नवीन लेखन...

तक्षशिला – भारतातील प्राचीन विद्यापीठ – भाग 4

तक्षशिला – प्रवेशाची पद्धत

प्रवेश सर्व जातीना मुक्त होता. कोणी कोणता अभ्यासक्रम घ्यावा यांची प्रत्येक विद्यार्थ्याला मुभा होती.त्यावर कोणतेही बंधन नव्हते.जे काही शिकवले जाई,ते ज्ञानासाठी होते. एखाद्या उपजीविकेचे साधन म्हणून सिद्धीचा वापर केला जात नसे,ती प्राचीन भारतात समस्या नव्हती. अश्या पद्धतीने आपण पाहू शकतो की विद्यापीठात कशी लोकशाही अस्तित्वात होती.वेगवेगळ्या जातीच्या विद्यार्थ्याना एकत्र शिक्षण घेता येत असे.विद्यार्थिनसाठी सर्वसाधारण नियम बनवले जात असत मग त्याची आर्थिक व सामाजिक स्थिति कशीही असो.विषयाची योग्य पार्श्वभूमी असेल तर विद्यार्थ्याला विनामूल्य प्रवेश दिला जाई.अर्थात विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कसून परीक्षा घेतल्यावरच त्याला प्रवेश मिळे.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास,स्पष्टवतेपणा स्वाभिमान त्याच्या प्रवेशाच्या आड येत नसे. उलट शिक्षक अश्या विद्यार्थ्यांच्या शोधात असत.उलट असे विद्यार्थी आपल्याकडे यावेत हि ते प्रार्थना करत.

तक्षशिला विद्यापीठातील काही नामांकित विद्यार्थी.या विद्यापीठात अनेक नामांकित विद्यार्थी शिकत असत सगळ्यांचा उल्लेख सापडत नाही पण काही उल्लेखनीय विद्यार्थी खालील प्रमाणे.

१ पाणिनी– विख्यात संस्कृत व्याकरणकर्ता

२ चाणक्य — अर्थात कौटिल्य मगध देशाचा राजा नंद वंशाचा नाश करणारा व कौटिल्य म्हणून अर्थशास्त्रात तज्ञ असणारा चंद्रगुप्त मौर्याचा महामंत्री. त्याने पहिल्यांदा संपूर्ण भारत एकछत्राखाली आणला होता.

३ जीवक– जो वैद्यशास्त्रात निपुण होता, व ज्याने बिंबसार राजाला बरे केले होते त्यामुळे बिंबसारने त्याला राजवैद्य म्हणून नियुक्त केले होते.त्याने उज्जैनच्या प्रदयोत राजाची कावीळ बरी केली होती.तो शस्त्रक्रिया विदयेत निपुण मानला जाई.त्याने अनेक व्यक्तीवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.

उपसंहार

आपण आत्ता पर्यन्त   तक्षशिला विद्यापीठाचा विस्तार, तिथली शिक्षण पद्धती,गुरुकुल पध्दती, शिकवले जाणारे विषय , प्रवेश प्रक्रिया यांचा मागील काही भागात  पाहिला. इसवी पहिल्या शतकात कुशानी हा प्रांत काबिज केला आणि सुमारे इनवीसन २५० पर्यन्त राज्य केले. दुर्दैवाने ते अल्पशिक्षित होते, त्यामुळे त्यानी विद्यापीठाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले नाही. शेवटचा धक्का विद्यापीठाला मिळाला, जेव्हा पाचव्या शतकात हुणानी हा भाग ताब्यात घेतला. आणि या विद्यापीठाचा दुर्दैवी अंत झाला.आणि प्राचीन भारताच्या एका सुसंस्कृत व वैभवशाली वैभवाला आपण मुकलो.

– रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 79 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..