नवीन लेखन...

सशस्त्रसेना ध्वज दिन

‘हिमालयाच्या शिखरावरूनी सांगू जगाला सा-या गर्जुनी। खबरदार जर इथे याल, तर सांडतील रक्ताचे सागर’, अशी गर्जना करीत तळहातावर शिर घेऊन झुंजणा-या सैनिकांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस. घरादाराला आणि आप्तस्वकीयांना दूर सारून देशासाठी, स्वबांधवांच्या रक्षणासाठी कोसळत्या पावसात आणि गोठविणा-या थंडीत लढणा-या सा-या लढवय्यांचाच आज स्मरणदिन.

आजच्या ध्वजदिनाच्या निमित्ताने त्या सर्व वीरांचा स्मृतिदिन. राष्ट्राच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ रणांगणात देह ठेवणा-या वीरांच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सढळ हाताने मदत करणे, हे त्यांचे.. आपले, सर्वाचे कर्तव्यच आहे. आज जमा होणारा निधी म्हणजे त्या नरवीरांना आदरांजली वाहण्याचीच एक संधी आहे. म्हणूनच आज एका व्यक्तीचा नाही, तर देशरक्षणार्थ आपल्या प्राणांची कुरवंडी करणा-या सा-या वीरपुत्रांचाच स्मृतिदिन. त्या वीरमरण पत्करलेल्या वीरांचे स्मरण करून आजही आपले सैनिक म्हणताहेत, ‘शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे। सज्ज व्हा उठा चला, सैन्य चालले पुढे।।’

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 3188 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..