सूर्यनमस्कार : व्यस्त व्यक्तींसाठी व्यायाम प्रकार

१२ मिनिटात २८८ योगासने.

सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने.

सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.

एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल.

३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट

३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास:

वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,

बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज.

वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?
‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’
कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.

इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते.

सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?

सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ

सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता

‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो – ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे – या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.

सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा. आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.

सुषमा मोहिते

आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन

Avatar
About सुषमा मोहिते 34 Articles
सुषमा मोहिते या आरोग्यविषयक लेखन करतात. त्या “आरोग्यदूत” या WhatsApp ग्रुपच्या Admin पदाचीही जबाबदारी सांभाळतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…