नवीन लेखन...

शारदेस विनंती

हे शारदे ! रूसलीस कां तू,  माझ्या वरती  । लोप पावली कोठे माझी,  काव्याची स्फूर्ती  ।। दिनरात्रीं तव सेवा केली,  मनोभावें  । कळले नाहीं आज शब्द ओठचे,  कोठे जावे  ।। दिसत होते भाव मजला,  साऱ्या वस्तूमध्यें  । उचंबळूनी जाई मन तेव्हां,  नाचत आनंदे  ।। तेच चांदणे तारे गगनी,  आणिक लता वेली  । पकड येईना टिपण्या सौंदर्य, […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी  ।। […]

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती,  सारे होते शांत  । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती,  वाटला एकांत  ।। एक गाडी मंदिरीं थांबली,  त्याच शांत वेळीं  । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी  ।। सारे होते नशिबात त्याच्या,  धन संपत्तीचे सुख  । दिवस घालवी मग्न राहूनी,  कार्ये पुढती अनेक  ।। तर्कज्ञान  तीव्र असूनी,  आगळा बाह्य चेहरा  । परि अंर्तमन सांगत […]

कळसूत्री बाहुल्या

नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे  । टकमक पाहात हांसत  होत्या,  चोहीकडे  ।।१।। झीम्मा खेळे, फुगडी खेळे,  गरगर फिरती  । हातवारे करुन त्या,  माना डोलावती  ।।२।। जवळ येवून गुजगोष्टी,  सांगे एकमेकींना  । सासू नणंद यांच्या,  कुलंगड्या काढतांना  ।।३।। सुख दुःखाच्या कथा,  सांगितल्या त्यांनीं  । कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी  ।।४।। अज्ञानी गरीब बिचाऱ्या,  जेंव्हा संकल्प करती  […]

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक […]

आमचे खेळ

या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे  । मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते  ।।  खेळांना त्या    समजून घ्या – १ —  या मित्रांनो सारे या, हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा  । स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी  ।। एकाच दमात   भिडू मारू या – २ — या […]

शुद्धीसाठी गुरू

कितीक वेळा धुतला कोळसा,  रंग न बदले त्याचा  । उगाळता झिजून जाई,  परि काळेपणा कायमचा  ।। भट्टीत घालून त्यास जाळता,  घेई रंग लाल कसा  । शुभ्रपणा हा दिसून येतो,  राही न जेंव्हा कोळसा  ।। मलीनता ही मनामधली,  खोल  रूजली असे  । विचारांतील तर्कज्ञान ,  शुद्धीसाठी पुरे नसे  ।। गुरू लागतो अग्नी सारखा,  चित्त शुद्धी करिता  । […]

जीवन एक “जाते”

जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा  । दोन चाकांत येईल,  मोडेल त्याचा कणा  ।।१।। जीवन मृत्यूची चाके,  सतत फिरत राही  । येई जो मध्ये त्याच्या,  मागे न उरेल काही  ।।२।। मध्यभागी राही स्थिर,  आंस त्यास म्हणती  । वरचे चाक फिरे,  त्याच्या भोवती  ।।३।। आंसाजवळील दाणा,  दूर तो चाकापासूनी  । परिणाम चाकाचा तो होईल,  मग कोठूनी  ।।४।। जन्म […]

लोपलेले श्रेष्ठत्व

डोळे उघडून बघा तुम्हीं    आपल्या देशाला  । महानतेची परंपरा    दिसेल तुम्हाला  ।।१।। जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी    नाव होते त्याचे  । आज विसरलो महत्त्व सारे    आपल्या पूर्वजांचे  ।।२।। दोष असेल त्यांचा कांहीं    सोडून  द्यावा  । परि अभिमान हा परंपरेचा   मनात ठेवावा  ।।३।। डोळ्यांनी जे बघतो सारे    सत्य  समजता  । कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे    चूक  ठरविता  ।।४।। कित्येक गोष्टीची उकलन होती   वेदामध्ये आपल्या  । परि पुराणातील वांगी समजूनी    फेकून त्या दिल्या  ।।५।। आमचे जवळील ज्ञान गंगाजळ    आम्ही  विसरतो  । परकियांची कास धरूनी    वाट  भटकतो  ।।६।। ते तर आहे महाठगते     वेद नेई चोरूनी  । पिऊनी आमचीच ज्ञान गंगा    चाले मान उंचावूनी  ।।७।। विचार करावा थोडा याचा    शांत चित्ताने  । […]

देह – एक महान वस्ती

सात कोटीची वस्ती असूनी,  सुंदर वसले शहर एक  । प्रत्येक जण  स्वतंत्र असूनी,  कार्ये चालती तेथे अनेक  ।। सुसंगता शिस्तबद्ध   साह्य करिती एकमेकांना  । शत्रूची चाहूल येतां,  परतूनी लाविती त्या घटना  ।। अप्रतिम  शहर असूनी,  नाव तयाचे असे  ‘पुरूष’  । ‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी,  मालक त्याचा आहे ‘ईश  ।। अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी  […]

1 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..