अजब न्याय नियतीचा – भाग २६

राजच्या आणि नीलच्या डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला……. राज नीलला… ‘माझा नील…माझा नील’ असे म्हणून परत परत मिठी मारत होता आणि नील त्याला ‘दादा…. दादा…’ म्हणत होता. तोपर्यंत आरूलापण शुद्ध आली होती. दीला उडी मारताना पाहून तीपण कठड्याच्या दिशेने ‘दीsssss… दीsssss… थांब’ असे म्हणत धावत निघाली….. […]

अजब न्याय नियतीचा – भाग २५

पण मी त्याचं काही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. मी ते ग्रीटींग रागाने फाडायला सुरूवात केली. मला ते ग्रीटींग फाडून त्याचे तुकडे तुकडे करून टाकायचे होते. राजचा सगळा राग मी त्या ग्रीटींगवर काढत होते. संतापाच्या भरात मी काय करतेय याकडेही माझं लक्ष नव्हतं. तसा राज जोरात माझ्याकडे धावत आला. त्यानं ते ग्रीटींग माझ्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि…….. आणि मी रागाच्या भारात त्याला मागे ढकलून दिलं…..” […]

अजब न्याय नियतीचा – भाग २४

तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’ […]

अजब न्याय नियतीचा – भाग २३

सुरूवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण या गोष्टी सतत माझ्या कानावर येवू लागल्या आणि माझ्या लक्षात आलं की, आपली आरूपण आता मोठी झालीय. मी तिला माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल कधीच बोलले नव्हते. […]

अजब न्याय नियतीचा – भाग २२

खरं तर नील तिच्या बाबतीत जे खरं घडलं तेच बोलत होता. त्यामुळे आता लताला त्याचा राग यायला सुरूवात झाली होती. तिला बघायचं होतं की, नीलला आपल्या बद्दल नक्की किती माहिती आहे? ती राग आवरून धरून त्याला पुढे बोल असे म्हणाली. ’गो अहेड नील.’ […]

अजब न्याय नियतीचा – भाग २१

आरूला, आता काय सरप्राईज बघायला मिळणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नीलनं आपल्याला या सगळ्या प्लॅनबद्दल आधी का नाही सांगितलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. नीलला राजूबद्दल काय माहिती असेल? त्यानं हे आपल्याला का नाही सांगितलं? डॉक्टरसाहेबांनी उपचाराचा भाग म्हणून राजूला इथं का आणायला सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आरूच्या मनात रुंजी घालत होते. […]

अजब न्याय नियतीचा – भाग २०

पण आपण असं काय वागलो की तिला आपल्याबद्दल असा संशय यावा? आपली  दी आपल्याबद्दल असा विचार कसं काय करू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होतं.  मग गढीवर गेल्यावर आपल्यामुळं त्या दोघांच्यात भांडण झालं असेल? आपल्यामुळं राज दीला कायमचा सोडून गेला असेल? बापरे…. विचार करून करून आरूचं डोकं ठणकायला लागलं.. […]

अजब न्याय नियतीचा – भाग १९

आरू काही क्षण नीलकडे पाहात राहिली, मग हलकेच तिने तिचे डोके त्याचा खांद्यावर ठेवले  म्हणाली,  “नील किती करतोस ना तू माझ्यासाठी.  माझ्या दीचा प्रॉब्लेम तो तुझा प्रॉब्लेम असल्यासारखा तू झपाटून ती चांगली व्हावी म्हणून किती प्रयन्त करतो आहेस. देव करो आणि तुझ्या प्रयत्नांना यश येवो.” […]

अजब न्याय नियतीचा – भाग १८

त्या दिवशी exactly काय घडलं ते आरू सांगत होती. “14 तारखेला आम्ही तिघं खरंतर गढी बघायला जाणार होतो. तोपर्यंत दीने गढीविषयी आम्हाला काहीच माहिती दिली नव्हती. आपण गढी पहायला गेलो की माहिती सांगेन असं ती म्हणाली. परवा आपण देवळात गेलो तेव्हा तू विचारलंस म्हणून दीने आपल्याला गढीची माहिती सांगितली. […]

अजब न्याय नियतीचा – भाग १७

माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना राज माझा होणारा जिजू आहे असंच माहिती होतं. तो कधीकधी कॉलेजवरून जाताना मला भेटायला येत असे. मग आम्ही कॉफीशॉपमध्ये जाऊन गप्पा मारत असू. कधी लेक्चर्स ऑफ असतील तर मुव्ही बघायला पण जात असू. […]

1 2 3