नवीन लेखन...

शेतकरी नवरा-नको रे बाबा !

हरि ॐ

आपला भारत कृषिप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळखला जातो. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न अनुत्तरीतच आहे व त्यावर अजून तरी काही ठोस पाऊले उचल्याची बातमी नाही. नुसते अनुदान देऊन प्रश्न सुटेल असे वाटत नाही.

आज गावागावात शेतकरी मुलांच्या लग्नाच्या समस्या त्यांच्या पालकांना भेटसावत

आहेत. त्यातून शहरातील बर्याच मुली अशी स्थळे नाकारताना दिसतात त्याला कारण आपल्या राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि शासनाने गावखेडयांकडे केलेले दुर्लक्ष. लहान लहान गावखेडी अजून पाहिजे तशी विकसीत झालेली नाहीत कारण त्याला मुलभूत गरजांचा अभाव. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला पाहिजे तसा बाजार भाव नमिळाल्याने त्यांचे नुकसान होते. शेतकर्‍याच्या हातात शेतीच्या नवनवीन वस्तू खरेदीसाठी पैसा शिल्लक राहत नाही यामुळे कर्जाचे हप्ते थकतात त्यांची मुलेबाळे चांगल्या शिक्षणा पासून वंचित राहातात. शेतकर्‍यांची मुले शेती हा पारंपारिक धंदा न करता पैसे कमविण्यासाठी शहराकडे वळतात. याने शहरावर अतिरिक्त ताण पडतो.

नुकत्याच पास झालेल्या महिला शिक्षकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम एका चॅनलवर चालला होता व त्यात त्यांना लग्न व तद्नुशंगाने विविध प्रश्न विचारले जात होते तसेच शेतकर्‍यांच्या समस्येवरही प्रश्न विचारले जात होते उदा.‘तुमच्या मुला बद्दलच्या अपेक्षा काय आहेत? ‘तुम्ही खेडेगावात राहाणार्‍या शेतकरी मुलाबरोबर लग्न करण्यास तयार आहात का ? तुमचे शेतकरी मुलाबाबत काय विचार आहेत ? तुम्हीं त्याला कशा रितीने त्याच्या व्यवसायात मदत कराल ? इत्यादी.

मुलाखती दरम्यान नुकत्याच शिक्षकी अभ्यासक्रम परिक्षा पास झालेल्या परंतू लग्न न झालेल्या महिला शिक्षकांनी दिलेल्या उत्तराने लग्न या पारंपारिक व्यवस्थेला व बुरसटलेल्या समाज प्रथेविरूद्ध आवाज उठवल्याचे अभिप्रेत झाले. काही मुलींनी सांगितले की आंम्ही नोकरी करून मिळणार्‍या उत्पन्नाचा उपयोग आपल्या नवर्‍याला शेतीसाठी उपयुक्त नवनवीन साधने विकत घेण्यासाठी करू. सासरच्या कोणी व्यक्तीने आम्हांला नोकरी सोडा असे म्हणू नये ही त्यांची अट आहे. कारण शेतीत झालेले नुकसान त्या निदान नोकरी करून मिळणार्‍या पगारातून कुटुंबाला हातभार लाऊ शकतात. मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळू शकते आणि नवर्‍याच्या शेतीव्यवसायात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत संसाराचा गाडा चालण्यासाठी मदत होऊ शकते. काहींना आपल्या नवर्‍याने शेतीविषयी नवनवीन तंत्रज्ञान शिकून ते आपल्या शेतीव्यवसायात उपयोगात आणावे असे वाटते. काहींना कृषिविषयक पदवीधर मुलगा चालणार आहे. काहींच्या मते मुलाला जर योग्य आर्थिक पाठबळामुळे कृषिविषयक शिक्षण पात्रता असून मिळाले नसेल तरी त्याला आर्थिक मदत करण्याची इच्छा आहे. त्या सर्व मुलींचा एक सूर असा होता की फक्त शेती एके शेती नकरता काही जोड धंदे करावेत जसे कुक्कुट पालन शेळीमेंढी पालन इ. त्यांच्या शेतीउत्पादनासाठी सेंद्रिय खतांवर भर देण्याच आग्रह होता. ज्यामुळे जमिनीचा पोत राहून फळे फुले व भाजीपाला चांगल्या प्रतीचा मिळू शकतो. त्यांच्या म्हणण्यानुसार गांडूळ खत वापरल्यानेही मळयातील बागबगीचा चांगला फळाफुलायला लागतो.

या सर्व मुलाखती शेवटी असा निश्कर्ष निघतो की मुलींना मिळालेल्या शिक्षणाच्या जोरावर त्या नोकरीव्यवसाय करून आपली व कुटुंबाची चांगल्या प्रगतीची सूखी स्वप्ने बघत आहेत. मग त्यासाठी त्यांना नोकरी करण्यासाठी अपार कष्ट सोसावे लागले तरी ते घेण्याची त्यांची दूरदम इच्छाशक्ती आहे. शेतकर्‍याचे भविष्य उज्वल म्हणजे देशाचे भविष्यही उज्वल. याने हुंडयासारख्या प्रथाही मोडीत निघतील व इतर प्रलोभनांपासून सगळेच दूर राहातील. अशा आशावादी व प्रॅक्टीकल विचारांच्या मुलींचा आदर्श राज्यातील इतर होतकरू मुलींनी ठेवावा. याचा अर्थ असा नाही की सर्वच होतकरू मुलींनी शेतकरी मुलगा पसंती द्यावी. शेती वाचल्याने निसर्गाचा समतोल नैसर्गिकरित्या राखला जाऊन वसुंधरा अधिक बहरेल.

जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प.)

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..