नवीन लेखन...

शाकाहारी का मांसाहारी ?

सगळीकडे घरात नवीन पाहुणे आल्यावर पहिला प्रश्न येतो कि हे शाकाहारी का मांसाहारी आहेत ? आणि प्रत्येक ग्रुप मध्ये एकतरी शाकाहारी हा असतोच.

मग लगबग सुरु होते ती त्याच्या जेवणाच्या व्यवस्थेची.

एक वेगळाच थाट

काही शाकाहारी असतात ते आधीपासूनच एकतर वारकरी संप्रदायाचे किंवा धर्मातील बंधनामुळे ते शाकाहारी असतात.यातील सुद्धा आजच्या काळातील तरुण पोरांमध्ये असे अनेक बहाद्दर मुले असतात कि ती घरी एकदम सोज्वळ असतात आणि बाहेर असल्यावर आखी कोंबडी फस्त करतात.

त्यांना बिचार्यांना दोन्ही परिस्थिती सांभाळाव्या लागतात.

हौशी शाकाहारी लोक

याचं सांगायचं झाल तर whatsapp च्या दुनियेतील वाचलेले forward Articles ,चुकून Youtube वरील Emotional Video पाहून यांच्या डोक्यातील छोटा मेंदू जागा होतो.मग शाकाहारी होण्याचा विचार सुरु होतात.काही इतके जोशामध्ये असतात कि पुढचा मागचा विचार न करता माळ घालतात मग ५-६ महिन्याने Hangover उतरल्यावर खाताना माळ काढून ठेवायची सवय होऊन जाते.

 

नाईलाजाने खाणारे

असे पण काही उदाहरण असतात कि ज्यांना इच्छा नसताना सुद्धा तब्येतीच्या कारणास्तव मांसाहार सुरु करायला लागतो.अशा लोकांसाठी मग लगेच आतापर्यंत मांसाहारी असलेले अंडे सुद्धा विज्ञानाच्या आधारे शाकाहारी  होऊन जाते.

मग येतात ढोंगी प्राणीप्रेमी

दारात कुत्र-मांजर आल्यावर दगड मारून हाकलून लावणारे हे प्राणीप्रेमी !!!!!!!!!!!!!!!

याचं म्हणन असत कि त्या छोट्या प्राण्यामध्ये सुधा आपल्यासारखा जीव असतो त्यांची हत्या करून मांसाहार करणे चुकीच आहे. म्हणजे याचं हृदय हे काचेच  आणि आम्ही दगड ज्याला कधी पाझर च फुटत नाही.

“दुसऱ्याला सांगण्यापुर्वी सुरुवात हि आपल्या पासून झाली पाहिजे जेणेकरून हळूहळू हे जग सुद्धा Vegeterian बनेल “ या अंधश्रध्येमध्ये ते जगत असतात.”

आत यांना कोण सांगणार कि जगाची लोकसंख्या हि ७०० कोटीपेक्षा जास्त असून भारताचा विचार करायचा झाल्यास ७० % हून अधिक लोक हे मांसाहारी आहेत

जगात वर्षभरात जवळपास ७७०० कोटी प्राण्याची मांसाहारासाठी हत्या केली जाते. त्यात एकट्या कोंबडी चे प्रमाण हे ५००० कोटी आहे.

सिहानी जर हरणाची शिकार केली तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया तेव्हा कोणच्या डोळ्यात पाणी येत नाही पण तेच जर माणसांनी मांसाहार केला तर ते पाप.

इथ शाकाहार कि मांसाहार किंवा काय चांगल काय वाईट ? हा विषय च नाहीये. कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण एवढच सांगण आहे कि कोणाच्या दबावाखाली किंवा एखाद्या बंधनात अडकून आपल मन मारू नका ..

जे तुम्हाला आवडत ते मनसोक्त खा ,त्याचा आनंद घ्या मजा लुटा.

वरील लेखात या विषयावर विनोदी पद्धतीने मत मांडायचा प्रयत्न केला असून शाकाहारी व्यक्तीने वाईट वाटून घेऊ नये.

–  प्रथमेश विश्वास

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..