नवीन लेखन...

ताटातूट – एकांकिका

प्रवेश ७ वा
मंदार घरी येतो तेव्हा बाबा घरी असतात व आई बाहेर गेलेली असते.
मंदार – बाबा तुमच्याशी मला थोडं बोलायचंय.
बाबा – ठाऊक आहे मला. आईने तुझे कान फुंकले असतील. तू तिचाच लाडका. बोल काय बोलायचंय ते.
मंदार – तुमच्या मनात डायव्होर्सचा विचार आलाच कसा?
बाबा – मला वाटतं मंदार …..डायव्होर्स हा एक राजमान्य तोडगा आहे. मी बराच विचार केलाय हया विषयावर. कदाचित तुझ्या आईलासुध्दा पटेल हा मार्ग.
मंदार – शक्यच नाही. आई कधीही मान्य करणार नाही.
बाबा – अरे रोज उठून कोण झगडा करत बसणार? तिलाही एक फ्रेंड मिळालाय. संध्याकाळी न चुकता ते दोघे भेटतात एकमेकांना.तिलाच माझा आता कंटाळा आलाय. आय कॅन अंडरस्टँड. गेली चाळीस वर्ष आम्ही एकत्र आहोत. म्हणतात ना ‘अतिपरिचयात अवज्ञा’ तसं झालंय आमचं. म्हणूनच तिला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं ठरवलंय मी.
मंदार – तुम्हाला आठवतंय बाबा …माझ्या लग्नानंतर आपण सर्वानी एकत्र ‘तू तिथे मी’ हा सिनेमा पाहिला.तो आम्हाला
एव्हढा भावला की मी आणि अण्णानं ठरवून टाकलं की काय वाटटेल ते झालं तरी तुमच्या दोघांची ताटातूट होऊ द्यायची नाही. आणि खरोखरच आत्तापर्यंत तुम्हा दोघांना कधीही वेगवेगळया ठिकाणी पाठवलं नाही. इन फॅक्ट शेखरला सांगून मस्कतसाठी तुम्हा दोघांना व्हिसा मिळावा म्हणून ओमानच्या राजदुताला आपल्या अण्णाने दिल्लीवरून दबाव टाकला.
बाबा – मला कल्पना होतीच. दिपूनेच काहीतरी करून….ते जाऊ दे.तुम्ही मुलं काळजी करू नका.तुमच्या आईला मी काहीही कमी पडू देणार नाही. ती इथे राहिली किवा कुठेही राहिली तरी सुखात राहील. डायव्होर्स पेपरवर मी केव्हाही सही करायला तयार आहे. आणि दोघांच्या कंन्सेंटमुळे कोर्टसुध्दा……
मंदार – तुमच्या दोघांची गाडी इथपर्यत येऊन पोहोचली आणि आम्हाला काहीसुध्दा कल्पना नाही! आम्हा सर्वांना केव्हढा हादरा बसेल याचा साधा विचारही केला नाही तुम्ही?
बाबा – अरे राजा अशाने आपली नाती थोडीच तुटणार आहेत? मी तुमच्या दोघांकडे येत जाईन अधून मधून. शिवाय
फोनवरून आपला काँटॅक्ट राहीलच की.
मंदार – आणि आइचं काय? तिनं कुठे राहायचं?
बाबा – आत्ता ती कुठे गेली ठाऊक आहे तुला ?
मंदार – हो. देवळात जाऊन येते म्हणाली.
बाबा – खाडीवर जाऊन बघ. त्या नानाबरोबर गुलुगुलू गप्पा मारीत बसली असेल वाळूवर.
मंदार – खाडीवर शंकराचं देऊळ आहे. संध्याकाळी बरेच लोक जातात तिकडे. वाटेत तिला चार माणसं भेटली तर
तुम्हाला आईचा संशय?
बाबा – इकडे काय चाललंय हे तुला कसं कळणार? मी चारवेळा माझ्या डोळयांनी पाहिलंय.
मंदार – अच्छा! म्हणून तुम्ही वृध्दाश्रमाचा मार्ग शोधलात.त्या बयोचा फोटो दाखवा पाहू ! असेलच तुमच्याजवळ.
बाबा – काहीतरीच तुझं. अरे त्या वृध्दाश्रमात वाळीत टाकल्यासारख्या त्या चार बायका. त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी
म्हणून मी तिकडे कधीकधी जातो तर ते सुध्दा तुझ्या आईला….
मंदार – अस्सं! म्हणून तुम्ही तो डायव्होर्सचा ड्राफ्ट तयार ठेवलात.
बाबा – (चमकून) तुला कुठे मिळाला तो? बघितलस….तुझ्या आईची किती पाळत असते माझ्यावर ! म्हणूनच
वीट आलाय मला.

मंदार – बाबा हया गोष्टीचा केव्हढा बभ्रा होणार हे ठाऊक नाही तुम्हाला? मी आत्ताच फोन करून अण्णाला बोलवून घेतो.(खिशातून मोबाइल काढून बाहेर जातो. तेव्हढयात आई येते.थोडयाच वेळात मंदार आत येतो.) आई…..मी जरा चारूकडे जाऊन येतो.

आइ – जेवायला येणार आहेस ना…..मी थांबणार आहे तू येइपर्यत.
बाबा – चारू म्हणजे प्रधान ना रे?
मंदार- हो. माझा क्लासमेट.
बाबा – पण तू दिपूशी बोलणार होतास त्याचं काय झालं?
मंदार – अण्णानेच त्याच्याकडे जायला सांगितलय. त्याचे वडील विलासकाका….नामांकीत काउंन्सिलर आहेत.
त्यांचा सल्ला घेऊन येतो. आलोच मी तासाभरात. (मंदार बाहेर पडतो.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..