नवीन लेखन...

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचा जन्म १० मार्च १९४५ रोजी झाला.

कॉंग्रेसचा डायनामिक चेहरा म्हणून माधवराव शिंदे यांची ओळख होती. साताऱ्याजवळील कण्हेरखेड हे शिंद्यांचे मूळ गाव. शिंदे याच आडनावाला मध्य प्रदेशाता सिंदिया असंही संबोधतात. भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत जयाजीराव ग्वालियरचे राजे होते. मध्य भारतचा मध्य प्रदेशमध्ये समावेश होईपर्यंत त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहिलं. १९६२ मध्ये राजमाता विजयाराजे शिंदे पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेल्या आणि ही शिंदे घराण्यातील राजकारणातील एंट्री ठरली. काँग्रेस पक्षाच्या त्या पहिल्या सदस्य होत्या आणि नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९८४ ते १९९९ पर्यंत ग्वाल्हेर, पुन्हा १९९९ साली गुना अशा निवडणुका ते विजयी झाले.

ते राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात रेल्वेमंत्री होते. त्या काळात त्यांनी भारतीय रेल्वेच्या संगणकीकरणावर भर दिला. त्यानंतर ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात नागरी विमानवाहतूक मंत्री आणि मनुष्यबळविकासमंत्री होते. इ.स. १९९६ साली त्यांचे नाव जैन हवाला डायरी प्रकरणात गोवले गेल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसबाहेर पडून स्वतःचा मध्य प्रदेश विकास काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाचे उमेदवार म्हणून ते १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये परतले आणि त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ते काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाचे उपाध्यक्ष बनले. माधवराव शिंदे यांचे एका अपघातात निधन झालं आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजकीय वारसा सांभाळला.

१९९८ पासून शिंदे घराण्यातील कोणी ना कोणी सदस्य सातत्याने सत्तेत राहिला आहे. १९९८ मध्ये वसुंधराराजे तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री होत्या. त्यानंतर त्यांच्याकडे लघू उद्योग आणि कृषिप्रक्रिया व ग्रामीण उद्योग मंत्रालयांचा स्वतंत्र भार सोपविण्यात आला. डिसेंबर २००३मध्ये त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री बनल्या. त्या २००८ पर्यंत सत्तेत होत्या. याच काळात केंद्रात सत्तांतर घडले.२००७मध्ये यूपीए एकच्या काळात ज्योतिरादित्य शिंदे केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण खात्याचे राज्यमंत्री बनले. २००९ मध्ये यूपीए २ सत्तेत आल्यानंतर ज्योतिरादित्य यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग ही खाती आली. २००९ ते २०१४ या काळात ते ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री होते.

२०१३ मध्ये राजस्थानात सत्तापालट होऊन पुन्हा वसुंधराराजे मुख्यमंत्री बनल्या. ११ डिसेंबर २०१८ पर्यंत त्या पदावर कायम होत्या. याच काळात मध्य प्रदेशात यशोधराराजेही सत्तेत होत्या. २०१९ मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचा लोकसभेत पराभव झाल्याने २०२० मध्ये शिंदे घराण्यातील कोणी ही सत्तेत नव्हते पण आता ज्योतिरादित्य शिंदे हे भाजप तर्फे राज्यसभेत गेले आहेत.

३० सप्टेंबर २००१ रोजी माधवराव शिंदे निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..