नवीन लेखन...

To Do – एक कथा

To Do - A Story

खरंच् आता मात्र फारचं वैताग आला आहे ह्या ToDo चा. अरे संपुन संपत नाही. बरं आठवलं! बुधवारी राजूची फि भरायची आहे, ToDo मध्ये लिहून ठेवतो. अरे हो, विम्याच्या हप्त्याचा चेक लिहायचा राहिला आहे, हॉलमधील एसीचे सर्वीसींग करायचे आहे, कारमधील डेक रिपैर करायचा आहे. एक ना दोन,

आणि परत माझी ToDo लिष्ट वाढू लागली.

माझी ToDo लिहायची सवय फार पूर्वीपासूनची. मी आणि माझी पत्नी राणी, आमच्यामध्ये बाकी गुण समान नसले तरी हा गुण मात्र अगदीच सारखां. अगदी लहान सहान कामेही आम्ही ToDo मध्ये लिहून ठेवतो. घरी घरची ToDo , आणि ऑफिसमध्ये ऑफिसची ToDo. मोठा हुद्दा, मोठा पगार, जास्त कामे, मोठी ToDo. माझ्या ह्या सवयीचा थोडाफार चांगला/वाईट परीणाम माझ्या ऑफिसमधील सहकार्‍यांवर सुध्दा झालाचं. आणि तेही ToDo लिहू लागले.

कधी कधी तरं हि ToDo फारचं वाढत जाते. मग कधीतरी शनिवारी किंवा रविवारी काही कामे झालीत कि थोडी कमी होऊन बुधवारी परत येरे माझ्या मागल्या. ज्या दिवशी हि ToDo संपेल त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घालीन, म्हणतो ! हो पण पूजेची कामे आलीतच कि ToDo मध्यें.

हो गेल्याच् महिन्यात रिमाचा फोन आला होता. रिमा, माझं फर्ष्ट लव् म्हणा हवतरं! पणं खरच्, आयुष्यातले रिमाबरोबरं घालवलेले ते क्षण कधीच विसरता येणार नाहीत. तिला सांगितलं होतं एकदा फोन करून मनसोक्त गप्पा मारू म्हणून. पण ईतर महत्त्वाच्या कामातं राहूनच गेलं. लिहून ठेवतो ! हो! अशी खुप कामं ToDo मध्ये खुप दिवसांपासून पढुन आहेतं. सहा वर्षांचा राजू, कधीपासूनची ईछ्या आहे, त्याला एकदा चौपाटीला घेऊन जावं, वाळुत आणि पाण्यात मस्तं खेळावं. राणीबरोबर् एखाद्या निवांत ठिकाणी जाउन छान वेळ घालवावा. कॉलेजच्या मित्रांच्या याहू ग्रुपमधील मेलस् ना तर एकही रिप्लाय दिला नाही अजूनं. पण छे ! ईतर महत्त्वाच्या कामांपासुनं वेळ मिळाला तर ना ! हो या शनिवारी, यातलं एखादं तरी काम करुचं.

अरे हे काय? वाजले किती? आज थोडा उशीरच् झालेला दिसतोय् ! राणीदेखील उठवायला विसरली वाटतं. पण का कोण जाणे, आज अगदीच वेगळं वाटतयं. फार हलकं हलकं आणि प्रसन्नं वाटतयं. हॉलमधुन हा आवाज कसला येतोय्, राजूने सकाळीच् कार्टून नेटवर्क लावलेल दिसतयं. जरां बघु तरी.

अरेच्या, सकाळी सकाळी इतकी मंडळी हॉलमध्ये? अहो सासरेबुवा! ती खुर्ची जरां डगमगते, जरा सांभाळून बर कां. अरे, माझ्याकडे त्यांचे लक्षचं दिसत नाही. अरे हे काय, राणी आणि सासुबाई का रडत आहेत? आणि हे कोण जमिनीवरं झोपलं आहे. मीच् !!!!

आता आठवलं, काल रात्री आलेली ती छातीतली जोराची कळं, शेवटचीच होती तरं………

मी परतं बेडरूमध्ये आलो. ड्रेसिंग टेबलवरील आरष्यात पाहिले आणि खात्री झाली की आपण संपलो आहोत. ड्रेसिंग टेबलवरील राणीच्या ToDo कडे लक्षं गेले, माझ्या ToDo मधील बहुतेक सगळी कामे तिच्या ToDo मध्ये आली होती. मी माझ्या टेबलकडे आलो, आणि माझी ToDo बघू लागलो. थोडीच् कामे, व त्यावर काट मारलेली होती. मी कामे वाचू लागलो.

..राजूबरोबर चौपाटीला जाऊन वाळुत आणि पाण्यात मस्तं खेळायच. उंच डोंगरावरून खालचं गाव बघायच.

..राणीबरोबर् एखाद्या निवांत ठिकाणी जाउन छान वेळ घालवायचा.

..रिमाला फोन करून मनसोक्त गप्पा मारायच्या.

..कॉलेजच्या मित्रांच्या याहू ग्रुपमधील मेलस् ना रिप्लाय द्यायाचा.

..एक दिवस संपूर्ण सुट्टी घेऊन, फक्त पं. ह्रुदयनाथ, सुरेश वाडकर, श्रीधर फडके ऐकायचे.

..

काही फक्त माझीच् काट मारलेली कामे सोडल्यास ToDo त् काहीच् उरले नव्हते. माझी ToDo पूर्ण रिकामी झाली होती.

मी बेडवर बसलो आणि विचार आला, ऑफिसची ToDo, सहकार्‍यांच्या ToDo त विलीन झाली असेल, आयुष्यभरं ज्या कामांना मी माझी महत्वाची कामे म्हणत होतो, ती माझी कधीच नव्हती, ती फक्त मला दिली गेली होती इतकचं. माझ्यानंतर ती इतर कोणाकडे जातीलच.

फक्त माझीच अशी कामे मात्र आता अपुर्णच राहिली. वाटलं, अजुन काही क्षणांच जरी आयुष्य मिळाले तर फक्त हिच कामे पूर्ण करीन. पण आता खुपचं उशीर झाला होता. क्रिकेटप्रमाणे आपल्या आयुष्यातही शेवठी काही स्लॉग ओवरस् असत्या तरं…

माझ्या रिकाम्या ToDo कडे बघताना जाणवलं, ज्या ToDo चा मला इतका राग एत होता, तेच् माझं जीवन होतं, जिवंतपणाचं लक्षण होतं. जिवंतपणीसुद्धा ज्यांची ToDo रिकामीच आहे, त्यांच जीवन, जीव न असण्यासमच आहे. नाही का ?

खरचं, जन्म घेतलेल्या प्रत्येकाकडे फक्त दोनचं पर्याय असतात ToDo किंवा To Die.

विनय

— विनय शेणॉय उर्फ विनय

1 Comment on To Do – एक कथा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..