श्रीमाणिकप्रभु महाराज, हुमणाबाद
श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयाचे तृतीय पुर्णावतार म्हणून श्रीमाणिकप्रभूंचेच नाव घ्यावे लागेल. लिंगायत धर्माचे संस्थापक बसवेश्वर यांनी श्रीमाणिकप्रभूंच्या अवताराचे भाकीत बरेच दिवस आधी वर्तवले होते. श्रीमाणिकप्रभूंचे सारेच चरित्र अतर्क्य व अद्भुत घटनांनी भरलेले आहे. त्यांची अलोट संपत्ती, अतुल ऐश्वर्य, त्यांनी केलेले अमाप अन्नसंतर्पण इत्यादी लोकोत्तर गोष्टी वाचून वाचक खरोखरच स्तिमित होतो! […]