नवीन लेखन...

कावळे (कथा) – भाग 4

वासंतीला जाऊन आता पंधरा वर्ष होऊन गेलीत. बरेच वर्षांनी परवा एक बिल्डर आला होता. चांगला गल्लेलठ्ठ होता! उंचापुरा, दोन्ही हाताच्या बोटात हिऱ्याच्या अंगठ्या, पांढरा शुभ्र सफारी सूट, गळ्यात जाड सोनसाखळी, हातात हिऱ्यांच्या पट्ट्याचे घड्याळ, चकचकीत बूट, खिशाला हिऱ्याच्या क्लिपचे पेन…. श्रीमंतीचा दिमाख अगदी उबग आणण्याजोगा! आपली आलिशान गाडी सफाईने पायऱ्यापर्यंत आणून तो खाली उतरला आणि जणू […]

कावळे (कथा) – भाग 3

ठरल्याप्रमाणे मी खाँसाहेबांच्या टीम बरोबर गोव्याला गेलो. त्या समारंभासाठी खाँसाहेबांनी माझ्यासाठी अन्वरसारखाच सुंदर जोधपुरी ड्रेस घेतला होता. विमानतळावर उतरल्यापासून आमचा ताबा ‘पंचरंग’च्या गोवा शाखेने घेतला होता. आणि इथेच, माझा वासंतीशी परिचय झाला. पाहता क्षणीच माझ्या मनीची राजकुमारी, हीच असे मला वाटले. अत्यंत तरतरीत, बोलके डोळे, गोरीपान, हसतमुख असे तिचे व्यक्तिमत्त्व पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे होते. […]

कावळे (कथा) – भाग 2

मी मुंबईला कॉलेज शिक्षणासाठी आलो. चांगला अभ्यास करून डॉक्टर झालो. म्हणजे एम्.बी.बी.एस्! त्याकाळात डॉक्टर म्हणजे एम्.बी.बी.एस् आणि फारच तर एफ्.आर.सी.एस्. (लंडन). पण फार श्रीमंत बापाची पोरच लंडन, फिंडन् करायची. पण एम.बी.बी.एस. म्हणजे फार मोठा डॉक्टर, त्यावेळी. आता एम.बी.बी.एस.ला डॉक्टरपण विचारत नाहीत. आता लागतो एम्.एस.एम.डी! वगैरे! काही दिवसांनी त्यालाही कोणी विचारणार नाही. मग लागतील एम.डी. म्हणजे मॅड, […]

कावळे (कथा) – भाग 1

उपनगरातील भर वस्तीत, आजूबाजूला नवीन नवीन भव्य काँक्रिटच्या इमारतींच्या गराड्यात हा आमचा एकमेव बंगला, वासंती व्हिला’. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात भरल्याशिवाय रहात नाही. एखादं मरायला टेकलेलं जनावर, कधी मरतंय याची वाट पाहत, आजूबाजूच्या परिसरात, कावळे वाट पाहत बसतात तसे ‘बिल्डर’ नावाची आधुनिक कावळे जमात या बंगल्यावर डोळा ठेवून आहे. अर्थात मी चांगला खमक्या आहे आणि जोपर्यंत मला […]

झुरळाने काटा काढला! – भाग  4

पुढे गोरे मॅनेजर झाला. मग तर माझ्या छळाला अंतच राहिला नाही. मांजर जसं उंदराला खेळवतं तसं सगळा गोरे कंपू मला खेळवत होता. प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी कडा असते असे म्हणतात. तशी माझ्या या काळ्याकुट्ट ढगांच्या कडेवर एक चंदेरी कडा मला एक दिवस दिसली आणि या रोजच्या यमयातनातून सुटण्याचा एक खात्रीशीर मार्ग मला दिसू लागला. अर्थात […]

झुरळाने काटा काढला! – भाग 3

मला खूप बरे वाटले. सकाळपासून मी जाम वैतागलो होता. त्यांचे चांगले शब्द ऐकून वाटले, चला, आज पहिलाच दिवस होता, रोज काही असे होणार नाही. हळूहळू होईल दोस्ती. पण हा माझा विचार किती भ्रामक होता याची चुणूक मला लगेचच दिसून आली. थोड्या वेळाने गोपाळ आला आणि रजिस्टर घेऊन गोरेसाहेबांना नेऊन दिली. माझे काम पाहून गोरेसाहेब आणि मॅनेजर […]

झुरळाने काटा काढला! – भाग 2

दोन वर्षांनी मला मशीदबंदरला एका सहकारी बँकेत नोकरी लागली. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धापाऊण तास आधीच गेलो तेव्हा वॉचमन बँकेचं दार उघडत होता. मला पाहून तो म्हणाला, “साहेब! बँक उघडायला अजून वेळ आहे, काय नवीन खातंबितं खोलायचंय का?” “नाही मी इथं नोकरीसाठी आलोय. आजपासून हजर व्हायचं आहे.” “असं का मग बसा आत, थोड्या वेळाने […]

झुरळाने काटा काढला! – भाग १

झुरळं अन् पाली ह्या काही शोभेच्या वस्तू नव्हेत. पण बाजारात त्या प्लॅस्टिकच्या मिळतात आणि काही लोक हौसेनं त्या आपल्या घराच्या भिंतीवर सजावट म्हणूनही लावतात. आता कोणाला काय आवडेल आणि कशात कला दिसेल ते सांगणे कठीणच! मग असे असूनही माझ्या घरात प्लॅस्टिकचे झुरळ आणि तेही अगदी भिंतीवरच्या दिव्याखाली ठळकपणे दिसेल असे मी का लावले आहे असे तुम्ही […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..