नवीन लेखन...

ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा

 

ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वर येथे झाला.

शंकर सारडा यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्यांनी एस.पी. कॉलेजमधून मराठी विषयातील पदवीचे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून एमए केल्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी मास कम्यनिकेशनचे शिक्षणही पूर्ण केले. किशोरवयापासूनच शंकर सारडा यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. त्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांची समीक्षा केली आहे. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंब-यांचा त्यांनी अनुवाद केला आहे. सारडा यांचे १९५० पासून बालसाहित्यात मोठे योगदान आहे. झिप-या आणि रत्नी, नंदनवनाची फेरी, दूरदेशचे प्रतिभावंत, जेव्हा चुंबनाला बंदी होते, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्रीवादी कादंबरी, विश्वसाहित्यातील फेरफटका, बेस्टसेलर बुक्स, ग्रंथ संवत्सर, ग्रंथ वैभव, ग्रंथ विशेष अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. अमरेंद्र गाडगीळ मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार शंकर सारडा यांना देण्यात आला होता. याशिवाय, पहिल्या ह.मो.मराठे स्मृती गौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. शंकर सारडा यांनी १९६८ साली ह.मो.मराठे यांची ‘नि:ष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही कादंबरी साधनाच्या दिवाळी अंकात अतिथी संपादक या नात्याने प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले होते. सातारा येथे १९९३ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.

सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते.

शंकर सारडा यांचे साहित्य.

बालसाहित्य: चतुर चंपा, मधुमुरली, राणीपरीची कृपा, झिप-या आणि रत्नी, गुराख्याचे पोर, चंद्रपरी आणि सोनसखा, राक्षसाने उचलली टेकडी, नंदनवनाची फेरी, मला मोठं व्हायचंय, देवदुताचं दु:ख, सोन्याच्या टेकडीचा शोध, जादूमंतर छू, शर्थ पराक्रमाची, मर्कटराजाच्या लीला, मांत्रिकाची जिरली मस्ती ..

समीक्षा व इतर : काही पुस्तके काही लेखक, गुलमोहोर, पुस्तकांचं जग, दूरदेशचे प्रतिभावंत, ग्रंथविशेष, ग्रंथविशेष, ग्रंथचैतन्य, ग्रंथ संवत्सर, स्त्रीवादी कादंब-या, दशकातील पुस्तके, ग्रंथवैभव, विश्वसाहित्यातील फेरफटका, प्रिय चौकसराव, अक्षरभेट, बेस्टसेलर्स, लवंगी मिरच्या (हास्यकथा), जय भोलेनाथ (नाटिका), बोलके कमळ, केनेडी (चरित्र)

शंकर सारडा यांचे २८ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4111 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..