा आणि उषा यांच्या आवाजातील “ काहे तरसाये “  तसच रफीच्या आवाजातील ‘मन रे तू काहे न धीर धरे’ ही गाणी आजही सर्व श्रेष्ठ गाण्यात गणली जातात. ‘चित्रलेखा’ चित्रपटानंतर  आलेला  ‘ममता’ हा चित्रपट सुचित्रा सेन (दुहेरी भूमिका) , अशोक कुमार व धर्मेंद्र या कलाकाराबरोबर रोशन यांच्या संगीतामुळे पण खूप गाजला. यातील ‘रहते थे कभी – (लता) , इन बहारोमे अकेले ना फिरो – (आशा/रफी), रहे ना रहे हम (लता)  ही गाणी सदाबहार गणली जातात. त्यानंतर आलेले ‘नूरजहाँ’ आणि ‘ बहू बेगम’ ह्या रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटातील गाणी पण गाजली. ‘अनोखी रात’ हा रोशन यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट  (हा चित्रपट रोशन यांच्या मृत्यु  नंतर रिलीज झाला).

रोशन यांनी  विख्यात गीतकार इंदीवर आणि आनंद बक्षी यांना त्यांच्या चित्रपटात गीतकार म्हणून प्रथम संधी दिली. रोशन हे अखेर पर्यंत कार्यरत होते. त्यांनी ज्या अजरामर संगीत रचना केल्या आहेत त्यांना तोड नाही. अशा या गुणी संगीतकाराचा मृत्यु १६ नोवेंबर १९६७ म्हणजे त्यांच्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी मुंबई इथे झाला. अस म्हटलं जात की आयुष्य किती जगला ह्याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं. आज रोशन आपल्यात नसतील पण त्यांच्या गीतांची अनोखी नशा कायम आहे. अशावेळी या महान संगीतकाराने ममता मधे दिलेल्या गीताचे बोल आठवतात

 “ रहे ना रहे हम महका करेंगे”…………..!

(सदर लेखासाठी संबधित वेब साईटची मदत झाली  आहे).

— विलास गोरे

 

Avatar
About विलास गोरे 22 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..