नवीन लेखन...

बाटा कंपनीचे संस्थापक थॉमस जे बाटा

बाटा कंपनीचे संस्थापक थॉमस जे बाटा यांचा जन्म १७ सप्टेंबर १९१४ रोजी झाला.

एखाद्या ब्रॅण्डला लोकप्रियता मिळण्याची कारणं अनेक असतात. काही वेळा निव्वळ नफा काही वेळा प्रतिष्ठेचा टॅग त्या उत्पादनाला मोठं करतो. पण दर्जा, विश्वास, किंमत या तिन्ही कसोटय़ांवर बाटा पुरेपूर उतरते आणि म्हणूनच लोकप्रिय ठरते. ही लोकप्रियता १२५ वर्षे कायम आहे हे विशेष.

चेक रिपब्लिकमधील थॉमस जे बाटा या तरुणाने आपला भाऊ अ‍ॅंटोनीन आणि बहीण अ‍ॅषना यांच्यासह बाटा शू कंपनी सुरू केली. आईकडून ३२० डॉलर्सची मदत त्याने घेतली होती. आठ पिढय़ांच्या ३०० वर्षांचा चर्मकारीचा अनुभव थॉमसच्या पाठीशी होता. २४ ऑगस्ट १८९४ मध्ये कंपनीची स्थापना झाली. पण इतर अनेक कंपन्यांपेक्षा या कंपनीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी पूर्णवेळ काम करणारे पगारी १० चर्मकार या कंपनीत नियुक्त केले. जे त्या काळात अनोखे होते. कंपनी सुरू झाल्यावर अगदी लगेचच थॉमस यांच्यासमोर काही आर्थिक अडचणी उद्भवल्या. चामडय़ाची खरेदी परवडणारी नसल्याने या अडचणींवर उपाय म्हणून स्वस्तातले कॅनव्हास मटेरियल वापरायचे त्यांनी ठरवले आणि चक्क ही कल्पना यशस्वी ठरली. लोकांना हे कॅनव्हास शूज आवडले. आर्थिक विवंचनेतील तडजोड म्हणून केलेला उपाय यशस्वी झाला आणि कंपनीतली कामगारांची संख्या १० वरून ५०० वर गेली.

त्याच दरम्यान थॉमस यांच्या कानावर अमेरिकेतील एका मशिनची ख्याती पोहोचली. या मशिनमुळे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणं शक्य होणार होते. थॉमस यांनी हे मशीन आणलं. पहिलं मशिनमेड उत्पादन होतं Batovka. लेदर आणि टेक्सटाइल शूज काम करणाऱ्या मंडळींसाठी हे उत्पादन होतं. पण वजनाने हलके, स्टायलिश आणि परवडणारे. १९०५ पर्यंत कंपनी दिवसाला २२०० जोड बनवून युरोपातली अग्रगण्य फुटवेअर कंपनी बनली. पहिल्या महायुद्धादरम्यान सैन्याची बुटांची गरज बाटा कंपनीने भागवली. मात्र महायुद्धानंतरच्या आर्थिक मंदीने कंपनीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला. किंमती अर्ध्याने खाली उतरल्या. या वेळी कंपनीला कामगारांनी साथ दिली. ४० टक्के पगारकपातीसह काम करायचं कामगारांनी ठरवलं. हा विश्वास कामगारांनी दाखवला कारण थॉमस यांनीदेखील सर्व कर्मचाऱ्यांना या बदल्यात अन्न, कपडे अर्ध्या किमतीत द्यायचे वचन दिले. महायुद्धाच्या वणव्यात अनेक कंपन्या होरपळून निघाल्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे बाटाचे उत्पादन चालू राहिले. कर्मचाऱ्यांबद्दल कंपनीने नेहमीच काळजीचे धोरण दर्शवले. चेक रिपब्लिकमधल्या अनेक हेक्टरवर पसरलेल्या बाटा व्हिलेज मध्ये कर्मचाऱ्यांची उत्तम सोय करण्यात आली. घरे, हॉस्पिटल, वाचनालय अशा सुविधा कर्मचाऱ्यांना दिल्या गेल्या.

दुसऱ्या महायुद्धाचा काळ कंपनीसाठी कठीण होता, पण त्या साऱ्या दिव्यातून कंपनी बाहेर आली.

थॉमस यांनी त्यांच्या हयातीतच ऑड नंबर प्राइसिंगची कल्पना राबवली होती. ही किंमत किंवा दर ठरवण्याची त्यांची अनोखी युक्ती बाटाच्या यशातला महत्त्वाचा पैलू आहे. बाटाची सर्व उत्पादनं पूर्ण किमतीत कधीच नसतात. ४९९ रु, ९९९ रु. अशी त्यांची ऑड फिगर कुतूहलाची आणि मुख्य म्हणजे ग्राहकांच्या मानसिकतेला सकारात्मकतेने बदलण्याची गुरुकिल्ली आहे. ४९९ रुपये किंमत म्हणजे ५०० ला एक कमी असला तरी चारशे शब्दांच्या उच्चारामुळे ग्राहकाला ती रक्कम पाचशेपेक्षा चारशेच्या अधिक जवळची वाटते आणि तो खरेदी करतो. पण फक्त किंमतच नाही तर बाटा म्हणजे विश्वास, बाटा म्हणजे दर्जा हा प्रभावही महत्त्वाचा आहे.

आज ७० देशांत बाटाची ५२०० हून अधिक रिटेल शॉप्स आहेत. दर वर्षी ६० करोड पादत्राणांचं उत्पादन ही कंपनी करते. सर्व वयोगटांतल्या गरजा ती पूर्ण करते. पुरुषांसाठी अ‍ॅम्बेसेडर क्लासिक कलेक्शन, स्त्रियांसाठी मेरी क्लेअर, मुलांसाठी बेबी बबल्स व टफी, वाळवंटी प्रवासासाठी सफारी, स्पोर्ट्ससाठी स्पायकर्स ही व अशी अनेक कलेक्शन्स लोकांना भावली आहेत. भारतात तर पावसाळी चप्पल आणि बाटा यांचे अनोखे नाते आहे. आपल्या बालपणापासून ही कंपनी आपल्याला ताब्यात घेते. टफी हे मुलांसाठीचे शूज कंपनीने खासकरून साऊथ आफ्रिकेतल्या दूरवर चालत जाऊन शाळा गाठणाऱ्या मुलांसाठी बनवले होते, पण ते जगभरात इतके पसंतीस पडले की शाळेचे बूट म्हणून अगदी हमखास काळ्या स्कूल शूजना पसंती मिळाली. तेच बाटाच्या निळ्या पांढऱ्या कॅनव्हास शूजचे. I love my shoes ही बाटाची टॅगलाइन या साऱ्या वैशिष्टय़ांमुळे अगदी तंतोतंत खरी ठरली आहे. पूर्वीचा बाटा या अक्षरांचा काळा लोगो आता लाल झाला आहे. पण दूरवरूनही बाटाचे शोरूम आपण ओळखतो. काही देशांमध्ये बाटा म्हणजे शूज असे समीकरणच आहे, कारण काही गरीब देशांतील स्थानिकांना अन्य उत्पादनच माहीत नाही.

थॉमस जे. बाटा यांचे १ सप्टेंबर २००८ रोजी निधन झाले.

https://www.youtube.com/watch?v=MvWIfAEbPU8

https://www.youtube.com/watch?v=IoDw1B7Bf8s

https://www.youtube.com/watch?v=yblGH71_pi4

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..