नवीन लेखन...

सकारात्मक दृष्टीकोन

आपण सारेच जण दैनंदिन जीवनाच्या रगाड्यात अडकून पडलो आहोत. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आपापल्या कामात आणि चिंतेत व्यस्त असतात. बऱ्याच जणांना वाटत असत, “मला खूप काम आहे”, “मलाच खूप समस्या आहेत”, “माझ्या एवढी मेहनत कोण नसेल करत”, “मलाच कोणी समजून घेत नाही”, “मीच एकटा सगळीकडे मरत असतो”, “माझ्याकडे पैसेच टिकत नाहीत”, “माझं कोणी ऐकूनच घेत नाहीत”, “मला माझ्यासाठी काही करताच येत नाही”, “मलाच सगळे त्रास देतात” इत्यादी. सतत काही ना काही तक्रार किंवा नकारात्मक विचार करण्याची सवय लागलेली असते. आपण किती दुःखी आहोत हेच जणू इतरांना सांगून सहानुभूती मिळवण्याची नकळतपणे सवय लागलेली असते. हे सर्व इतकं अंगात मुरलेलं असत की, त्यामुळे ते स्वतःच कळत नकळत स्वतःच नुकसान करून घेत असतात.

Image result for positive attitude person

खरं पाहता, जगात प्रत्येकालाच काही ना काही समस्या असतात. प्रत्येक जण स्वतःच्या समस्येतून मार्ग काढून आपलं आयुष्य जगत असतो, असं म्हटल्यास नक्कीच वावगं ठरणार नाही. समस्या ह्या प्रत्येकालाच आहेत, त्यामध्ये अडकून न पडता ती सोडवण्यावर भर देणं महत्त्वपूर्ण ठरत. नुसतं तक्रारी करून अथवा नकारात्मक विचार करून आपण अजून नवीन समस्यांना आणि नकारात्मक घटनांना आकर्षित करत असतो.

जे काही घडतंय ते आपण नाही थांबवू शकत, पण जर आपण आपली त्यावरची प्रतिक्रिया जाणीवपूर्वक विचार करून दिल्यास पुढे नक्कीच काहीतरी चांगलं घडू शकत. फक्त तक्रारी केल्याने आपण अजून बिकट परिस्थिती निर्माण करतो. तेच क्षणिक घटनेला बळी पडून आपण नकारात्मकतेने फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण करतो. आणि त्यामध्ये आपण इतके गुंतत जातो की आपणच आपला परतीचा रस्ता आपल्या विचारांनी बंद करून टाकतो.

म्हणूनच कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये गुंतून न पडता, जे काही घडतंय ते स्वीकारून ह्यापुढे आपण काय करू शकतो ह्याचा विचार केला पाहिजे. आहे ती परिस्थिती अथवा समस्येतून तक्रार न करता योग्य मार्ग काढून त्याचा वापर आपल्या ध्येयाप्रती करून घेतला पाहिजे. ह्यासाठी आपल्याला सकारात्मक दृष्टीकोन फायद्याचा ठरू शकतो.

जेव्हा आपल्यावर एखादं संकट येत किंवा समस्या येते, तेव्हा खरं तर आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं. त्या संकटाला अथवा समस्येला न घाबरता त्याचा वापर आपण आपल्या ध्येयाप्रती शिडीसारखा करायला पाहिजे. त्यामुळे आपण आपल्याच मर्यादा ओलांडून यशाची नवीन सीमा गाठायला तयार होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला दृष्टीकोन खूप महत्त्वपूर्ण ठरतो.

जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो. म्हणूनच असं म्हणतात, “कुठलीही परिस्थिती असो, चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि आपल्या कामाला लागा”. आपला सकारात्मक दृष्टीकोनच आपल्याला बिकट परिस्थितीमधून यशस्वीरित्या तारू शकतो आणि आपली कष्टी योग्य मार्गाला लावू शकतो.

आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन अवलंबावा आणि समाधानी आयुष्य जगायला तयार व्हा.

— संकेत प्रसादे

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

2 Comments on सकारात्मक दृष्टीकोन

    • कृपया आपला फोन नंबर देणे. आपल्याला संपर्क करु.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..