नवीन लेखन...

सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) एक अजब रसायन

Silicon Valley - Ek Ajab Rasayan

अमेरिकेतील स्यान फ्रान्सिस्को ( San Francisco ) ते स्यान ओजे ( San Jose ) या ८० मैलांच्या पाट्याला ‘ बे अरिया’ ( Bay Area ) असे म्हणतात. हाच एरिया अख्या जगामध्ये ‘ सिलिकॉन व्ह्याली’ म्हणून ओळखला जातो. कॉम्पुटर, हार्ड वेअर, सोफ्ट वेअर ( Soft Ware ) आणि आय. टी. इंडस्ट्रीची ही मक्का म्हणून ओळखली जाते.या खेत्रातील १५० प्रमुख कंपन्यांची मुख्यालये ( Head Quarters ) याच भागात आहेत. यामध्ये इंटेल (Intel ), Apple , गुगल ( Google ), याहू (yahoo ), Oracle , सिस्को ( Cisco ), एच. पी. ( H.P. ),सन मायक्रो ( Sun Micro ), फेसबुक ( Face book ), Twitter , यु ट्यूब ( You Tube ), या प्रमुख कंपन्या आहेत. IBM, डेल (Dell), Microsoft या प्रमुख कंपन्या या भागातील नाहीत. पण या भागाचे महत्व ओळखून व या भागात आपला प्रेझेन्स असावा म्हणून या कंपन्यांनी सिलिकॉन व्ह्याली मध्ये आपली ऑफिसेस थाटली आहेत.

सिलिकॉन व्ह्याली हे एक अजब रसायन आहे. उद्योग व्यवसायातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी येथे घडत असतात.अनेक नवीन उत्पादनाबरोबरच अनेक नवीन कल्पना, नवीन विचार, नवीन परंपरा यांचा जन्म येथे होत असतो.

पहिली गोष्ट म्हणजे येथील बहुतेक प्रमुख कंपन्यांचे संस्थापक हे शाळा- कॉलेजमधील ड्रोप आउट झालेले किंवा शिक्षण पूर्ण न केलेले आहेत. त्यातील बहुतेक जण गरीब- मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. बहुतेक जणांना उद्योग व्यवसायाची कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. असे असूनही आज ही मंडळी प्रसिध्धीच्या झोतात आहेत. यातील कित्येक जणांची नावे जगातील अब्जाधीश व्यक्तींच्या यादीत झळकली आहेत. बहुतेकांनी अगदी तरुण वयातच हे यश संपादन केले आहे. खालील यादी बघा.

बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रोप औट. Microsoft ची स्थापना. श्रीमंत क्र. २. संपत्ती ५६ अब्ज डॉलर्स म्हणजे २४७५ अब्ज रुपये. वय ५५ वर्षे.

लेरी अलीसन ( Larry Ellison ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रोप औट. Oracle ची स्थापना. श्रीमंत क्र.५. संपत्ती ३९.५ अब्ज डॉलर्स म्हणजे १७७५ अब्ज रुपये. वय ६६

स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कोलेज ( Reed College Portland ) मधून ड्रोप औट. Apple ची स्थापना. श्रीमंत क्र.११०. संपत्ती ८.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ३८२.५ अब्ज रुपये. वय ५६.

मार्क झुकेरबर्ग( Mark Zuckerberg ) :- हार्वर्ड मधून ड्रोप औट. Face book ची स्थापना. श्रीमंत क्र.५२. संपत्ती १३.५ अब्ज डॉलर्स म्हणजे ६०७.५ अब्ज रुपये. वय २७

जेरी यांग ( Jerry Yang ) आणि डेव्हिड फिलो ( David Filo ):- दोघेही Stanford युनिवर्सिटी मध्ये पी. एच डी. करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Yahoo ची स्थापना.

जेरी यांग( Jerry Yang )-श्रीमंत क्र.९३८. संपत्ती १.३ अब्ज डॉलर्स म्हणजे ५८.५ अब्ज रुपये. वय ४२.

डेव्हिड फिलो ( David Filo )- श्रीमंत क्र.८७९. संपत्ती १.४ अब्ज डॉलर्स म्हणजे ६३ अब्ज रुपये. वय ४५

सर्जी ब्रिन ( Sergey Brin ) आणि ल्यारी पेग ( Larry Page ) :- दोघेही Stanford मध्ये पी. एच डी करत होते. शिक्षण अर्धवट सोडले. Google ची स्थापना

सर्जी ब्रिन ( Sergy Brin )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३८.

ल्यारी पेग ( Larry Peg )- श्रीमंत क्र.२४. संपत्ती १९.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ८९१ अब्ज रुपये. वय ३७

दुसरी गोष्ट म्हणजे यातील बहुतेक कंपन्या या अत्यल्प भांडवलावर, ग्यारेजेस मध्ये सुरु केलेले अती अल्प लघु उद्योग ( Very Small Scale Industry ) आहेत. आज याच कंपन्यांचे रुपांतर जगातील मोठ्या, प्रतीष्टीठ, दर्जेदार आणि बलाढ्य कंपन्यांमध्ये झाले आहे. बीझिनेससाठी शाळा कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असतेच असे नाही. तुमच्याकडे जर चांगला बिझिनेस प्लान किंवा कल्पना असेल तर शाळा कोलेजच्या शिक्षणात वेळ घालविण्यात काही अर्थ नाही. कारण हे शिक्षण जरूर भासल्यास तुम्ही नंतर केव्हाही पूर्ण करू शकता. अशी येथील विचार धारा आहे.

माणसाच्या क्वालिफिकेशन, डिग्री, परीक्षेतील मार्क, टक्केवारी, ग्रेड या पेक्षा त्याचा ‘ Talent ‘ महत्वाचा! त्याच्या ‘पास्ट पर्फोर्मंस ‘ ( Past Performance ) पेक्षा तो ‘फ्युचर ‘मध्ये काय करू शकतो हे महत्वाचे. त्याची traditional पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करायची कुवत किती हे महत्वाचे. त्याला किती नवीन कल्पना सुचू शकतात हे महत्वाचे. सिलीकोन व्ह्यालीमधील बोझीनेस हा पाया आहे. म्हणूनच हा भाग जगातील Technology व Talent चा हब ( Hub ) म्हणून ओळखला जातो.

परंतु तेथील बिझिनेस या एवढ्याच क्वालिफिकेशन वर यशस्वी झालेले नाहीत. वरील लोकांमध्ये आहे तो धृढ आत्मविश्वास. स्वतःच्या क्षमतेवर आणि कर्तुत्वावर असलेला पूर्ण विश्वास! आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा आपले उत्पादन/ कल्पना/ आयडिया जास्त चांगली आहे या विषयी असलेली अतूट श्रद्धा! आणि कांहीतरी वेगळे, ‘हटके’, नवीन करण्याची प्रबळ इच्छा आणि तळमळ. या मुळेच हे बिझिनेस एवढे मोठे होऊ शकले.

माणसाच्या Talent वर त्याला प्रगतीची संधी देणारा हा भाग आहे. या मध्ये जात, पात, लिंग भेद, कातडीचा रंग या गोष्टी आड येवू नयेत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अख्या जगातले Talented तरुण सिलीकोन व्ह्यालीकडे आकर्षित झाले नसतील तरच नवल! आज सिलीकोन व्हालीमध्ये जेवढे फोरीन वर्कर्स काम करतात तेवढे जगात कुठेच आढळून येत नाहीत. तसेच त्यांच्या जेवढी विविधता दिसून येते तेवढी जगात दुसरीकडे कोठेच आढळून येणार नाही. या मध्ये हेस्प्यानिक ( म्हणजे mexico तून आलेले व Spanish मातृ भाषा असलेले ) लोक सर्वात जास्त आहेत. त्यानंतर आशियाई लोकांची संख्या आहे. यामध्ये चीनी आणि भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर जपानी, कोरियन, तैवानीज, Vietnam मधून आलेले लोक, फिलिपिनो यांची संख्या आहे. त्यानंतर इतर देशातून आलेल्या लोकांची संख्या आहे. आज सिलिकॉन व्ह्यालीमधील ४६ % लोकसंख्या परदेशातून आलेल्या लोकांची आहे. त्या मुळे तेथे खऱ्या अर्थाने जागतिक संस्कृतीचे दर्शन घडते. तसेच भारतातील अनेक राज्यातील लोक तेथे गेले आहेत. त्यामुळे तेथे मिनी भारत दर्शन घडते.

व्यवस्थापन क्षेत्रात या विभागावे अनेक नवीन कल्पना अमलात आणल्या, अनेक नवीन पायंडे पडले. येथे अगदी वेगळ्या प्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात आल्यावर मुलाखतीच्या तंत्रामध्ये ( Interview Techniques ) अमुलाग्र बदल करण्यात आले. हल्ली मुलाखतीमध्ये कोडी ( Puzzles ) विचारण्याची पध्धत बर्याच ठिकाणी अवलंबली जाते. त्याची सुरवात येथूनच झाली. उत्तम मनुष्यबळ पुरविण्याचे काम शाळा, कॉलेजेस आणि Universities करत असतात हे ध्यानात आल्यामुळे तेथील कंपन्यांनी शिक्षण संस्थांबरोबर घनिष्ट संबंध पहिल्यापासूनच ठेवले आहेत. Stanford हि जगप्रसिध्ध University याच भागात आहे. ही खाजगी University जगातील नम.१ ची सर्वोत्तम University समजली जाते. याचे बजेट हे अनेक राष्ट्रांच्या बजेट पेक्षा जास्त असते. SUSJ (State University of San Jose), University of Santa Clara तसेच बर्कले येथील University या चार प्रमुख Universities या भागात आहेत

येथील CEOs नी बॉस या कल्पनेमधेच अमुलाग्र बदल घडवून आणले. कंपनीचा बॉस हा नेहमी सुटा-बुटातच असला पाहिजे. त्याला भली मोठी केबिन असायला पाहिजे. त्याच्या भोवती सेक्रेटरींची टीम असायला हवी अशी जी परंपरा होती ती पार मोडीत काढली. कंपनीचा बॉस हा सुध्धा कंपनीतील इतर साध्या सुध्या वर्कर सारखाच असावा. त्याने पण इतरांसारखेच हॉल मध्ये बसून काम करावे. त्याला केबिन, सेक्रेटरी असा थाट नसावा. तसेच त्याचे कपडे पण सर्व साधारण माणसांसारखे साधे व क्याजुअल असावेत असा नवीन पायंडा पडला.

छोट्या स्टार्ट अप कंपनीचे रुपांतर जगातल्या मोठ्या कंपनीत कसे करता येते हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. श्रीमंतीचे वाटप कसे करता येते. व्यवस्थापन क्षेत्रात किती नवीन कल्पना राबविता येऊ शकतात हे सिलीकोन व्ह्यालीने दाखवून दिले आहे. आज सिलीकोन व्ह्यालीमधील कंपन्या जेवढा रेवेन्यु निर्माण करतात तेवढा जगात दुसरीकडे कोठेच निर्माण होत नाही.

आज भारतीय लीकांना अमेरिकेमध्ये जी इज्जत, प्रतिष्ठा, सन्मान आणि गौरव मिळतो आहे त्यामध्ये सिलिकॉन व्यालीचे योगदान फार मोठे आहे. आज तेथे हजारो भारतीय तरुण अभियंते आणि तंत्रज्ञ तेथील सर्वच कंपन्यांमध्ये उत्तम काम करीत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये अनेक भारीतीय उच्च पदावर काम करीत आहेत. यामध्ये मराठी लोकांची पण संख्या लक्षणीय आहे. आपण सुध्धा उच्च दर्जाचे काम उत्तम पणे करू शकतो असा आत्मविश्वास भारतीयांमध्ये जागृत करण्याचे फार मोठे काम सिलिकॉन व्हालीने केले आहे.

भारतीय, विशेषतः मराठी तरुणांना यातून बरेच काही शिकता येण्यासारखे आहे.

आज भारताची जागतिक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने घोड दौड चालू आहे. याचा अर्थ आज जागतिक स्तरावर उद्योग व्यवसाय सुरु करण्याची संधी भारतीय तरुणांपुढे चालून आली आहे. मराठी तरुण तरुणींनी या सुवर्ण संधीचा फायदा उठवावा. ज्याप्रमाणे पेशव्यांच्या काळात मराठी झेंडा अटकेपार( जे आता पाकिस्तानात आहे) नेला होता. त्याप्रमाणे उद्योग vyavasayachya nimittane मराठी झेंडा अमेरिका ते new ziland paryant akhya jagat phadakawa. तसेच यापुढे मराठी समजताच बिल गेट्स आणि मार्क झुकेरबर्ग निर्माण व्हावेत हीच शुभेच्छा!

उल्हास हरी जोशी
June 8, 2011 at 11:53 am

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..