नवीन लेखन...

सौंदर्य

सौंदर्य हा असा एक शब्द कि ज्याचा नुसता ऊच्चार जरी कानावर पडला तरी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होतात. आपण म्हणतोच की जितक्या व्यक्ती तितक्या प्रक्रुती. त्यामुळे प्रत्येकाची सौदर्याची व्याख्या वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक व्यक्तीचा सौदर्य किंवा सुंदरतेकडे पहाण्याचा द्रुष्टीकोन वेगळा असतो.

सौंदर्य कशात नाही, या भुतलावरील प्रत्येक व्यक्ती प्राणी, निसर्ग या प्रत्येक ठिकाणी सौंदर्य ओतप्रोत भरले आहे फक्त तुमच्याकडे ते सौंदर्य ओळखण्याची नजर असली पाहिजे. लहान बाळाच्या प्रत्येक हालचाली मधे सौंदर्य असते ते आपण सुध्दा अनुभवू शकतो फक्त त्या साठी आपल्याला त्याच्या आईची नजर असली पाहिजे. तिच्या नजरेतून जर आपण पाहिले तर आपल्याला त्या लहान बाळात सौंदर्य दिसून येईल.

निसर्गाचा सौंदर्य अविष्कार पहायला तुमच्याकडे बालकविचे मन तशी द्रुष्टी हवी. त्यांच्या नजरेतून पाहील्यावरच आपल्याला फुलांचे सौंदर्य, फुलपाखरांचे मनमोहक रंग, जंगलातील विविध व्रुक्ष वाघ सिंहासारखे जंगली प्राणी, विविध पक्षी यांच्यात लपलेले सौंदर्य दिसून येईल व आपण त्याचा अनुभव घेऊ शकू.

आपण सर्वच ईश्र्वराची पुजा करतो नतमस्तक होत असतो त्या ईश्र्वराचे नामस्मरणात भजन किर्तनातील आनंद अनुभवायचा तर वारकरीच व्हायला हवे. पंढरपूर मधील त्या विठ्ठलाचे मुर्तीतील सौंदर्य , संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचे अभंगातील सौंदर्य तो वारकरीच अनभवू शकतो. त्या सौदर्याची अनुभूती घेण्यासाठी तो वर्षानुवर्ष न चुकता न थकता ऊन, वारा, पाऊस यांची कोणतीही काळजी न करता मैलोमैल अनवाणी चालत असतो.

आपणाला अशा प्रकारे वेगवेगळ्या सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी त्या त्या वेळी वेगळया भुमीकेत शिरावे लागते. तरच आपण त्यातील सौंदर्य अनुभवू शकतो. समुद्राच्या लाटांच्या आवाजात सुध्दा सौंदर्य असते त्या साठी समुद्राच्या सनीध्यात जायला हवे. नुसते चित्र किंवा सिनेमात समुद्र पाहून त्याचे सौदर्य समजू शकत नाही. सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीचे सौंदर्य अनुभवायचे तर स्टेडीयमवर जाऊनच त्याचा आनंद घेतला पाहिजे. टीव्ही वर पहायला कितीही छान वटले तरीही खरा आनंद प्रत्यक्ष पाहण्यातच आहे. पं.भिमसेन यांचे अभंगातील सौदर्य लुटायचे तर रेडिओ किंवा टीव्ही पेक्षा सवाई गंधर्व महोत्सवात सहभागी होणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे आपण आपल्या जिवनात विविध प्रकारानी सौंदर्याची अनुभूती घेऊ शकतो. फक्त त्यासाठी हवी योग्य द्रुष्टी आणी त्यात झोकून देण्याची प्रबळ ईच्छाशक्ती.

— सुरेश गोपाळ काळे

५ जुलै २०१७
रात्री : ११:१०

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..