नवीन लेखन...

वस्त्रालंकारजन्य घर्षण – पूर्वार्ध

आपण व्यवहारात रेशमी वस्त्रे, लोकरीची वस्त्रे, सोन्या-चांदीचे अलंकार इत्यादींचा वापर करीत असतो. त्यांच्या परिधानांमुळे होणाऱ्या घर्षणाने नकळत त्यांचे फायदेही मिळत असतात; परंतु त्याचा जाणीवपूर्वक विचार केला जात नाही, तो करणे अत्यंत आवश्यक असते. उदा. रेशमी वस्त्र परिधान केल्यामुळे स्वाभाविकपणे शरीराच्या हालचालींबरोबर शरीरामध्ये घर्षण निर्माण, वीज निर्माण होते व त्याचा रक्ताभिसरण क्रियेला उपयोग होतो.

रेशमी वस्त्राचा स्पर्श सुखकारक व मृदू असल्याने कृश व्यक्तीला तो पुष्टीकारक ठरतो.
त्यामुळे वातदोषाचे शमन होते. उलट लोकरीच्या वस्त्राचा स्पर्श रुक्ष असतो. त्यामुळे त्वचेतील मेदाचे व कफदोषाचे विलयन होण्यास मदत होते. त्यामुळे स्थूल व्यक्तीने लोकरीचे वस्त्र परिधान करणे हितकारक असते.

असे वस्त्राप्रमाणेच अलंकाराचाही आपणास फायदा होतो. अस्थिधातू असार असेल तर मोती, कवड्या, शिंपले यापासून बनलेल्या अलंकाराचा उपयोग करावा, आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. तर बुद्धी व सौंदर्य याची वृद्धी व विकास करण्यासाठी सोन्या-चांदीच्या अलंकाराचा उपयोग करण्यास सांगितले आहे. म्हणूनच सोन्या-चांदीचे अलंकार धारण करण्याची प्रथा पूर्वीपासूनच पडली असावी.

अशा प्रकारे आपले जीवनच घर्षणमय आहे. व कळत-नकळत आपण घर्षणाचा उपयोग करीत असतो आणि आपल्याला त्याचा आरोग्याच्या दृष्टीने फायदाही होत असतो. अशा घर्षणाकडे आज आपण डोळसपणे पाहणार आहोत. ते आपल्याला उपकारक कसे करून घेता येईल ते बघणार आहोत. त्यासाठी घर्षणाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून ते शरीराला फायदेशीर व्हावे याकरिता मार्ग शोधणार आहोत. या शोधकार्यात जे घर्षण प्रकार अनुकूल आढळतील त्याचा स्वीकार करणे हे आपल्याला हिताचे आहे.

घर्षणाची व्याख्या घर्षण म्हणजे घासणे. रेशमी व लोकर या वस्त्रांच्या साहाय्याने शरीर घासण्याची जी क्रिया तिला ‘घर्षण’ म्हणतात. घर्षणाचा प्रथम संपर्क त्वचेची येतो. घर्षणाची साधने- घर्षणाचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे हात आहेत.

हाताच्या जोडीला दुय्यम साधन म्हणून रेशमी किंवा लोकरीच्या वस्त्रांचा उपयोग केला जातो. त्या वस्त्रांचा हातमोजा हातात घालून घर्षण केले जाते किंवा वस्त्राचा मफलर आकाराचा पट्टा दोन्ही हातांनी धरून घर्षण केले जाते.

शुभदा पटवर्धन
मराठी विज्ञान परिषद,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..