नवीन लेखन...

होंडा कंपनीचे संस्थापक सोईचिरो होंडा

होंडा कंपनीचे संस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९०६ रोजी झाला.

यश हा आपल्या कामाचा एक टक्का भाग असून ९९ टक्के कामाचा परिणाम आहे, त्याला अपयश म्हटले जाते, असे सोईचिरो होंडा यांचे मत होते.

सोईचिरो होंडा यांचे बालपण वडिलांसोबत सायकल दुरुस्त करण्यात गेले. हायस्कूल मध्ये असताना त्यांनी ऑटोमोबाइल आणि गॅसोलिन इंजिनची दुरुस्ती करणाऱ्या ‘टोकियो आर्ट शोकाई’ या कंपनीची जाहिरात पाहिली. त्याच वेळी सोइचिरो यांनी या कंपनीत काम करण्याचे ठरवले. मात्र, जी जाहिरात त्यांनी पाहिली ती कोणत्याही नोकर भरतीची नव्हती. तरीदेखील त्यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी कंपनीला पत्र लिहिले अन्ा वयाच्या १५ व्या वर्षी ते हायस्कूलचे शिक्षण अपूर्ण सोडून ‘आर्ट शोकाई’ कंपनी जॉइन करण्यासाठी टोकियोत पोहोचले. तेथे त्यांना कामाच्या माेबदल्यात फक्त पॉकेटमनी मिळत असे. कंपनीचे मालक युजो साकाकीबारा यांनी होंडा यांच्यातील अभियंता ओळखून त्यांची मोटार स्पोर्ट्सेमध्ये रुची निर्माण केली. सन १९२३ मध्ये साकाकीबारा यांनी रेसिंग कार बनवणे सुरू केले व होंडा त्यांना मदत करू लागले. १९२४ मध्ये त्यांनी बनवलेल्या कर्टीस कारने जपान ऑटोमोबाइल स्पर्धा जिंकली. २० व्या वर्षी होंडा यांना सैन्यदलात नोकरीसाठी बोलावण्यात आले; परंतु रंगांधळेपणामुळे त्यांना डावलण्यात अाले. १९२८ मध्ये २२ वर्षांचे असताना त्यांनी आपले शहर हामामात्सूत ‘आर्ट शोकाई’ची शाखा उघडली व तेथे दुरुस्तीशिवाय इतर कामेही सुरू केली. या कंपनीने फायर इंजिन बनवले आणि डंप ट्रकपासून बस बनवण्याचे काम सुरू केले. जेव्हा शाखा सुरू झाली तेव्हा फक्त एक कर्मचारी होता. मात्र, १९३५ पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या ३० झाली. ७ जून १९३६ रोजी एका रेसमध्ये होंडा यांचा अपघात झाला. त्यात ते किरकोळ जखमी झाले; परंतु त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. ऑक्टोबरमध्ये त्यांनी आणखी एका रेसमध्ये भाग घेतला. मात्र, वडील रागावल्याने आणि पत्नी नाराज झाल्यामुळे त्यांना रेसिंगची आवड सोडली. होंडा यांनी हामामात्सू शाखेला पिस्टन रिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये रूपांतरित करण्याची योजना बनवली; परंतु त्यांच्या गुंतवणूकदाराने त्यांना असे करण्यास नकार दिला. कारण नवे काम सुरू करणे त्यास अनावश्यक वाटले. मात्र, या योजनेला मूर्त स्वरूप देण्याचा होंडा यांनी निश्चय केला होता. त्यासाठी शिचिरो काटो या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने सन १९३७ मध्ये त्यांनी स्वत:ची ‘टोकाई सेकी हेवी इंडस्ट्री’ स्थापन केली. काटो या कंपनीचे अध्यक्ष बनले. या काळात जपान चीनसोबत युद्धात सहभागी झाला होता. होंडा हे दिवसा ‘आर्ट शोकाई’मध्ये काम करत आणि रात्री ‘आर्ट पिस्टन रिंग रिसर्च सेंटर’मध्ये जायचे. दोन वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर पिस्टन रिंगची चाचणी यशस्वी झाली. त्यांनी ‘आर्ट शोकाई’ची हामामात्सू शाखा प्रशिक्षणार्थींना सोपवून दिली आणि ते ‘टोकाई सेकी’ कंपनीत अध्यक्ष म्हणून सहभागी झाले. मात्र, तरीही त्यांचा संघर्षाचा काळ संपलेला नव्हता. कारण ‘टोयोटा’ कंपनीसाठी त्यांनी तयार केलेल्या ५० पिस्टन रिंगची पहिली ऑर्डर फेल गेली. केवळ तीनच रिंगा टोयोटाच्या गुणवत्तेवर टिकल्या. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगचे तंत्र शिकण्यासाठी होंडा जपानच्या अनेक कंपन्यांमध्ये गेले. दोन वर्षांनंतर ते चांगल्या गुणवत्तेच्या पिस्टन रिंगांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आणि ‘टोयोटा’ व ‘नाकाजिमा एअरक्राफ्ट’सारख्या कंपन्यांना त्यांचा पुरवठा करण्यात यशस्वी झाले.

पॅसिफिक युद्धकाळात ७ डिसेंबर १९४१ मध्ये त्यांच्या कंपनीला जपानी सैन्याने ताब्यात घेतले. सन १९४२ मध्ये ‘टोयोटा’ कंपनी ‘टोकाइ सेकी’ कंपनीत ४० टक्के भागीदार बनली आणि होंडा यांना सीनियर मॅनेजर बनवले. या काळात कंपनीतील पुरुष कर्मचारी सैन्यात भरती झाले आणि महिला कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक कामाची जबाबदार घेतली. जपानवर हवाई हल्ले वाढू लागले होते. युद्धानंतर झालेल्या भूकंपात इवाटा प्लांटदेखील नष्ट झाला. ऑगस्टमध्ये जपान युद्ध हरले आणि त्यानंतर जपान व होंडा यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.

देशाची आर्थिक स्थिती व इन्फ्रास्ट्रक्चरसोबत ऑटोमोबाइल मार्केट नष्ट झाले होते. तसेच इंधनाची कमतरताही भासू लागली. त्यामुळे अधिकाधिक जपानी नागरिक सायकलचा वापर करू लागले. याच काळात होंडा यांनी ५० सीसीचे टू-स्ट्रोक इंजिन आणि सायकलपासून मोटारसायकल बनवण्याची कल्पना आणली. १९४६ मध्ये ४० वर्षीय होंडा यांनी ‘होंडा रिसर्च टेक्निकल इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. तसेच १९४९ मध्ये २० कर्मचाऱ्यांसोबत ‘होंडा मोटार कंपनी’ सुरू केली. त्यानंतर त्यांनी काळासोबत मोटाराइज्ड बायसिकलच्या डिझाइनमध्ये जपानी ग्राहकांच्या सुविधेसाठी अनेक बदल घडवले. १९६० मध्ये होंडा यांनी उत्तर अमेरिकेच्या बाजारात पाऊल टाकले. त्यांच्या माेटारसायकलने कितीतरी ग्रँड प्रिक्स, मोटोक्रॉस आणि इनड्युरो स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांची कंपनी १९८० च्या सुरुवातीला जपानची सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी बनली.

होंडा यांचे ५ ऑगस्ट १९९१ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..