नवीन लेखन...

धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही

डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा भारतातील बहुतेकांसाठी धक्कादायक ठरला. अतिरेकी कारवाया करणारे आणि अमेरिकेसाठी धोकादायक असलेल्या लोकांना नक्कीच जरब बसणार आहे. प्रामाणिक काम करणारे भारतीय यांच्या साठी काही अडचण असणार नाही.खोटी कागदपत्रे तयारकरून गैर मार्गाने अमेरिकेत राहणारे मात्र धास्तावले आहेत.ज्यांची पात्रता नाही त्यांना आता अमेरिकेत राहणे अत्यंत कठीण होणार आहे.हुशार आणि मेहनती भारतीय अभियंते , डॉक्टर ,अर्थतज्ज्ञ , संशोधक मंडळी यांच्या साठी . अमेरिकेच्या नव्या अध्यक्षां कडून काहीही त्रास होणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणांवरून बेहिशेबी काळा पैसा बाहेर पडू लागला आहे. मुंबईसह अन्य बड्या शहरांत अनेक ठिकाणांवर छापे टाकल्याचे समजते. सराफा व्यावसायिक आणि हवाला ऑपरेटर्स यांच्यावर ही कारवाई झाली.राजकारणी मंडळी यांना सुद्धा हा मोठा धक्का आहे .देशात न भूतो न भविष्यती अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.सर्व सामान्य जनता या सर्व निर्णयाचे स्वागत करीत असून राजकारणी मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत .
शेटजी भटजींचे सरकार म्हणून टीका करणारे सुद्धा डोळे बारीक करून या सर्व घटनेचा फियास्को होतॊय कधी आणि आम्ही टीका करतोय कधी याचीच वाट पाहत आहेत.काळाबाजार करणारे , लोकांना लुबाडणारे,करबुडवण्याच्या क्लुप्त्या करणारे कितीही स्थितप्रज्ञ असल्याचा आव आणीत असले तरी धास्तावले आहेत.
मी कोणी स्वतःला अर्थ तज्ज्ञ समजत नाही पण या सर्व घटने कडे पाहिल्यावर मला नक्कीच काही सूचना करण्याचा मोह आवरत नाही .

१) डेबिट किंवा क्रेडिट कार्ड याचा वापर व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. अनेक व्यापारी कार्ड नि रक्कम स्वीकारतात.पण यासाठी प्रत्येक व्यवहारावर त्या व्यापारी आस्थापनेला सुमारे १.५ टक्का संबंधित बँकेला द्यावे लागतात .हि रक्कम वसूल करणे रद्द केले पाहिजे. “सोनार” कार्ड द्वारे रक्कम स्वीकारण्यासाठी ग्राहकाला प्रोत्साहन न देता उलट ग्राहकावर जर तयार दागिने नसतील आणि शुद्ध सोने खरेदी करायचे असेल तर बँकेला भरावी लागणारी रक्कम ग्राहक कडून वसूल करतात.परिचयाचा सोनार असेल तरच तो चेक स्वीकारतो.त्यामुळे ज्याठिकाणी ५००० पेक्षा ज्यास्ती लोकसंख्या आहे त्या शहरात सर्व व्यवहार डेबिट /क्रेडिट कार्ड ने करण्याची सक्ती केली पाहिजे. हल्ली पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत.लहान व्यापारी सुद्धा या मशीन चा वापर करून कार्ड नि पैसे स्वीकारू शकतात.
परंतु या कार्ड चा वापर मोफत असला पाहिजे.व्यापारी आणि ग्राहकाला त्याचे कार्ड मोफत वापरण्यासाठी बँकेने सर्व चार्जेस रद्द करण्याची गरज आहे.

२) शंभर रुपयाच्या नोटेचा आकार थोडा कमी करून १०० रुपयांवरचे सर्व चलन रद्द केले पाहिजे.५०० , १०००, २००० चे चलन पुन्हा बाजारात आणणे म्हणजे पुन्हा काळा पैसे साठवण्यासाठी प्रोत्साहन देण्या सारखे आहे.नव्या नोटा चलनात स्थिरावल्यावर पुन्हा लाचखोर हे पैसे साठवत राहतील.

अर्थात मोदी यांचे सरकार सर्व निर्णय देशाच्या उन्नती साठीच घेत आहेत यावर सध्यातरी ठाम विश्वास ठेवून जनता आहे. श्रीमंतांचे हक्क अबाधित ठेवून ( कारण सर्वच श्रीमंत लोक चोर असतात हे म्हणणे चुकीचे ठरेल ) गरीब आणि श्रीमंत यातील दरी दूर करण्याचे आणि फुकट खाणारे आळशी लोकांना कामाला लावण्याचे शिव धनुष्य नरेंद्र मोदी सरकार उचलेल या बद्दल माझ्या मनात शंका नाही.पंतप्रधानांचा हेतू प्रामाणिक आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.फक्त त्यांना चांगल्या लोकांची साथ मिळाली पाहिजे. पुढील सर्व धक्के सुखद असतील असे मला वाटते.

धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही.

चिंतामणी कारखानीस —

11 Nov 2016

 

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..