नवीन लेखन...

माझी तत्वसरणी ःः विज्ञानीय दृष्टीकोनातून श्रीविष्णूचे दशावतार

श्रीविष्णूच्या या दशावतारात श्रीविष्णूचे अस्तित्व असावयासच हवे. कोणत्या स्वरूपात श्रीविष्णू, या दहाही अवतारात सामावलेले असतील? साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सजीवात आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरीअल अस्तित्वात होते. त्याच्यातच उत्क्रांती होतहोत कोट्यवधी प्रजाती उत्क्रांत झाल्या. शेवटी मानव अवतारातहि तेच उत्क्रांत आनुवंशिक तत्व अस्तित्वात आहे. याचा विज्ञानीय अर्थ असा की आनुवंशिक तत्वच, श्रीविष्णूच्या दहाही अवतारात श्रीविष्णूचे प्रतिनिधित्व करते. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे, आनुवंशिक तत्व म्हणजेच श्रीविष्णू. अध्यात्मात बुडालेले विज्ञान !!!
[…]

विज्ञान आणि अध्यात्म – पूर्ण ब्रम्ह.

ऋषिमुनींची प्रतिभा अचाट होती. संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व देखील असामान्य होते. त्यांचे ज्ञान त्यांनी लाखो श्लोकात लिहून ठेवले आहे. या श्लोकांच्या काही ओळी वाचीत असतांना जीभ अक्षरश: अडखळते. पण श्लोकात गुंफलेले हे ज्ञान, शिष्यांच्या अनेक पिढ्यांनी, तोंडपाठ करून शेकडो वर्षे जतन केले. लिहीण्याचे तंत्र विकास पावल्यानंतर हे सर्व ज्ञान लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. लिखित मजकूरही शेकडो वर्षे दुर्मिळच होता. सर्व साहित्य हस्तलिखित स्वरूपातच होते त्यामुळे त्याचा प्रसार सामान्य माणसांपर्यंत पोचला नाही. त्या काळी ध्वनीलेखनाचा शोध लागला नव्हता. म्हणून त्यांना अभिप्रेत असलेले उच्चार आपल्याला करता येत नाहीत.

पाठांतर आणि हस्तलेखन यात व्यक्तीनिहाय थोडेथोडे बदल होत गेले.

हे पौराणिक साहित्य मूळ स्वरूपात आता फारच दुर्मिळ झाले आहे. ज्या थोड्या विद्वानांनी मूळ पोथ्या मिळवून, श्लोकांचा अन्वयार्थ लावून, प्रचलित भाषात भाष्ये करून ठेवली असल्यामुळे, आपल्याला आता त्या ज्ञानाचा आस्वाद घेता येतो. त्यामुळेच हजारो वर्षापूर्वीचे ऋषिमुनींचे विचार, आपल्यापरीने आपल्याला कळतात.

पाचसहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक माध्यमात साठविलेल्या कित्येक श्लोकांचा, ऋषिमुनिंना अभिप्रेत असलेला अर्थ, आज आपल्यापर्यंत पोचला आहे असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही.

.
[…]

माझी तत्वसरणी :: धर्माचरणांचा कार्यकारणभाव.

माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण, ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेऊन मी हे लेख लिहिले आहेत.

दैनंदिन जीवनात आपण, दिवसाचा काही भाग, विशेषतः आंघोळीनंतर, देवपूजा, पोथ्या वाचन, जपजाप्य, मंत्रपठण, ध्यानधारणा, एखादे स्तोत्र म्हणणे वगैरेत घालवितो. ही सर्व धार्मिक आन्हिके, पुरातन काळापासून आचरली जात आहेत. ही आन्हिके केव्हातरी, कुणीतरी, काही विशिष्ट उद्देश ठरवून प्रचारात आणली असावीत. दिवसाचाकाही काळ, इतर विचार बाजूस सारून, चांगले सात्विक विचार मेंदूत यावेत हाच असावा असे वाटते. विज्ञानीय दृष्टीकोनातून या सर्वांचे मनन केल्यास, बर्‍याच बाबींचा उलगडा होतो.
[…]

विज्ञान आणि अध्यात्म ः युगान्तरे.

या पृथ्वीवरील पर्यावरण प्रवाही आहे. ठराविक कालखंडाला युग ासे म्हणतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगे आपल्या परिचयाची आहेत. मी त्यात आणखी तीन युगांची भर घहालीत आहे. […]

विज्ञान आणि अध्यात्म ःः मी कोण आहे? आणि कुठून आलो?

साडे तीन अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असे शास्त्रज्ञ सांगतात. ते जीव आपले अन्न मिळवीत असत, हालचाल करीत असत आणि आपली प्रजाती वाढवीत असत. त्यांच्यातील आनुवंशिक तत्वामुळेच हे शक्य होत असे. हे तत्व पुढच्या पिढ्यात संक्रमित होत आणि उत्क्रांत होत सध्याच्या सजीवांपर्यंत पोचले आहे. हे आनुवंशिक तत्व म्हणजेच सजीवांचे आत्मे आहेत.
[…]

अंत्यसंस्कार : विज्ञानीय दृष्टीकोनातून.

कोणताहि सजीव मरण पावला म्हणजे त्याचे शरीर कुजू लागते, सडू लागते. मानवी अचेतन शरीरावर, रुढी आणि परंपरांनुसार, अत्यंत आदराने, भावनाविवशतेने, जगातील सर्व धर्मात, त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार केले जातात. खोलवर विचार केल्यास लक्षात येअील की, या रुढी आणि परंपरा, मूलतः, विज्ञानाधिष्ठीत आहेत.
[…]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..