नवीन लेखन...

कृष्णजन्मी देवकीची खंत

भरल्या ह्रदयी ओल्या नयनी निरोप देई देवकी माता भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.  //धृ//   आकाशवाणीने बोले श्रीहरी देवकीचे तो येईल उदरी संहार करण्या दुष्टजनाचा ईश्र्वर अवतरे ह्या जगता  //१// भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.   रक्षक सारे निद्रिस्त केले कारागृहाचे दार उघडले मार्ग दिसे वसुदेवाला परि प्रभू शक्तीचे दर्शन धडता  //२ […]

वळून पहा

उडून गेली दूर दूर तू झेप घेउनी आकाशी बघू लागलो चकीत होऊनी पंखामधली भरारी कशी   नाजूक नाजूक पंखाना आधार होता मायेचा चिमुकल्या त्या हालचालींना पायबंध तो भीतीचा   क्षणात आले बळ कोठून विसरुनी गेलीस घरटे आपुले बंधन तोडीत प्रेमाचे आकाशासी कवटाळले   कधीतरी उडणे, आज उडाली बघण्या साऱ्या जगताला किलबिल करून वळून पहा दाणे भरविल्या चोंचीला   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   – – -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले.  –  –  – २ चित्त ते हरीमय जाहाले […]

चंद्रग्रहण

राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,       मगरमिठीतून चंद्राला बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,        काय तो हा: हा: कार मजला   प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,        सौंदर्याचा मुकुटमणी झाकळला सारा नभात हा,      म्हणती त्यास गिळला कुणी   आत्मा जाता सोडून देहा,       उरे न कांही मागे चंद्र चांदणे नभात नसता,       सौंदर्याची मिटतील अंगे   सौंदर्यातची  बघतो सारे,       जगण्यासाठी सौंदर्य हवे विश्वचक्र हे फिरत रहाण्या       चंद्राचे आस्तित्व सतत हवे   नष्ट होतील जीवजीवाणू,      आनंद त्यांचा जाईल विरुनी बलिदानाच्या पुण्याईने परि        सुटेल चंद्र मगरमिठीतून   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

पंख फुटता !

ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी । आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी  ।।१   माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती । हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती ।।२   जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी ।   परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता । टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता ।।   डॉ. […]

सैनिक शौर्या

धडाडणाऱ्या तोफेवरुनी     मिठमोहरी उतरते दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते  //धृ//   गेला विसरुनी सगेसोयरे भाऊ बहीण आईबाप बिचारे ह्रदयावरी ठेवून अंगारे दृष्टी दूर सारी प्रेमळ नाते  //१// दृष्ट न लागो सैनिक शौर्या     हेच मी मागते   डोळ्यामध्यें अंजन घालूनी रक्षण करीतो रात्रंदिनी लक्ष तयाचे इतर जीवनीं तोड नसे ह्या त्याग वृत्तीते  //२// दृष्ट […]

श्रेष्ठत्वात न्युनता विसरते

विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग   नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते   अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी   सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार   आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य […]

निवृत्तीच्या उंबरठ्यावर !

कां व्हावे निवृत्त मी ?   कुणी सांगतो म्हणूनी निसर्गालाच सांगू द्या     वय झाले समजूनी   कार्यक्षमता माझ्या मधली   मोजमाप हे कुणी करावे ? विकलांग होईल केंव्हा शरीर   निसर्गालाच हे ठरवूं द्यावे   सहजची जगतो ऐंशी वर्षे     संसार सागरी पोहता पोहता स्थिरावले मन विचार करुनीं    निवृत्तीची जाणीव येता   सर्वासंगे जगता जगता     शेवटचा तो श्वास ठरु दे […]

चंद्राचे कायम स्वरूप

ठेवून पाऊल चंद्रावरी      अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली       वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड      तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी         हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे      चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण              असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप             ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू […]

भाकरी

भाकरीच्या पाठीवर     ठसे दिसती हातांचे जातां तव्यावर भाजूनी    निशाण राहते कष्टांचे एका भाकरीच्या पाठीं     हात कितीक गुंतले कण कण देती ग्वाही      मन भरुनी कसे आले उन्हां पावसात फिरे      शेतामधीं शेतकरी टप् टप् घाम गाळी      उभी करितो जवारी पोती पोती उचलूनी      वाहून नेई मजूर दमछाक होऊनी ही      मिळत नाहीं पोटभर ओवी म्हणत मुखानें       आई थापिते भाकरी साऱ्यांच्या […]

1 2 3 4 5 6 25
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..