नवीन लेखन...

क्रिकेटमधील ज्येष्ठ समालोचक बाळ ज. पंडित

क्रिकेटमधील ज्येष्ठ समालोचक बाळ ज. पंडित यांचा जन्म २४ जुलै १९२९ रोजी झाला.

जगभरात कोठेही चालू असलेला क्रिकेटचा सामना घरबसल्या एचडी टीव्हीवर पाहत क्रिकेटचे बारकावे टिपणाऱ्या आजच्या तरुण पिढीला रेडिओवरील धावत्या समालोचनाचे महत्त्व कदाचित कळणार नाही. मात्र, आज चाळिशीत किंवा त्याहून अधिक वयाच्या असलेल्या पिढीसमोर रेडिओ ऐकत असतानाचे चित्र नक्कीच समोर येईल. दूरचित्रवाणी, इंटरनेट, मोबाइल आदी साधने नसतानाच्या काळात केवळ रेडिओवरूनच क्रिकेट सामन्यातील प्रत्येक क्षणाची स्थिती कळत असे. राष्ट्रीय स्तरावर इंग्रजी आणि हिंदीतून आलटून-पालटून समालोचन केले जात असताना मराठीतून समालोचन करण्याचा मार्ग प्रशस्त केला तो बाळ पंडित यांनी. मराठीतील धावते वर्णन आणि बाळ पंडित असे समीकरणच त्यांनी तयार केले. क्रिकेट सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन मराठी भाषेत आणि तेही ग्रामीण लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचविण्याचे कार्य बाळ ज. पंडित यांनी केले. अतिशय ओघवत्या मराठीत ‘चेंडू टोलवला, पायचीत, त्रिफळाचीत, चौकार, षटकार, सीमापार, पंच’ अशा शब्दांची पेरणी करीत, खेळातील रोमहर्षक घटना तितक्याच रोमहर्षकतेने आवाजात चढ-उतार करीत ते सांगत आणि रेडिओला कान लावून असलेल्या क्रिकेट रसिकाला जणू सामना पाहत असल्याचा आनंद मिळत असे.

त्यांचे समालोचन म्हणजे जणू संगीताची मैफल असे. चार दशकांहून अधिक काळ बहारदार समालोचन करीत असतानाच त्यांनी क्रिकेटवर विपुल लेखन केले. स्तंभलेखनापासून पुस्तकलेखनापर्यंत विविध माध्यमे त्यांनी हाताळली. त्यांच्या ‘पराक्रमी दौरा’ आणि ‘द लिटल मास्टर’ या पुस्तकांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. पुण्यातील, महाराष्ट्रातील क्रिकेटचा इतिहास त्यांना तोंडपाठ होता.

पूना क्लबवरील क्रिकेटपासून मुंबईतील चौरंगी-पंचरंगी सामन्यांपर्यंतचा तपशील ते बारकाईने सांगत असत. पालवणकर बाळू (पी. बाळू) या उपेक्षित क्रिकेटपटूबद्दल त्यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग देशातील क्रिकेटच्या इतिहासलेखनात झाल्याची आठवण ख्यातनाम इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी मध्यंतरी दिली होती.

मराठीबरोबरच इंग्रजी समालोचनही ते करीत. मात्र, राष्ट्रीय पातळीवरील लॉबिंगचा आपल्याला फटका बसल्याची खंत ते व्यक्त करीत. सी. के. नायडूंपासून सुनील गावसकरपर्यंतच्या विविध खेळाडूंशी त्यांची मैत्री होती. एमएम, एलएलबी असलेले पंडित यांना वारसा मिळाला तो जगन्नाथ महाराज पंडित यांचा. क्रीडाक्षेत्राबरोबरच शिक्षण आणि सामाजिक कार्यातही बाळ पंडित यांनी आपला ठसा उमटविला. शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मोलाचे काम केले. आळंदी संस्थानचेही ते विश्वस्त होते. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, सहसचिव आदी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे हाताळल्या. या संघटनेला नावारूपास आणण्यात आणि पुणे शहरास आंतरराष्ट्रीय सामन्यांचे संयोजन शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.बाळ ज. पंडित यांचे वाणी आणि लेखणी या दोहोंवर प्रभुत्व होते. बाळ ज. पंडित यांचे निधन १७ सप्टेंबर २०१५ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..