नवीन लेखन...

महाराष्ट्र महिला आयोगाच्या आधारस्तंभ – सुशीबेन शहा

“समाजकारणाचे धडे आणि संस्कार जेव्हा घरातूनच दिले जातात त्यावेळी ती व्यक्ती सुजाण नागरिक बनण्याकडे पाऊले टाकत जाते, तीच्या या सुजाण आणि गुणगाथेमुळे उत्तम समाज निर्मिती होऊन एक प्रबळ राष्ट्राकडे आपण वाटचाल करत राहतो, पण यासाठी असावी लागते बदल घडवून आणण्याची दृढ इच्छाशक्ती, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षापदी नियुक्त झालेल्या सुशीबेन शहा यांच्यासोबत बोलल्यावर कुठेतरी जाणीव होत राहते की महिलांच्या प्रश्नांवर, समस्येवर तोडगा निघून त्यांना समानता, न्याय आणि हक्क मिळून देण्यात यशस्वी ठरतील. भारतात महिलांनी चालवलेली पहिली टॅक्सी “ प्रियदर्शनी ” सुरू करण्याचा बहुमान सुशीबेन शहा यांना जातो.एक यशस्वी कायदेतज्ज्ञ ,सामाजिक आणि राजकसाणात हरहुन्नरीने कार्य करणार्‍या सुशीबेन शहांच्या कामगिरी आणि महाराष्ट्रातील महिलांच्या प्रश्नांविषयी केलेली ही “एक्सक्लुझिव्ह” बातचीत फक्त मराठीसृष्टी.कॉम वर.”

प्रश्न : महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तुमची नेमणूक झाल्यानंतरची भावना काय होती ?
सुशीबेन शहा : माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार मिलींद देवरा यांनी माझ्या कामगिरीवर विश्वास ठेवून मला या पदासाठी योग्य समजले आणि नेमणूक केली त्यावेळी निश्चितच मला खूप आनंद झाला, आणि त्यावेळी असे वाटले की महाराष्ट्रातील महिलांच्या न्याय, हक्क आणि त्यांच्या मुलभूत अधिकारांसाठी सर्वतोपरीने प्रयत्न करीन आणि मिळालेल्या संधीचा समाजातील महिलांसाठी फायदा करुन देईन.
प्रश्न : अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर स्त्रीयांचे असे कोणते प्रश्न होते जे प्रामुख्याने तुम्हाला वाटले की यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे ?सुशीबेन शहा : २०१३ साली कामाच्या ठिकाणी होत असल्याने लैंगिक छळ विरोधी कायदा पारित करण्यात आला, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, यासाठी आम्ही निमसरकारी संस्थांचा सल्ला देखील घेतला होता, तर त्यांच्याकडून मिळालेल्या रेकमेंडेशन घेऊन सरकार दरबारी जाणार आहोत आणि या कायद्या अंतर्गत काम कसं करुन घ्यायचे असा प्रस्ताव आम्ही सरकारला देणार आहोत व आय सी सी खासगी आस्थापने व कार्यालयांमध्ये देखील असावी यासाठी प्रयत्न करणार आहोत.
प्रश्न : महाराष्ट्रातील मुंबई-पुण्या सारख्या शहरात आज कुठेतरी महिलांना असुरक्षित असल्याची भावना जाणवू लागली आहे, तर तुमचं नेमकं निरीक्षण काय आहे ?
सुशीबेन शहा : निरीक्षण सांगायच झालं तर मल असं वाटतय की पहिल्या पेक्षा आत्ताची स्त्री खुप जागृत हुशार आणि धाडसी झाली आहे, तरीपण जर त्यांना असुरक्षित वाटत असेल तर सर्वप्रथम त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवावी. आपल्याकडे आय. पी. एस आणि डी. सिो. पी.एने देखील एक अध्यादेश जारी केला आहे की एखादी महिला पोलीस स्टेशन कोणत्याही स्वरुपाची तक्रार नोंदवण्यासाठी आलीच तर सर्वप्रथम एफ. आय आर करुन घ्यावा जेणे करुन तिच्यावर झालेल्या अन्याय किंवा छळायाबाबतचा तपास करता येईल आणि पुढची कार्यवाही करण्यास सोपे जाईल, त्याशिवाय तुमच्या माध्यमातून मी हे देखील सांगू इच्छिते की तुमच्यावर अन्याय होत असेल किंवा शारिरीक, मानसिक स्वरुपाचे छळ होत असतील तर धैर्याने ही बाब आमच्या निदर्शनास आणून घ्या कारण तक्राराची लेखी नोंद झाल्याशिवाय आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीच पाऊलेव उचलू शकत नाही.
प्रश्न :महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या कोणत्या स्वरुपातील तक्रारी महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत ?
सुशीबेन शहा : “अटॉसिटी अगेनस्ट वुमन ”सेक्शुअल असॉल्ट” मिसिंग केसेस सर्वाधिक आहेत. यामध्ये काही केसेसच्या हिअरींग मी स्वत: घेते पण मुलींवर लैंगिक अत्याचार यासारखे गुन्हाचं प्रमाण जास्त आहे असं मी म्हणेन
प्रश्न : गुन्हा घडूच नये यासाठी नैतिक मूल्ये खूप भक्कम असावी लागतात तर ही नैतीक मूल्ये प्रत्येकामध्ये रुजवण्यासाठी महिला आयोग कशा पध्दतीने प्रयत्नशील असेल ?
सुशीबेन शहा : शाळा तसच महाविद्यालयीन स्तरावर आम्ही स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्यावर मार्गदर्शन करण्याच्या विचार आहोत की आपल्याकडे मुलगा-मुलगी अशी तुलना आणि भेद ज्यावेळी संपेल तेव्हा कुठे स्त्रीयांवर अत्याचचार होण्याचे प्रमाण थांबेल. त्यासाठी सर्वप्रथम ही सुरुवात आपल्या प्रत्येकापासून होणे गरजेचे आहे असं मला वाटते, म्हणजे यामध्ये आयोग, शासन, प्रशासन, राजकीय इच्छाशक्ति सामाजिक दृष्टीकोन आणि आपल्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींची जबाबदारी आहे नैतिकता टिकून ठेवण्यासाठी, तेव्हा कुठे गुन्हावर प्रतिबंध घालता येइल.
प्रश्न : समाजातील तळागळातल्या महिला सर्वार्थाने सक्षम बनण्यासाठी तुमच्याकडे कोणता आराखडा आजमितीला तयार आहे?
सुशीबेन शहा : मी सरकारपुढे एक रुपरेषा मांडली आहे जी याआधी कोणी मांडली नसेल, स्त्रीयांवर होण्यार्‍या अत्याचाराचं प्रमाण पाहता डिव्हिजन हेडक्वार्टर ला एक खंडपीठ स्थापना करावयास हवा तर एखादी पिडीत महिला तक्रार घेऊन आली तर तिला न्याय मिळाला का याचा आढावा दर तीन महिन्यानी घेण्यात येईल दुसर म्हणजे आम्ही “महिलांनी महिलांसाठी ”(वुमन फॉर वुमन) संकेतस्थळाचे उदघाटन करतोय यासाठी स्वयंसेवक महिलांना आमंत्रित करुन महिलाच्या हक्कांसाठीचे प्रशिक्षण देणार आहोत, म्हणजे समजा एखादी निराधार स्त्री अडचणीत असेल तर तिचे अधिकार कोणते एखाद्या स्त्रीवर शारीरिक मानसिक अत्याचार झाला असेल तर तिने प्रथम कोणते कायदेशीर पाऊल उचलले पाहिजे यासाठी सर्वपरिने मार्गदर्शन कसं करता येईलहे समजवून सांगण्यात येईल. आणि अश्या पध्दतीने महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला एकत्रित काम करण्याचा आमचा मानस आहे.
प्रश्न : महिला दिनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील महिलांना तुम्ही काय सांगू इच्छिता ?
सुशीबेन शहा : मी इतकच सांगू इच्छिते की सर्व महिलांनी एकत्रित होण्याची गरज आहे. कारण कामाच्या ठिकाणी असा एक प्रसंग, मला दिसून आला होता की एका महिलेवर गैरवर्तणूक केली गेलेली, जेव्हा ती महिला तक्रार नोंदवतेय असे जेव्हा त्या कार्यालयातील पुरुषांना कळले त्यावेळी तिच्या विरोधात सर्व एकजुटीने उभे राहिले, आज जर का त्या महिले सोबत इतर स्त्रीयांनी तिच्या बाजूने उभं रहाण्याचा प्रयत्न केला असता तर तिची अन्याया विरोधातली लढाई अधिक सोपी होऊ शकली असती, तेव्हा सर्वच स्त्रीयांनी एकजुटीने, मिळून काम करण्याची गरज आपल्या समाजात निर्माण झालेली आहे.
प्रश्न : चार वर्षांनंतर महाराष्ट्र महिला आयोगाला अध्यक्ष लाभला आहे तर तुमच्या नियुक्ती नंतर असं वाटतय की समाजात काही फरक पडतोय?
सुशीबेन शहा : फरक नक्कीच पडला आहे कारण मराठवाडा, विदर्भातील महिला त्यांच्या तक्रारी घेऊन आपलेपणाने माझ्याकडे येताहेत, एक विश्वास निर्माण झालाय की आपली व्यथा ऐकणारा हक्काचा आयोग पुन्हा कार्यान्वित झाला आहे, मी सुद्धा शक्य तेवढे त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करत असून दूरध्वनी द्वारे संपर्कात राहण्याचा प्रयत्नात आहे.
प्रश्न : स्थानिक स्वराज्य संस्था ५०% आरक्षण मिळालं असलं तरी सुद्धा बर्‍याचदा त्यांचे पती त्यांच्या वतीने कारभार सांभाळताततर याबाबतीत तुमचे मत काय?
सुशीबेन शहा : मी ही समस्या नक्कीच नाकारणार नाही, असे प्रकार घडत असतील पण अपवाद आहेत या घटना, इथे सुद्धा बदल होईल कारण एखादी नवीन महिला सुरुवातीला हस्तक्षेप करुन देत असेल, पण या घटनांमधून ती शिकेल आणि पुढच्या कार्यकाळात कदाचित ती कोणत्याच पुरुषाचा किंवा विरोधकाचा हस्तक्षेप सहनच नाही करणार शिकून ती प्रगती करेल असे मला वाटते, पण भविष्यकाळात हे चित्र संपूर्णत: बदलेल याची मला पूर्ण खात्री आहे.
प्रश्न : आयोगाचं अध्यक्ष पद स्वीकारल्या पासून आणि सामाजिक क्षेत्रात वावरताना तुम्हाला कुटुंबियांकडून कशा प्रकारे पाठिंबा मिळतोय ?
सुशीबेन शहा : पाठिंबा आणि सहकार्य असल्याखेरीज मी इथपर्यंत पोहचू शकले नसते, माझे पती, सासरे हे स्वत: राजकारण आणि पार्श्वभूमीचे असल्यामुळे मला व्यक्तीगत आयुष्यात अगदी मोलाचं सहकार्य मिळालं आहे.

संपादक – निनाद प्रधान

तांत्रिक सहाय्य – सुमित्र माडगूळकर

संकल्पना, निमिर्ती व संकलन – सागर मालाडकर

निर्मिती सहाय्य – आदित्य देशपांडे

छायाचित्र संकलन – पुजा प्रधान, आदित्य देशपांडे आणि सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..