नवीन लेखन...

वेडात मराठे

1. रविवारची गाफील सकाळ:-

ते सगळं अशाच एका आळसटलेल्या रविवारी सूरू झालं… सोनाली स्वयंपाकाच्या तयारीत, संगणकावर ह्रूदयनाथ मंगेशकरांची गाणी आणि मी मस्त चहा पीत, पेपर वाचत बसलो होतो. चिन्मयी आली आणि म्हणाली ” बाबा school मध्ये Elocution Competition अाहे, मराठा history च्या topic वर speach तयार करायचीय. मला help कर ना”
मी ” हूं…help? आईला विचार.. आई छान सांगेल”
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आतून एक खरमरीत आणि निर्वाणीचा ईशारा आला ” तो पेपर बाजूला ठेव आणि ती काय सांगत्येय ते नीट ऐक”
मग मी योग्य तो निर्णय घेतला…म्हणजे पेपर बाजूला ठेवला.
“काय यार एवढ्या लहान मुलांना लिहून देणार? CBSC वाले पण YZ आहेत. एकदा पंजाब history, एकदा गुजराथ history……. आणि ते पण पोरांनीच करायचं कधी project तर कधी हे असलं Elocution…. कोणाच्या बापानी शिकवल्येय अशी history”
हो…. यात जरा त्रागा जास्त झाला पण मघाशी मी पेपर बाजूला ठेवला ही काही माझी माघार न्हवती हेही मला कूठेतरी दाखवून देणं गरजेचं होतं.
सोनाली शांतपणे ” हो ना? मग तू शिकव ना तीला एखादी गोष्ट तूला हवी तशी….पीलू आपलं आहे आपणच त्याला घडवायचं… ” (दरम्याने संगणकावर वेडात मराठे वीर दौडले सात गाणं सूरू होतं) “आता हे गाणं बघ.. सांग याची एक गोष्ट तीला समजेल तशी..ती सांगेल शाळेत. शिवचरित्राची पारायणं केली आहेस म्हणतोस तर बघूयाच तू कशी शिकवतोस ही history तीला”
आपल्याला असं clean bold करण्याची हूकमी कसब बायकोच काय ती जाणे. पण गोष्ट मात्र खरी होती, मलाही पटली होती. आता मात्र वेडात दौडलेल्या सात मराठ्यांची गोष्ट चिन्मयीला शिकवायचीच असं ठरवून टाकलं.

2. फिरंगी भाषेच्या वेढ्यात:
सुरूवात लगेचच केली. आधी चिन्मयीला घोड्याच्या टापांच्या ठेक्यावर मंगेशकरांनी बसवलेलं गाणं परत ऐकवलं. तीलाही आवडलं. मग सुरूवात तीला गोष्ट समजावून सांगायची…
” ही ना सात खूप शूर मराठा सरदारांची आहे, ते रागाच्या भरात चाळीस हजार शत्रू सैन्यावर चालून गेले.”
चिन्मयी ” बाबा चाळीस हजार म्हणजे? ”
मी “Fourty thousand”
आता मात्र चिन्मयी अवाक्…
” but why baba? How can they be so stupid? मरणार नाहीत का ते?”
नकळत काटा टोचावा तसा तीचा “Stupid” शब्द मला टचकन् टोचला. कुसूमाग्रजांनीही त्यांना “वेडात” दौडले असंच म्हटलं होतं. पण ते “वेड” आणि या “Stupidity” यातला फरक मला खूप कासावीस करत होता. तीला चाळीस हजार म्हणजे forty thousand सांगणं मी समजून घेऊ शकत होतो पण तीच्या सात मराठ्यांचा आवेश न समजण्यानं मी इतका अस्वस्थ का होतो? कुठली तरी मनोमन जपलेली मौल्यवान् वस्तू हरवल्यावर वाटतं तसं वाटायला लागलं. इंग्रजी माध्यमात शिकणार्या माझ्या पिलापर्यंत काही गोष्टी माझ्या मराठीतून पोचणारच न्हवत्या. “इतक्या उपरी बदफैली केलीया मारले जाल” या शब्दातली जरब तीला कधीच जाणवणार न्हवती.
“आधी लगीन कोंडान्याचं” या शब्दातला रांगडा निर्धार तीला कळणार न्हवता. “लाख जावोत पण लाखांचा पोशिंदा राहो” म्हटल्यावर तीला दोन हातात दांडपट्टा घेतलेला बाजीप्रभू दिसणार न्हवता. निव्वळ इतिहास रंजनापलिकडे जाऊन या गोष्टी आम्हाला काही मूल्य शिकवून गेल्या. आणी त्या मूल्यांसाठी म्रुत्यूच्या दाढेत प्राण वैरून बसणारी ही माणसं हा आमचा वारसा होता. आज मात्र हा अनुवंशिक ठेवा मी पुढे देऊ शकत नाहीये असं वाटलं. रहाणीमान फक्त भाषेच्या विळख्यात न्हवतं, तर वेढा होता त्या भाषेबरोबर आलेल्या पाश्चात्य संस्कारांचा……….

3. फिरंगी भाषेतला “एल्गार”:
मग विचार केला की जे आपल्याला कळलं आणी भावलं ते चिन्मयीला कळेल असं म्हणजे इंग्रजीतच का सांगू नये?
थोडं वाचन सूरू केलं. इंग्रजांच्या इतिहासातही अशा एका बेदरकार साहसाची नोंद आहे. क्रेमियाच्या युद्धात असेच सहाशे इंग्रज सैनीक शत्रू सैन्याच्या महासागरावर चालून गेले होते. लाँर्ड टेनीसन नावाच्या कुण्या गोर्यानं त्यांची शौर्यगाथा ” March of light brigade” नावाच्या कवितेत व्यक्त केली आहे. ( wiki वर अवश्य वाचा). तो म्हणतो ” Into the valley of death rode the six hundred”. हे वेडात दौडलेल्या सात मराठ्यांसारखच होतं. फरक इतकाच की ते सहाशे होते आणी आमचे फक्त सातच होते. मग तर या सातांची गोष्ट इंग्रजीत सांगायलाच हवी. शिवाय भारतातील बर्‍याच बिगर मराठी लोकांना ही गोष्ट माहीतच नाहीये.
लाँर्ड टेनीसनच्या भाषेचा प्रभाव होताच. आता कुसूमाग्रजांची मनोमन माफी मागून लिहायला बसलो. पहाता पहाता Seven maratha warriors इंग्रजीत अवतरले……

With the blazing swords those
rose out of their sheathers
Oh they were so fearless
Seven maratha warriors

They saw their commander bit sombre
But his eyes were red with anger
They saddled the horses
with javelines that were longer
With the whirls of dust
they disappeared into frontiers
Oh they were so fearless
Seven maratha warriors

Leaving behind their
dumbfounded army
Vengeance to concur
same treacherous enemy
They took on the battle
in enemy yard so galantly
Like seven fireballs
Blew away enemy barriers
Oh they were so fearless
Seven maratha warriors

Their bravery leaves the
Trail till the horizon
The wind is humming
Songs of the martyrdom
A tribute to them for
for selfless heroism
We salute them,
Those braveheart warriors
Oh they were so fearless
Seven maratha warriors

4. समर्पण
चिन्मयीला आता Seven maratha warriors जरा चांगले समजले आणि आवडले आहेत. तीच्या elocution मध्ये तीनं त्यांची शौर्यगाथा इंग्रजी कवितेसह न अडखळता सांगीतली. त्यामुळे आम्ही तीघं जरा खूष आहोत.
पण या अंतरिक्षात आमच्या सारखे कूणी आई बाप अडखळले, तडफडले किंवा कासावीस झाले असतील तर त्यांच्या पर्यंत हा अनुभव पोचावा अशा ईच्छेपोटी हा “Forward” प्रपंच करीत आहे………..इदं न मम असं म्हणून……

जय महाराष्ट्र

SEVEN MARATHA WARRIORS
वेडात मराठे अर्थात्- Seven Maratha Warriors

— WhatsApp वरुन आलेला मेसेज मला आवडला म्हणून शेअर केला. 

— सुशांत

 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..