नवीन लेखन...

सध्याच्या मालिका आणि वास्तव

TV Serials and Reality

सध्या टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या मालिका दाखविल्या जातात त्या पाहून खरोखरंच प्रेक्षकांनी त्यातून काही बोध घ्यावां अशा असतात का ? हा प्रश्नांच उत्तर काय द्याव ?

हा प्रश्न या मालिका पाहणार्याअ सर्वांनाच व्यतीत करतो कारण आज बहूसंख्य प्रेक्षक फक्त टाईमपास म्ह्णून या मालिका पाहत असतात. पूर्वीचे प्रेक्षक जेवढ्या आवडीने उत्सूकतेने रामायण महाभारत पाहत होते तितक्या उत्सूकतेने आजचे प्रेक्षक पाहतात का ? पूर्वीच्या त्या मालिकांतील कोणत पात्र कोणी साकारलयं हे शेंबडया पोरांना ही माहित असायचं पण ! आज मालिकात काम करणार्यार काही मोजक्याच कलाकारांची नावे लोकांना माहित असतात. आज लोक कोणत्याही मालिकेत फार गुंतत नाहीत. मी तर एकाच वेळी तीन-तीन मालिकांचा एक-एक तुकडा पाहतो आणि तरीही मला त्या तीनही मालिका पाहिल्याचं मानसिक समाधान मिळतं. एखादी मालिका एक महिना जरी पाहिली नाही तरी आपण फार काही गमावलं असं हल्ली कोणा प्रेक्षकाला बहूदा वाटत नसावं. कोणत्या मालिकेत कोणत कथानक किती खेचावं याला काही मर्यादाच राहिलेली नाही.

एखादा सरडा ही जितके रंग बदलत नाहीत इतके रंग या मालिकेतील पात्र बदलत असतात. मालिका म्हटली की ती श्रीमंतच असायला हवी असा या मालिकांची निर्मिती करणार्यांबनी जणू ठरवूनच टाकलेलं दिसतयं. या मालिकात श्रीमंत लोकांच्या गरीब समस्या दाखविल्या जातात आणि मध्यामवर्गीय माणूस चणे खात त्या पाहात राहतो. या मालिकांतील पात्र क्षणात गरीब आणि क्षणात श्रीमंत होताना दिसतात. प्रत्येक मालिकेत खास करून हिंदीत मालिकेच्या सुरूवातीला सर्व श्रीमंत दाखवायचे सारं इतक भव्यदिव्य दाखवायची की ते पाहून गरीबांचे डोळेच दिपतील, त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले की मग त्या श्रीमंताना गरीब करायचं मग गरीबांच्या भावनानां हात घालून त्यांच्या मनाचं समाधान झालं की त्यांना जादूची कांडी फिरवून पुन्हा श्रीमंत करायचं आणि गरीबाला ही श्रीमंत होता येत असं स्वप्न गरीबांना दाखवायचं. गरीब ते स्वप्न पाहात असतानाच अचानक ती मालिका बंद करायची आणि गरीबांच्या स्वप्नावर पोतेरं फिरवायचं.

टेलिव्हिजनवर आता एक नवीनचं प्रकार सुरू झालेला आहे पुरूष कलाकारांनी बायकांच्या वेशात वावरण्याचा एक विनोदाचा भाग म्ह्णून हे होत होत तो पर्यत ठिक होतं पण आता ते फारचं किळ्सवाण वाटू लागलेलं आहे. एखाद्या भुमिकेची गरज म्ह्णून पुरूषांनी स्त्री वेशात वावरणं ठिक आहे पण हल्ली बायकांना पुरूषांना स्त्री वेशात पाहायला आवडू लागलंय की काय अशी भिती हळूच मनात डोकावू लागते की काहीतरी नवीन करायचं म्ह्णून पुरूष कलाकारांनी स्त्री वेशात वावरायचं अशी काही नवीन प्रथा सुरू झाली असेल तर ते फारचं विचित्र म्ह्णावं लागेल. कॉलेजात जाणारे तरूण फॅशन म्ह्णून साडी नेसून कॉलेजात नाही गेले म्ह्णजे मिळविली असं म्ह्णण्याची वेळ आलेली आहे.

मी मालिकेशी संबंधीत माझ्या एका मित्राला म्ह्णालो ही तुमच्या मालिकेच्या प्रत्येक भागातील अर्धा-अधिक वेळ स्वयंपाक घरात आणि रॅम्पवॉक करण्यातच जातो त्यावर तो म्ह्णाला मलाही याचा कंटाळा आलायं पण काय करणार ? आता बोला !

समाजात जे घटस्फोटाचे आणि विवाह बाहय प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढत आहे त्याला हया मालिका तर जबाबदार नाहीत ना ? असा प्रश्न ही मला कधी – कधी सतावू लागतो. माझ्या मित्रांना मी मालिका पाहतो हे ऐकल्यावर फारचं आश्चर्य वाटतं ते वाटण्याचं कारण शोधलं असतात आपल्या देशातील फार कमी पुरूष या मालिका पाहतात. पण मला वाटत पुरूषांनी या मालिका नाक्कीच पाहायला हव्यात म्ह्णजे त्यांना हया मालिका आपल्या घरातील बायकांच्या मेंदूत नक्की काय घुसडतं आहेत हे अगदी सहज लक्षात येईल.

मालिकांतीला पात्रे जे पोषाख परिधान करतात तेच पोषाख परिधान करण्याची हुक्की मध्यमवर्गीय स्त्रियांच्या मनात निर्माण होऊ लागते. मालिकेत सती सावित्री दाखविलेल्या नायिकेला जेंव्हा एखादा पुरूष एका बारमध्ये दारू पिताना पाहतो तेंव्हा तो ती मालिका डोळे फाडून पाह्णे थांबवतो. मालिकांतील पात्रांमध्ये आपल्या कडील प्रेक्षक गुंतून पडतात. मालिकांतील कथानकासोबत ते स्वतः ही वाहत जात राहतात.

एखादया माणसाच्या आयुष्यात किती संकट यावी आणि त्यातून त्याने सहीसलामत बाहेर निघावं किती वेळा यालाही काही मर्यादा राहिलेली नाही. या मालिकातील कोणत्या पात्राची बुध्दी कधी भ्रष्ट होईल अथवा त्याची स्मृती नाहिशी होईल हे तर साक्षात परमेश्वरालाही सांगता येणार नाही मला तर वाटत ती मालिका लिहणार्याहलाही ते नक्की माहित नसावं. माझ्या आतापर्यतच्या आयुष्यात असा स्मृती नाहिशी झालेला मी एक ही माणूस पाहिलेला नाही म्ह्णून मी माझ्या एका डॉक्टर मित्राला उत्सूकतेतून विचारलं हे जे मालिकेतील पात्रांची स्मृती जाताना दाखवितात त्यंना काही गोष्टी कशा काय आठवत असतात ? तेंव्हा तो मला म्ह्णाला आपल्या मेंदूत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्मृती साठविलेल्या असतात त्यामुळे मेंदुचा ज्या भागाला इजा पोहचलली असते फक्त त्या भागातील जमा स्मृतीच नाहीशी होते. मालिकेतील कथानक पुढे जाव म्ह्णून एखाद्या मालिकेतील एखाद्या पात्राची स्मृती जाणे मान्य केले जाऊ शकते पण त्यानंतर आणखी चार-पाच मालाकांतील पात्रांची स्मृती जात असेल तर हा कहरच म्ह्णायला नको का ? माझं तर असं ही निरीक्षण आहे की स्मृती जाण्या सारखे प्रकार मालिकात एखाद्या पात्राच्या मृत्यूच्या बाबतीत ही घडताना दिसतात.

सासू सुनेच नातं हा तर या मालिकांचा जणू प्राणच आहे असा समज करून घ्यायला या मालिकांचे निर्माते ही नाही म्ह्णणार नाहीत. सध्याच्या सासू – सूना यामधील नातं बदलत चाललयं अर्थात सूनेला आता सासूचा धाकच उरलेला नाही याला या मालिकाच जबाबदार आहेत. काही पालक स्वतःहून आपल्या मुलाला लग्न झाल्यावर स्वतत्र राहण्याचा सल्ला देतात. एका मालिकेतील लेखक एक पुस्तक प्रकाशित होताच सिलेब्रेटी होतो आणि दुसरीकडे कविता लिहणार्याा नायिकेला एक कविता लिहल्याबद्द्ल फक्त शंभर रूपयाचे मानधन मिळते आणि त्याचा आनंद तिला करोडो रूपये मिळाल्यासारखा व्यक्त करताना दाखविला आहे.

रोजच्या जीवनात घडणार्या घटना हल्ली मालिकांत डोकावताना दिसतात पण हल्ली वडपोर्णिमेलाही मालिकांत मानाचे स्थान मिळू लागले आहे त्यात कहर म्ह्णजे हे असे सण पुरूषांनी ही साजरे करावेत हा अट्टहास खरोखरंच विचार करायला भाग पाडणारा आहे. आता समाजात कायं घडावं, कोणते सण कसे साजरे व्हावेत, कोणत्या परंपरा बुरसटलेल्या आहेत आणि कोणत्या समाज हिताच्या हे सारे आता हया मालिका ठरविणार का ? सध्याच्या माणसाचा खाजगी आयुष्यात मर्यादेपेक्षा अधिक डोकावताना दिसतात. काही पात्रांच्या प्रत्यक्ष आयुष्या घडणार्या् घडामोडींचा संबंधही या मालिकातील कथानकाशी जोडला जातो.

सध्याच्या मालिकात होणारे अंगप्रदर्शन मालिकेची गरज म्ह्णून कमी आणि टी.आर.पी वाढविण्यासाठी अधिक केले जाते हे सत्य आता कोणीही नाकारणार नाही, आपल्या देशातील बहूसंख्य पुरूष ते पाहण्यासाठीच या मालिका पाहत असतात असं बरेच पुरूष खाजगित मान्य करतात. घटस्फोटानंतर आपल्या आयुष्यात लगेच दुसरी व्यक्ती येऊ शकते आणि आपले जीवन पुन्हा आनंदाने बहरू शकते हा फाजील आत्मविश्वास या मालिका आजच्या पिढीच्या मनात निर्माण करतात आणि काही मालिकात घटस्फोटा घेण्यासाठी दाखविली जाणारी कारणे फारंच शुल्लक असतात. इतकी शुल्लक की ती वास्तवापासून प्रचंड दूरची असतात.

देवांवर असणारी मालिका पाहताना त्या मालिकेतून लोकांच्या मनात त्या देवाबद्द्ल श्रध्दा निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर नसतोच उलट त्या पाहणार्यााची डोळ्याची भुक वाढविण्याचे कार्य या मालिका अधिक करताना दिसतात. काही मालिका आहेत ज्या खरोखरच मनोरंजन करतात पण त्यातून बोध घ्यावा असं त्याच्यांत काहीही नसतं.

लोक सध्या मालिकेंच्या प्रेमात पडून आंधळे झालेले आहेत त्यामुळे त्या डोळसपणे पाहण्याची त्यांची तयारीच नसते.

लेखक – निलेश बामणे
गोरेगांव (पूर्व) मुंबई-65
मो. 8652065375 / 9029338268

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..