नवीन लेखन...

अंतरंग – भगवद्गीता – अर्जुनविषादयोग

दृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. […]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता – अ. २ श्लो १२

आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजे त्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्‍या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते. यासंबंधीच या लेखात चर्चा केली अअहे. […]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता, अध्याय २ :: श्लोक २३ आणि २४.

सजीवांच्या शरीरात आत्मा नावाची चेतना असते हे निर्विवाद सत्य आहे. त्याचे मूर्त स्वरूप कुणाला दिसले का? आत्मा या संकल्पनेवर अध्यात्माचा डोलारा उभा आहे. सजीवाचे शरीर जीर्ण झाले म्हणजे त्यातील आत्मा निघून तो दुसर्‍या नव्या शरीरात प्रवेश करतो. जुने शरीर मरते तर नवे शरीर जिवंत होते.
[…]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद्गीता : अ. २ श्लोक १३

गीतेच्या या श्लोकानुसार आत्मा, मानवी शरीरात, जन्मापासून मरेपर्यंत असतो आणि मृत्यूनंतर तो दुसर्याा शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म घेतो. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा असतो आणि तो गर्भधारणेपासून मरेपर्यंत शरीरातच असतो. आनुवंशिक तत्व, जनक पिढीक़डून अपत्य पिढीत संक्रमित झाले म्हणजेच आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म झाला असे..आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मानतो.
[…]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवतगीता : अध्याय २ : श्लोक १६.

गीता लिहून ५ हजार वर्षे झाली आहेत. या काळात हजारो विचारवंतांनी, गीतेतील श्लोकांचा, त्यांच्या बुध्दीला भावेल असा अर्थ लावला आहे. आणि तो अधिकारवाणीने जनतेला सांगितला आहे याची कृपया नोंद घ्यावी. यातला नेमका कोणता आशय, महर्षि व्यासांना अभिप्रेत होता हे समजणे कठीण आहे. आता, गीतेत विज्ञान शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे. बरेच शास्त्रज्ञ असाच प्रयत्न करीत आहेत. तरीपण त्यांच्या दृष्टीकोनात फरक असणारच.
[…]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता : अध्याय २, श्लोक २२.

आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व (जेनेटिक मटेरियल) हाच आत्मा असतो. त्यामुळे तो अणूरूपच आहे. या विश्वाची निर्मिती हे वास्तव आहे. या निर्मितीस जे काही कारणीभूत आहे तोच ईश्वर असे वैज्ञानिक मानतात. पण तो, अध्यात्मात वर्णन केल्यानुसार नाही असेही मानतात. कार्बन, हैड्रोजन, ऑक्सीजन, नायट्रोजन, कल़्शियम, फॉस्फोरस वगैरे सारख्या अचेतन मूलद्रव्यांपासून, सजीवांचे चेतनामय शरीर ज्या कारणामुळे निर्माण होते तो आत्मा असे वैज्ञानिक मानतात. आनुवंशिक तत्व हे आत्म्याचे वास्तव स्वरूप आहे.
[…]

विज्ञान आणि अध्यात्म ः विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता-गीतेत सामावलेले विज्ञान.

पौराणिक ग्रंथात भरपूर विज्ञान सामावलेले आहे. पण ते अध्यात्मात बुडालेले आहे. गीतेच्या मुखपृष्टावर असलेल्या चित्रासंबंधाने या लेखात विचार मांडले आहेत.

धार्मिक ग्रंथातील विज्ञान, शोधा म्हणजे सापडेल, पहा म्हणजे दिसेल आणि विचार करा म्हणजे कळेल.
[…]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता

भगवतगीता या, सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्य केले आहे. गीतेच्या १८ अध्यायात वेदोपनिशदांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..