नवीन लेखन...

राज कपूर निर्मित — दिग्दर्शित “संगम” चित्रपट प्रदर्शनाला ५४ वर्षे झाली

प्रदर्शित तारीख १८ जून १९६४
राज कपूर ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये स्वत: राज कपूर, वैजयंतीमाला व राजेंद्र कुमार ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. संगमचे कथानक प्रेम त्रिकोणावर आधारित असून हा चित्रपट तब्बल ४ तासांचा आहे. संगम राज कपूर यांनी निर्मिती केलेला पहिलाच रंगीत चित्रपट होता. साने गुरुजींच्या ‘तीन मुले’ या कथेची साधारण कल्पना घेऊन के. अब्बास यांनी ‘संगम’ची कथा लिहिली. ही कथा प्रभावीपणे गुंफताना राज कपूर यांनी जी कल्पकता दाखवली, जे परिश्रम घेतले, त्याला तोड नाही.

कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, संकलन, कलादिग्दर्शन, छायाचित्रण, संगीत, पाश्र्वसंगीत या सर्वच आघाडय़ांवर हा चित्रपट लक्षणीय ठरला. संगममधील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘मेरे मन की गंगा’ या गाण्याचा किस्सा तेव्हा खूप गाजला होता. नायिकेच्या भूमिकेसाठी वैजयंतीमालाचा बरेच दिवस होकार येत नसल्याने आरकेने म्हणे तिला तार करून प्रश्न विचारला होता, ‘बोल राधा बोल संगम होगा के नही..’ आणि तिनेही ठसक्यात उत्तर दिलं होतं, ‘होगा, होगा, होगा!’ पुढे महान गीतकार शैलेंद्रने हे गाणं पूर्ण केलं आणि एसजेंनी त्याला सहज-सोप्या चालीत गुंफलं. गाण्यात नायिकेचा आवाज वापरण्याची कन्सेप्ट तेव्हा नवीनच होती. त्यानंतर अनेक नायिकांनी याचं अनुकरण केलं.

रफी यांनी गायलेल्या ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’ने लाखो कानसेनांवर मोहिनी घातली होती. इफ्तेकार, राजेंद्र कुमार, राज मेहरा, नाना पळशीकर, ललिता पवार, अचला सचदेव आणि हरी शिवदासानी हे सहयोगी कलाकार म्हणून कामे केली आहेत. हा चित्रपट दासरी नारायण राव यांनी तेलुगू आणि कन्नड भाषांत ‘स्वप्न‘ नावाने निर्माण केला॰ हिबरू भाषेतही हा चित्रपट ‘ Desperado Square ‘ या नावाने निर्माण झाला होता. या चित्रपटाला लागणारा वेळ २३८ मिनिटे (४ तास) होता॰ याला दोन मध्यंतरे होती; आणि Interval ऐवजी First Intermission / Second Intermission असे शब्द वापरले होते. त्यामुळे एका दिवसात ४ ‘खेळ‘ दाखवणार्‍या चित्रपटगृहांना पहिला ‘खेळ‘ सकाळी ७ वाजता सुरू करावा लागत असे. हा ‘आरके फिल्म्स‘चा पहिला रंगीत चित्रपट॰ म्हणून त्याची जाहिरात सिलोन रेडियोवर ‘आग‘ से लेकर ‘जिस देशमे‘ तक मनोरंजन के नऊ युग थे |

अब ‘संगम‘से दसवा रंगीन युग शुरू होता है I ‘, अशी अमीन सायानीच्या आवाजात होत असे. संगमसाठी राज कपूर यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार तर वैजयंतीमाला यांना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाले.
या चित्रपटाची कथा अशी होती॰ एका गावात सुंदर, राधा आणि गोपाळ ही तीन मुले लहानपणापासूनच सवंगडी म्हणून एकत्र वाढत असतात॰ सुंदरचे राधावर प्रेम असते आणि त्याने तिच्याशीच लग्न करण्याचे पक्के केले असते॰ सुंदरने वेळोवेळी आपले राधावरचे प्रेम व्यक्त केलेले असते॰ मात्र, राधा मनोमन गोपाळवर प्रेम करत असते॰ अंत:र्मुख असणारा गोपाळ आपले तिच्यावरचे प्रेम कधीच बोलून दाखवत नाही॰ सुंदरची हवाई दलात निवड होते॰ तो कश्मीरात लढाईवर जातो॰ जाताना तो गोपाळकडून राधावर लक्ष ठेवण्याचे वचन घेतो॰ युद्धात सुंदरच्या विमानाला अपघात झाल्याची आणि सुंदर मृत झाल्याची बातमी येते॰ काही दिवसांनी राधा आणि गोपाळ एकमेकांवर प्रेम करू लागतात॰

अचानक सुंदर सुखरूप परत येतो॰ गोपाळ आपल्या प्रेमाचा त्याग करतो आणि राधा–सुंदरचे लग्न होते॰ सुंदरच्या गैरहजेरीत गोपाळ राधाला सही न केलेले प्रेमपत्र लिहितो॰ राधा ते आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून जपून ठेवते॰ राधा-सुंदर मधुचंद्रासाठी युरोपमधील काही देशांत फिरून येतात॰ नंतर राधा गोपाळला त्यांच्या आयुष्यातून दूर जाण्यास सुचवते॰ एक दिवस सुंदरला ते सही न केलेले प्रेमपत्र सापडते॰ मग चिरपरिचित फिल्मी नाट्य॰ सुंदर पिस्तूल घेऊन येतो, मधल्या काळात न्यायाधीश झालेला गोपाळ त्याच पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून घेतो॰

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / प्रकाश चांदे
संगमचित्रपट

संगमचित्रपटातील गाणी.
https://www.youtube.com/watch?v=MISzXVVVFUo

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..