नवीन लेखन...

सुखानंद..

जिंदगी तुझसे हर कदम पर,
समझौता क्यो किया जाए ..
शौक जीने का हैं मगर इतना भी नहीं,
की मर मर कर जिया जाए ….

जब जलेबी की तरह,
उलझ ही रही हैं तू ए जिंदगी ..
तो फिर क्यो न तुझे चाशनी में डुबाकर,
मजा ले ही लिया जाए …..

आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद..! गमतीची गोष्ट अशी की, मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो.

Happiness starts with you. Not with your relationships, not with your job, not with your money.. but with you.

सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. सुख मिळवण्यासाठी आपण आपला प्रत्येक क्षण वेचत असतो आणि आपापल्या परीने सुखी राहण्याचा मार्ग शोधत असतो. सुख हे ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून असतं असं मला वाटतं. दिवसभर नुसतं गेट उघड-बंद करणे असलं अतिशय नीरस काम करणारा वॉचमन आपल्याकडे पाहून येता-जाता तोंडभरून हसतो, तेंव्हा मला त्याचं कौतुक वाटतं. तसेच सतत कपाळावर आठ्या घेऊन, मर्सी. मधून हिंडणार्या एखाद्या धनाढ्य व्यक्तीला पाहिलं की.. त्याचं सुख कुठेतरी हरवलंय, असं वाटतं. तर सुखाचा लिटरली पैशाशी संबंध जोडता येत नाही. मन जर आनंदी असेल तर कोणतेही शारीरिक/मानसिक कष्ट जाणवत नाहीत.

लहान सहान गोष्टीतही सुख (शोधलं तर) सापडतं. 
जसं…..

कोकिळेच्या मधुर स्वराने आलेली जाग, आलं घातलेला वाफाळणारा चहा, अंगणातला प्राजक्ताचा सडा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याच हातात पडलेला पेपर…,

अवीट गोडी असलेलं … लताचं..
“सुनो सजना पपीहे ने कहा सब से पुकारले के …”,

लिंबू पिळलेला आणि वरुन साजूक तूप घातलेला गरम गरम वरण भात..,

पुलं चं पुस्तक, त्यांचं पेटीवादन … त्यांचं कथाकथन..,

आशाच्या हुकमी आवाजातलं.. 
“जाईए आप कहा जाएंगे…., “

बिस्मिल्लांचे सनईचे सूर,

सुधीर फडके यांचं “धुंदी कळ्यांना.” भावगीत…,

अगदी आपल्याला हवी तशी बनलेली कॉफी..,

थोडीशी तिखट भेळ, गरम भजी, चुलीवरची भाकरी, गरम हुरडा आणि चटणी…

रातराणीचा सुगंध…,

थंडीत खाल्लेलं टेंडर कोकोनट..,

गाण्याच्या मैफिलीत जागवलेली पौर्णिमेची रात्र…, 
पहाटे दिसलेली शुक्राची चांदणी…,

अचानक नजरेला पडलेला भारद्वाज…,

आपण लावलेल्या गुलाबाला आलेली पहिली कळी…,

दवांत न्हाऊन निघालेली मोगऱ्याची फुलं……

खुप वेळा, आहे ती परिस्थिती स्विकारणे म्हणजे आपला पराभव असे मन आपल्याला बजावते. खरे तर आपल्या हातात काहीच नसते… पण चांगल्या गोष्टी घडत असताना ‘आपला तो हक्कच आहे.. i deserve the best in life’ असे आपण मानतो. मात्र आपल्या दृष्टीने वाईट गोष्टी घडू लागल्या की मग सगळ्यांना दोष देणे चालु, आणि त्यातुन मग शेवटी आपण दु:खी व्हायचे आणि इतरांचे सुखही हिसकावुन घ्यायचे.

सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. आपण स्वतःला जितकं सुखी समजणार तितकंच आपण सुखी राहणार. आपल्या सुखी राहण्यावर केवळ आपलाच अधिकार असतो. इतर लोकं आपल्याला दुःख देऊच शकत नाहीत.. ही गोष्ट एकदा लक्षात आली की, जगणं फार सोपं होऊन जातं.

यश म्हणजे तुमचे सुख नसून,
तुमचे सुख म्हणजे यश असते…

थोड्या बहुत प्रमाणात सर्वांच्याच वाटेला कष्ट, दु:ख येत असतं. त्यावेळी मन प्रसन्न, आनंदी ठेवलं की सुख आपोआप आपल्याला शोधत येतं. उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा, मावळताना तो तुम्हाला खूप काही समाधान देऊन जाईल…

…श्याम 🍁🍁

ब्लॉग लिंक :- https://manspandan.home.blog/2019/06/04/सुखानंद


 

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..