नवीन लेखन...

तेनालीरामाचे वाक्चातुर्य

तेनाली रमण एकदा सपत्नीक मित्राच्या विवाहास जात होते. लग्नसमारंभाला जायचे म्हणून पत्नी महागडी साडी आणि दागिन्याने लखलखलेली होती. चारचौघात उठून दिसावे म्हणून तिने सर्व काळजी घेतली होती.

दोघेही रमत गमत रस्त्याने चालत होते. अचानक पाठीमागून एक उधळलेली बैलगाडी येताना तेनालीरामला दिसली. ते पाहून तेनालीरामाने पत्नीला वाचवण्यासाठी तिला चटकन मागे खेचले. या धांदलीत दोघेही तोल जाऊन खड्ड्यात पडले.

तेनालीरामच्या पत्नीची साडी चुरगळली, धुळीत माखली. तिच्या सगळ्या उत्साहावर पाणी फिरले. ती तेनालीरामला म्हणाली, “ हे काय केलेत तुम्ही, माझी सगळी साडी खराब झाली. आत्ता या अवतारात मी कशी लग्नाला येऊ? मी नाही येत जा.” पत्नीला कुठे खरचटले नाही, म्हणून तेनालीरामने स्वत:चे समाधान केले होते; पण पत्नीचा आता लग्नाला न जाण्याचा हा पवित्रा पाहून तो क्षणभर बुचकळ्यात पडला. पण लागलीच त्याने पत्नीच्या मानसिकतेला गालातल्या गालात हसून दाद दिली आणि म्हणाला, “त्यात काय एवढं. जे झालं ते बरंच झालं. यानिमित्ताने आपण आता नवीन साडी खरेदी करू शकतो.”

तात्पर्य, काही चांगले करण्याच्या प्रयत्नात कधी अडथळे येतात; अशा वेळी वाईट वाटणं स्वाभाविक असलं, तरी स्वत:ला वा परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि योग्य पर्याय स्वीकारून पुढे जावे. त्यातच खरा आनंद आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..