नवीन लेखन...

सिझलर

काल पॉश हॉटेलमधे गेलो होतो. बाकीच्यांनी काय घेतलय ह्याचा एक क्विक सर्व्हे केला आणि आपण काहीतरी हाटके मागवुन बायकोला खुश कराव अस वाटल. किंमतीकडे बघत हॉटेलच मेनूकार्ड पिंजुन काढल आणि सराईतासारख वेटरला बोलवुन सर्वात महागड ” वन कॉंटीनेंटल सिझलर प्लीज ” अस फर्मावल.

ऑर्डर येईपर्यहांत हॉटेलच इंटिरीयर, छान छान येणारे जाणारे वगैरे बघण्यात वेळ चांगला जात होता. दुसरा एक वेटर येउन ” सर, वॉटर मिनरल ऑर रेग्युलर?” विचारुन गेला. त्याला ” बिसलरी वन बाय टू सांगितल.” बिचकला बिचारा. दहा एक मिनीट उलटल्यावर हॉटेलच्या किचनमधुन फोडणी दिल्यासारखा चु र्र् र् र् आवाज आला आणि किचनमधुन बाहेर पडलेला वेटर थेट आमच्या दिशेने येताना तोच चु र्र् र् र् आवाज जास्त स्पष्ट होत गेला. लाकडाच्या लांबटगोल पोळपाटावर कोरलेल्या खोलगट भागामधुन येणारे बुडबुडे आणि धूर बघुन मला वाटल हॉटेल मालकानी जेवणापूर्वी आमची दृष्ट काढायच ठरवल असाव.

वेटरनी तो लाकडी पोळपाट माझ्यासमोर ठेवला आणि फोडणीची तड तड बघुन माझ्या मनात च र्र् र् र् झाल. ” युवर अॉर्डर सर ” अस सांगुन “मे आय सर्व्ह ” असा प्रश्णही केला. हे विहंगम दृष्य पहाताना आजु बाजूचा अख्खा हाँटेल स्टाफ आपल्या अॉर्डरला स्टँडिंग ओव्हेशन देतोय असा फील मला आला. मी स्वतःला सावरल आणि वेटरला ” वुई विल टेक केअर ” सांगुन फुटवल.

आलेला जिन्नस हे आपण विकत घेतलेल दुखण आहे, आता हे हाताळायच कस! काहीच कळेना. तरीपण न डगमघता आंतर्मनाचा आवाज एकला ” अरे सजीवांना जेरीस आणणारा तू, निर्जीव सिझलरपुढे का हतबल होतोयस. ते एक सिझलर, तर तू दहा सिझलर आहेस. ” छाती फुगवुन मी स्पॉट डिसीजन घेतला. इतका वेळ समोरासमोर बसलेले आम्ही एका बाजुला बसुन पोळपाटावरच्या सिझलरला केकसारखा पुढ्यात घेतला आणि जणुकाही वाढदिवस साजरा करत असल्यासारख भासवत ” वन स्नँप प्लीज ” म्हणत वेटरच्या हाती मोबाईल सोपवला.

मोबाईलवरचा फोटो माझ्या संकटविमोचक मुलीला सेंड करुन ” पोळपाटावरचा जिन्नस झुम करुन पहा आणि कसा खायचा ते सांग ” असे कळवले. ताबडतोब तिचा फोन आला आणि आळीपाळीनी तिच्या इंन्स्ट्रक्शन घेत घेत आम्ही सिझलरला गिळंकृत केल.

आत्मविश्वासानी वेटरच्या टीपसकट बिल पे केल आणि कारची किल्ली तर्जनीत सुदर्शनचक्रसारखी फिरवत हॉटेलमधुन निसटलो!

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..