नवीन लेखन...

लोकल ट्रेनमधील अपघातांच्या निमित्ताने !

The Accidents in Mumbai Local Trains

माणसाला वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी रोज कुठल्याना कुठल्या वाहनाने प्रवास हा करावाच लागतो. मग तो सायकल, स्कूटर, मोटार, बस, बोट-होडी, रेल्वे किंवा विमान असो. प्रवास करतांना अपघात होतात म्हणून प्रवास करण्याचे टाळता येत नाही.

मुंबईच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात रेल्वे ही आपल्या दैनंदिन जीवनाचा खुप मोठा हिस्सा बनली आहे. रोजची गर्दी, डब्यातील भांडणं आणि मार्‍यामार्‍या या सगळ्यांमुळे आपला ट्रेनचा प्रवास नकोसा वाटतो. परंतु रेल्वेनं प्रवास करताना जर आपण काही नियम पाळले तर हा प्रवास सुखकर होऊ शकतो. वेळ वाचवण्यासाठी रेल्वे फाटकांचा किंवा पुलांचा उपयोग न करता रुळ ओलांडले जातात आणि घाईने ट्रेन पकडली जाते. आपल्या जीवा पेक्षा महत्त्वाची कोणतीही गोष्ट असू शकत नाही हे लोकांना माहित असूनही लोकं तीच चूक परत करत असतात.

रूळ ओलांडतांना ट्रेनचा धक्का लागून, अति गर्दीच्या रेट्यामुळे दारात लटकतांना रेल्वेचे खांब डोक्याला लागून, डब्यात चढतांना गाडी सुटल्याने पडून, लेव्हल क्रोस्सिंगमधून लाल सिग्नल असतांना मोटार, ट्रक, बैलगाडी जाताना झालेले अपघात आणि त्यांच्या कारणांचा अभ्यास करण्याआगोदर आधीची मुंबई, लोकसंख्येने वाढलेली मुंबई आणि ट्रेनचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे त्याशिवाय वरील अपघातांची मीमांसा करता येणार नाही.

मुंबई ते ठाणे ही पहिली प्रवासी आगगाडी १६ एप्रिल, १८५३ साली धावली. त्याकाळातील ट्रेनचा इतिहास पुस्तकातून वाचताना मजा येते असे. उदा. ’गाडीची रांग’ असा शब्द train अशा अर्थाने वापरला आहे. त्याकाळी गाडयांना ब्रेक लावून थांबवण्याची पद्धत नव्हती, त्याऐवजी गाडी स्टेशनात पोहोचण्याच्या अलीकडेच इंजिन आणि डबे ह्यामधील जोड काढून टाकून इंजिन वेगाने पुढे जाई आणि किल्लीवाला विशिष्ट स्थानी ते इंजिन पोहोचताच रूळ बदलून इंजिनाला शेडकडे पाठवी आणि लगेच किल्लीने रूळ पहिल्यासारखे करून त्यांवरून उरलेले डबे हळू वेगाने घरंगळत स्टेशनाकडे जात असतं असे वर्णन आहे. शेडमध्ये इंजिनाच्या तोंडाची दिशा बदलण्यासाठी एका फिरत्या गोल प्लॅटफॉर्मवर इंजिनास आणून तो प्लॅटफॉर्म पुरेसा फिरवण्याची पद्धत होती. तरीही कुठे अपघात झाल्याची नोंद नाही. त्यावेळी मुंबईच्या लोकसंख्येच्या मनानी इमारती, रस्ते, खाजगी वाहने, सार्वजनिक वाहतूकीची साधने फारच कमी होती. परंतू त्यानंतरच्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळ आणि नंतरच्या ६८ वर्षात मुंबईची वाकडीतिकडी वाढ कशी झाली, विस्तार किती वाढला, मुंबईच्या लोकसंख्येत किती वाढ झाली. त्यात वाढणाऱ्या इमारती, रोज खाजगी वाहनांची त्यात पडणारी भर, आणि सातत्याने क्षेत्रफळात आडवी नाहीतर उभी झालेली वाढ. मुंबईतील रेल्वे प्रवासात लहान मुलं/मुली, विद्यार्थी, स्त्रिया आणि जेष्ठ नागरिकांचे होणारे हाल आणि अपघात त्यात आलेले कायमचे अपंगत्व, मृत्यू, हे न संपणारे दुष्टचक्र आहे. असो.

आता दुसरा मुद्दा घेऊया. सध्याच्या ट्रेन कमी पडतात म्हणून, मेट्रो, मोनो सारख्या ट्रेन सुरु झाल्या आहेत आणि अजून त्यांचा विस्तार होणार आहे, तरी डब्यातील गर्दी कमी होणार नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही कमी होणार नाही. यावर तोडगा म्हणून अंतर्गत सीटची रचना बदलण्यात येणार आहे. सध्याच्या ३x३ च्या ऐवजी २x२ म्हणजे मधल्या मोकळ्या जागेत जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. तुम्हांला वाटतं यांनी डब्यातील गर्दी कमी होईल? काय अंदाज आणि अनुभव आहे एवढ्या वर्षांचा? मुंबईच्या सिंगल ट्रेनची डबलडेकर केलीत, १२ डब्या ऐवजी १५ अगदी मेल पॅसेंजर सारखे डब्बे केलेत तरीही गर्दी कमी होणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

मध्यंतरी ऑफिसच्या वेळाही बदलून बघितल्या, काय झाले? काही फरक पडला नाही. दक्षिण मुंबईतील बऱ्याच बँकांची मुख्य ऑफिसेस बीकेसी, बांद्रालाही शिफ्ट करून बघितले, दक्षिण मुंबईतले बरेच घाऊक बाजार वाशी नवीमुंबईत हलवले तरी गाड्यांची गर्दी काही कमी होत नाही. अश्या कामचलाऊ प्रायोगिक बदलाने गर्दीवर काही परिणाम होणार नाही. त्यासाठी खालील गोष्टींचा गांभीर्याने विचार होणे येणाऱ्या काळासाठी खूप महत्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतर फक्त मुंबई आणि परिसराचा विकास वेगाने झाला आणि त्यामानाने इतर राज्यांतील गाव-खेड्यांचा आणि शहरांचा विकास त्यामानाने न झाल्याने देशातील सर्व राज्यांतील नागरिक मुंबईकडे पोट भरण्याचे किंवा उदारानिर्व्हाचे साधन आणि आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची वाट धरते झाले आणि मुंबईतच स्थाईक झाले. याने मुंबईची लोकसंख्या झपाटयाने वाढू लागली. नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा अपुऱ्या पडू लागल्या, रोज नवनवीन प्रश्न पुढे येऊ लागले आणि त्यावर फक्त नुसती मलंमपट्टी सरकारकडून होत राहिली. मुळातून प्रश्न सुटले नाहीत आणि अजून तसेच पडून आहेत. त्याकडे कुठल्याही सरकारने वेळीच सावध होऊन लक्ष घातले नाही किंवा प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत असेच नाईलाजाने म्हणावे लागत आहे. त्याची वरील सर्व फळे आज मुंबईकरांना भोगावी लागत आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही.

१) मुंबईची लोकसंख्या आटोक्यात राखण्यासाठी काही महत्वाचे आणि कठोर निर्णय घ्यावे लागतील त्यासाठी पुढील योजना राबवाव्या लागतील :-

अ) मुंबई सोडून इतर राज्यांतील गाव-खेड्यांचा आणि शहरांचा विकास पर्यावरण रक्षणाचे भान ठेऊन झपाटयाने होण्याची गरज आहे. (जसे स्मार्टसिटीज)
आ) त्यासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना चालना द्यावी लागेल.
इ) मोठ्या कारखान्यांची निर्मिती करून नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
ई) गाव-खेड्यातील मुलांसाठी उच्च दर्जाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण अल्पदरात गाव-खेड्यातच उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा लागेल.
उ) जलद आणि सुरक्षित दळणवळणाची साधने निमार्ण करावी लागतील त्यासाठी रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतुकीच्या निर्मितीवर भर द्यावा लागेल. त्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूद करावी लागेल.
ऊ) अखंड वीजपुरवठा मिळण्यासाठी नवीन उर्जास्त्रोत वाढवावे लागतील त्यासाठी सौरऊर्जा, पवनचक्की, अणुउर्जा असे पर्याय शोधावे लागतील आणि ते अल्पदरात उपलब्ध करून द्यावे लागतील.
ऋ) शुद्ध आणि स्वच्छ पाण्यासाठी पावसाचे मान बघून छोटया-मोठ्या धरणांची निर्मिती किंवा लहान-मोठे पाठबंधारे, जलयुक्त शिवारांची योजना राबवावी लागेल. तसेच इतर सुख-सुविधा देण्यासाठी प्रर्थमिकतेवर भर द्यावा लागेल तरच मुंबईवरील ताण कमी होईल.
ऌ) इंटरनेटचा जमाना असल्याने आणि सर्व व्यवहार पारदर्शक किंवा भ्रष्टाचार विरहित करण्यासाठी नेटवर्कची सेवा उत्तम आणि अखंड पुरविण्यासाठी उच्च विज्ञान/तंत्रज्ञानाची आवश्यकता निर्माण करावी लागेल.
ऍ) शासनाचे निर्णय-प्रक्रिया आणि अंमलबजावणी त्वरित आणि शासनाच्या कार्यकुशल अधिकाऱ्यांच्या मार्फत एक खिडकी योजने अंतर्गत राबवाव्या लागतील.
ऎ) अंतर्गत सुरक्षितता, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेकारी यावर आधीपासूनच ठोस योजना राबवाव्या लागतील.
या आणि अश्या कित्येक गोष्टींचा इच्छाशक्तीच्या जोरावर आणि सकारात्मक विचार करून निर्णय आणि अंमलबजावणी केली तर कदाचित सध्या असलेल्या ट्रेन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि संसाधने मुंबईतील नागरिकांचे प्रवासाचे आणि इतर समस्यांची उत्तरे मिळविण्यासाठी थोड्याप्रमाणात का होईना वर्तमानात मार्ग सापडेल असे वाटते. प्रामाणिक प्रयास करणे आपल्या हातात आहेत त्याला यश देणं त्याच्या हातात आहे.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..