नवीन लेखन...

शनिवारच साहित्य : कविता : मात

साधला मी मध्य आता दोन ध्रुवांच्या मध्ये
शोधला आता दुवा मी भाकरी अन भुके मध्ये
पाय नरकात माझे हृदय पण स्वर्गात गेले
इमान रखण्यासाठीच मी थोडे मला बईमान केले
रात्र आली रात्र गेली काळोख ना सरला कधी
सूर्य तो दिसतो कसा पाहण्यास नाही अवधी
एक सिंहासन असा मी झोपडीतच थाटला
मीच राजा झोपडीचा दुःख झाली माझी प्रजा
 
क्षणभराचा जन्म आहे दुःखतर गगनापरी
देहास थोडे सोसणे सहणे अमाप आहे उरी
काय दुःखाची मिजाज हास्य माझे चोरण्याची
संवेदने वर मात करुनी केली तयारी भोगण्याची
 
आज गारुडीच झाला घायाळ सर्पदंशामुळे
पाळला जर साप त्याने प्रारब्ध नाही वेगळा
कुंठणे सोडून झगडा दारिद्रयास देणे चालले
दुःख अन काष्टावरी उपहासात हसणे चालले
 
— विनायक आनिखिंडी, पुणे
९९२२९७०३१७

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..