नवीन लेखन...

  दुजातील ईश्वर

दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर  । ‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार  ।। देह समजून मंदिर कुणी,  आत्मा समजे देव  । त्या आत्म्याचे ठायी वाहती,  मनीचे प्रेमळ भाव  ।। आम्हा दिसे देह मंदिर,  दिसून येईना गाभारा  । ज्या देहाची जाणीव अविरत,  फुलवी तेथे मन पिसारा  ।। लक्ष केंद्रीतो देहा करीता,  स्वार्थ दिसे मग पदोपदी  । […]

 श्रीरामाची शिवपूजा

हरि हराचे पुजन करतो  । दृष्य दिसे बहुत आगळे  ।। प्रभूकडूनी प्रभूची सेवा  । सर्वजणां ही किमया न कळे  ।।   शिवलिंगापुढती ध्यान लावी  । डोळे मिटूनी प्रभू श्रीराम  ।। सुंदर सुबक चित्रामध्ये  । व्यक्त होई ह्रदयातील प्रेम  ।।   श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं  । आत्मरुप उजळून आले  ।। शिवलिंगातील रामस्वरुप  । एक होऊनी मग गेले  ।। […]

  आत्मविश्वास

आत्मविश्वास जागृत ठेवूनी,  कार्य घेवूनी तडीस नेती  । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती  ।। ईश्वर करीतो मदत तयांना,  मदत करी जे आपले आपण  । आपल्यातची तो ईश्वर आहे,  असते याची जयास जाण  ।। विश्वासाने हुरूप येई,  जागृत करीती अंतर चेतना  । लक्ष्य सारे केंद्रीत होता,  यश चमकते प्रयत्नांना  ।।   — डॉ. भगवान नागापूरकर […]

  वचन

वाणी मधूनी शब्द निघाला,  कदर त्याची करीत होते  । मुखावाटे बाहेर पडे जे,  वचन त्याला समजत होते  ।। दिले वचन पालन करण्या,  सर्वस्व पणाला लावीत होते  । प्राणाची लावून बाजी,  किंमत शब्दांची करीत होते  ।। स्वप्नामध्ये दिले वचन,  हरिश्चंद्र ते पालन करी  । राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी  ।। प्राण आहूती देई दशरथ, वनी […]

 ईश अस्तित्वाची ओढ

उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला  । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला  ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा  । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा  ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी  । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी  ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची  । शक्तीमान […]

राजमाता कैकयी

अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला  । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला   ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई  । कैकयी त्याच्या सेवेत राही  ।। राजनीति अन् युद्धनीति ही  । अवगत झाली सारी तिजला   ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी  । रावणादी असुरी शक्ती वाढूनी  ।। सामान्य जनाला जर्जर करुनी  । हा हाः […]

प्रेमाचा उगम

दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने  । तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने  ।। कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी  । प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी  ।। शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी  । आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी  ।। खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो  । सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो  ।। […]

संशयाचे भूत

हे भूत संशयाचे छळते कसे मनाला  । करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला  ।। एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे  । डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते  ।। गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा  । कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा  ।। येता मनी संशय आपलाच ज्या घडीला  । शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला  ।।   — […]

मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी,  मर्यादेतचि जगती सारे  । अनंत असता ईश्वर ,  मर्यादा घाली त्यास बिचारे  ।। जाण जगाची होई इंद्रियांनी,  त्याला असती मर्यादा  । विचार सारे झेपावती,  ज्ञान शक्ती बधूनी सदा  ।। अथांग वाटे विश्वमंडळ,  दाही दिशांचा भव्य पसारा  । ईश्वर आहे थोर त्याहूनी,  मोजमापाच्या उठती नजरा  ।। कशास करीतो तुलना सारी,  भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी  […]

पूजा तयारी

रोज सकाळीं प्रात: समयीं,  पूजा करी देवाची  । पूजे मधल्या विधीत,  चूक न होई कधी त्याची  ।। स्नान करोनी नेसूनी सोंवळे,  देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा,  मंत्रपाठ गाई  ।। सहयोग देई पत्नी,  पूजा कर्मामध्ये त्याला  । आधींच उठोनी झाडूनी घेई,  स्वच्छ करी देव घराला  ।। करूनी सडा संमार्जन तेथें,  सारवोनी घेई जागा  । देवापुढती […]

1 7 8 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..