देख तो दिल कि जाँ से उठता है

देख तो दिल कि जाँ से उठता हैये धुआं सा कहां से उठता है

गोर किस दिल-जले की है ये फ़लकशोला इक सुबह यां से उठता है

नाला सर खेंचता है जब मेराशोर एक आसमां से उठता है

लड़ती है उसकी चश्मे शोख़ जहाँइक आशोब वां से उठता है

बैठने कौन दे है फिर उसकोजो तेरे आस्तां से उठता है

यूं उठे आह उस गली से हमजैसे कोई जहां से उठता है

इश्क़ इक ‘मीर’ भारी पत्थर हैबोझ कब नातवां से उठता है(मीर तकी मीर)

प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो.आसपास सर्वत्र धूर धूर पसरलेला दिसत असताना मीर स्वतःच्याच मनाला सांगतोय. अरे हृदया, बघ तर हा धूर येतो आहे कुठून. हा धूर प्रेमात जळालेल्या एखाद्या भग्न हृदयातून येणारा तर हा धूर नाही ना! हे आकाश (फ़लक) कोणत्या जळून खाक झालेल्या प्रेमवीराचं थडगं (गोर) आहे. या थडग्यातही एवढी आग आहे की रोज सकाळी आगीचा एक गोळा इथून निघतो.आकाशाचा हा वास्ता कायम ठेवत मीर पुढे म्हणतो, हृदयातून निघणाऱ्या वेदना जेव्हा मला नको नको करून सोडतात तेव्हा अचानकपणे आकाशातून एक वेदनामय आवाज ऐकू येतो. (याच्या जिवाची कळ आकाशातील त्या प्रेमवीराला समजते.) त्या चंचल प्रेमिकेची नजर (चश्मे शोख़) जिथे जिथे पडते तिथे तिथे काहीतरी गडबड (आशोब) होतेच होते.जो तुझ्या घराच्या उंबरठयातून (आस्तां) एकदा बाहेर पडतो; त्याला कोण बसू देणार आहे मग! अर्थात तुझ्याकडचे दुःखाचे माप एकदा पदरात पडले की त्या जिवाच्या वाटयाला सुख, विश्रांती, आराम असा गोष्टी येतच नाहीत. तिच्या त्या गल्लीतूनही आम्ही असे निघून आलो की जणू काय आम्ही ही आलम दुनियाच सोडून निघालेलो आहोत.शेवटी स्वतःची समजूत घालताना मीर म्हणतो आहे, प्रेम हा एक प्रचंड मोठा दगड आहे. त्याचं वजन प्रत्येकाला पेलवेलच असं नाही. आणि एखाद्या नाजूक, कमकुवत माणसाला (नातवां) तर तो झेपावणं बिलकुल जमणार नाही.कोणत्याही मैफिलीमध्ये हमखास फर्माइश केलीच जाते असा गझलांपैकी ही एक आहे.

— डॉ. आनंद बोबडे

About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

1 Comment on देख तो दिल कि जाँ से उठता है

  1. डॉक्टर साहेब,
    तुमचें, दोन्ही ग़ज़लांवरील लेख वाचले. फारच छान. ( मीही असे ग़ज़ल / गीत अप्रिसिएशन चे कांहीं लेख लिहिलेले आहेत, व ते मराठी सृष्टीवर उपलब्ध आहेत. असो. मी लिहिण्यांमागील विषय तो नाहीं).
    डॉक्टर, तुम्ही मेडिकल डॉक्टर आहात, हें युमचा बायो डेटा संगतोहे, पण तुमचें लेखन & bio data पाहतां, तुम्ही लिटरेचरमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे, असें जणूं वाटावें.
    मी स्वत: एक ग़ज़लप्रेमी व अदनासा ग़ज़लगो आहे. आपले महफ़िल ए ग़ज़ल पुस्तकरूपात मिळतें कां ? मला विकत घेऊन वाचायला नक्कीच आवडेल. ( पुण्याला व मुंबईला कुठे मिळेल तें कळलें तर फार बरें).
    – सुभाष स. vistainfin@yahoo.co.in M-9869002126

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…