नवीन लेखन...

अभिनेता सुनील बर्वे

मराठी-हिंदी-गुजराती नाटक, टीवी मालिका व चित्रपट अशी अभिनयाची सर्वच क्षेत्रात आपल्या प्रसन्न अभिनयाने वावर करणारे सुनील बर्वे मागील २५ पेक्षा अधिक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६६ रोजी झाला.

सुनील बर्वे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले. त्यांनी यू.एस. व्हिटॅमिन्स या कंपनीत एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. ते सात वर्षे तबला शिकले. गांधर्व महाविद्यालयाची मध्यमा ही संगीताची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व करतानाच त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा विनय आपटे यांच्या अफलातून या संगीत नाटकात शिरकाव झाला. त्यांना एका गाणाऱ्या पात्राची भूमिका मिळाली होती. या पहिल्या नाटकात सुनीलसोबत महेश मांजरेकर, अतुल परचुरे, सचिन खेडेकर यांनी काम केले होते.

त्यानंतर सुनील बर्वे यांनी “मोरूची मावशी”, “कशी मी राहू तशीच”, “वन रूम किचन”, “चार चौघी”, “म्हणून मी तुला कुठे नेत नाही”, “ह्यांना जमतं तरी कसं”, “असेच आम्ही सारे”, “हेलो इन्स्पेक्टर”, “श्री तशी सौ”, “बायकोच्या नकळतच”, “हिच तर प्रेमाची गंमत आहे”, “मासिबा” आणि “ऑल द बेस्ट” अशा मराठी, गुजराती आणि इंग्लिश नाटकांमधून भूमिका केल्या. “सुबक” या संस्थेची स्थापना करून द्वारे ते नाट्य निर्मितीच्या क्षेत्रात उतरले. जुनी आणि गाजलेली काही निवडक मराठी नाटके पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर करण्याचा आगळा प्रयोग अभिनेते सुनील बर्वे यांनी पाच वर्षांपूर्वी ‘सुबक’ या संस्थेतर्फे प्रत्यक्षात आणला.

‘हर्बेरियम’ या उपक्रमाअंतर्गत मराठी रंगभूमीवर नव्याने सादर झालेल्या या नाटकांना रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांनी या कल्पनेचे स्वागत केले. या नाटकांमुळे नव्या पिढीला जुन्या नाटकांविषयी माहिती झाली तर जुन्या पिढीतील प्रेक्षकांसाठी ते ‘स्मरणरंजन’ ठरले. ‘हर्बेरियम’च्या पहिल्या पर्वात ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळतंय’ आणि ‘झोपी गेलेला जागा झाला’ ही वेगवेगळ्या शैलीतील जुनी नाटके नव्याने व नव्या कलाकारांच्या संचात सादर झाली होती.

सचिन पिळगावकर दिग्दर्शित ”आत्मविश्वास” हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यानंतर त्यांनी “सुगंध”, “तू तिथे मी”, “पाश”, “आहुती”, “लपंडाव”, “जमल हो जमल”, “आई”, “तन्नू कि टिना”, “निदान”, “अस्तित्व”, “दिवसेंदिवस”, “आनंदाचे झाड”, “सुर राहु दे”, “गोजिरी”, “तूच खरी घरची लक्ष्मी”, “प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं” “प्राइम टाइम” आणि “हायवे” या चित्रपटात अभिनय केला आहे. नाटक आणि चित्रपटांसोबतच अनेक मराठी, हिंदी आणि गुजराती मलिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे, या मलिकांमध्ये ”कुंकू”, “कळत नकळत”, “असंभव”, “अभी तो मै जवान हु”, “अधांतरी”, “अवंती”, “अवंतिका”, “आवाज”, “बोलाची कढी”, “चाळ नावाची वाचाळ वस्ती”, “छैल छबीला”, “चतुराई”, “गोष्ट एका आनंदची”, “हे सारे संचीताचे”, “इमारत”, “जावई शोध”, “झोका”, “झुट्न जरीवाला”, “ज्योति”, “कर्तव्य”, “कौन अपना कौन पराया”, “कोई सुरत नजर नही आती”, “कोरा कागज”, “नायक”, “प्रपंच”, “प्रो. प्यारेलाल”, “रिमझीम”, “सप्तर्शी”, “श्रीयुत गंगाधर टिपरे”, “स्वयंम”, “थरार”, “त्रेधा तिरपिट” आणि “वाळवाचा पाऊस” या मालिकांचा समावेश आहे.
’तो हा मी सुनील बर्वे’ या एफ.एम. रेडियो ’सुरभी’वरती ते रेडियो जॅकी म्हणून सुद्धा ते कार्यरत होते.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..