नवीन लेखन...

अविवेकी कष्ट

विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असतांना, कसे सुंदर होईल घरटे,  रंगवित होते कल्पना ।।१।।   खिडकीवरल्या कपारीमध्ये,  शोधला होता एक निवारा, निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या,  आणीत होते काडीकचरा ।।२।।   उजाडता कुणी खिडकी उघडे,  चिमण्या बांधीत घरटी, सांज समयी बंद झापडे,  ठेवी त्यांना एकटी ।।३।।   नित्य दिनी प्रात: समयी,  कुणीतरी फेकी कचरा समजूनी, […]

आईच्या प्रेमाचा निरोप

आई तुझे प्रेम, अनंत त्याचे दाम । तुलनेसी ब्रम्हांडी, जड तुझीच पारडी ।।१।।   पुंडलीक तुझ्यासाठी, विसरला जगत् जेठी, कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ, शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।   बलीदानाची तू मूर्ती, ‘प्रेमाचे प्रतिक’ हीच तुझी कीर्ती, कष्ट करुनी वाढविले छोटे, विसरती तुला होऊन मोठे ।।३।।   सोडीनी एकटे तुजसी, पंख फुटता उडे आकाशी, निरोप देऊन प्रेमाचा, […]

चि. पल्लवीस

भरून आले डोळे जेंव्हां, कढ मायेचे उचंबळले, हृदयामधल्या भावनेला, अचानकपणे मार्ग मिळाले ।।१।। प्रेमळ निर्मळ तसेच सात्वीक, लोभसवाणे रूप मनोहर, आपुलकीने मने जिंकलीस, आनंदूनी सान थोर ।।२।। वागणुकीत दिसते किमया, हवी हवीसची तू सर्वांना, टिकवूनी ठेव गुणविशेष हा, यशस्वी करील तव जीवना ।।३।।  डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।   देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।   कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  […]

ही माझी शाळा

आहे ती लहान    परि किर्ती महान, छोटे येऊन शिकले   मोठे होऊन गेले ।।१।।   आले घेऊन पाटी    अ आ इ ई लिहिण्यासाठी, लिहून वाचून ज्ञानी बनले    देशांत नांव कमविले ।।२।।   शहर चालते, देश चालतो    महान बनले लोकांमुळे ।।३।। बीजांचे वृक्ष झाले    त्या केवळ शाळेमुळे ।।४।।   कुणी बनला डॉक्टर   काळजी घेई आरोग्याची, कुणी झाला इन्जिनियर […]

फ्लॅटचे ध्येय (१९९५ साल)

त्याच्या आणि माझ्या जीवनांत खूप तफावत होती. तो कसा जगतो ?  – – – ह्याची मलाच काळजी होती. बिनधास्त, बेफिकीर, मनमानी त्याचे जीवन खाओ, पिओ, और मौज करो, हे त्याचे समिकरण. अनअधिकृत झोपडपट्या मधल्या दोन झोपड्या शेजारी मागील वर्षीच अधीकृत होऊन नोंद झाली सरकारी. तूर्तास तरी पाडून टाकण्याची भिती गेली ह्यामुळे छताची तरी सोय झाली. आम्ही […]

व्यसनासक्ति विषयी !

दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द ! लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद ।।१।। अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत ।।२।। होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी ।।३।। जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो […]

कृतार्थ जीवन

नको नको ते जीवन जगणे, हिशोब ज्याचा राही उणे, काय मिळवीले येऊन जगती, खंत याची सदा वाटणे ।।१।।   ज्वाला बनुन विझूनी जाणे, ऊर्जा वाटीत सर्वांना, मंद मंद ते जळत राही, धुरांडे ते काही देईना ।।२।।   लखलखाट तो करीते वीज, क्षणीक राही नभांगी, मिन मिननारा दिवा अंगणी, अल्प प्रकाशी बाह्यांगी ।।३।।   किती काळ अन् […]

लाडक्या नातीस

जन्मापासूनी बघतो तुला, परि जन्मापूर्वीच ओळखले, रोप लावले बागेमध्ये, फुल तयाने दिले ।।१।। चमकत होती नभांत तेंव्हा, एक चांदणी म्हणूनी, दिवसाही मिळावा सहवास, हीच आशा मनी ।।२।। तीच चमकती गोरी कांती, तसेच लुकलुकणे, मध्येच बघते मिश्कीलतेने, हासणे रडणे आणि फुलणे ।।३।। चांदणीचा सहवास होता, केवळ रात्रीसाठी, दिवस उजाडतां निघून गेली, आठवणी ठेवून पाठी ।।४।। नको जाऊस […]

देहातील शक्ती

नासिकेसमोर हात ठेवा,    लागेल तुम्हां गरम हवा, थंड हवा आंत जाते,   गरम होऊन बाहेर येते ।।१।।   अन्न पाणी घेतो आपण,   ऊर्जा निघते त्याच्यातून, आत्म्यापरि फुगते छाती,   हवा आंत खेचूनी घेती ।।२।।   आतल्या ज्वलनास मदत होते,   उष्णता त्यातून बाहेर पडते, भावना जेंव्हा जागृत होती,   रोम रोम ते पुलकित होती ।।३।।   अवयवे सारी स्फुरुन जाती,   […]

1 19 20 21 22 23 26
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..