नवीन लेखन...

सदगुरुंचा अनुग्रह कोणाला होतो ?

आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात, चांगल्या, वाईट. आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची. आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ?
किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते, संत देखील आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात.

सदगुरुंचा अनुग्रह होणे हि खऱ्या अर्थाने आलेली “जाग” होय. ते साधना सांगतात पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते. प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सदगुरुना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही. असे का ?

सदगुरू कोणावर अनुग्रह करतात, तर ज्याला इच्छा असते त्यावर. ज्याला आपण “आजारी” आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते तो स्वतःहून “डॉक्टरकडे” जातो, “डॉक्टर” स्वतःहून त्याच्या कडे येतो का ?

किंवा “डॉक्टर” जरी “आजारी” माणसाकडे आला आणि त्याची औषध घ्यायची तयारी नसेल तर? म्हणूनच जो जागा होतो, शरणागत होतो, ज्याची तळमळ वाढते त्यालाच सदगुरुंचा “अनुग्रह” लाभतो.

अनुग्रह हा व्हायला लागतो दिला जात नाही. जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सदगुरूंकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने “कृपा”, “अनुग्रह” हे पाप्त होऊ शकते. आणि त्याचा “आनंद” जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून, कृपादृष्टीने होऊ शकतो.

हे दान एवढे मोठे आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्याची उतराई त्यांची कितीही जन्म सेवा केली तरीही होऊ शकत नाही. कृपेचा “आनंद” काय असतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही. ज्याने हा “आनंद” मिळवला आहे तो भाग्यवान, त्याचे जिवन सफल झाले.

सदगुरू हे दिसायला जरी एक देहरुपी असले तरी ते देहातीत असतात, ”गुरु” हे तत्व आहे कोणी व्यक्ती नाही. आपल्याला देहा पलीकडे जाऊन त्या तत्वापर्यंत पोहोचायचे आहे आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग, किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे “सदगुरू” आहेत.

अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्याला आहे. महाभारत युद्धात सुद्धा “कृष्ण” हा सारथी होता, त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते पण त्याने अर्जुनाला सांगितले लढायचे तूच आहेस, मी तुझे सारथ्य करतो, म्हणजेच दिशा दाखवितो.

अर्थात सदगुरुनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे हे केले तर ते सारथ्य करायला तयार असतातच, नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

1 Comment on सदगुरुंचा अनुग्रह कोणाला होतो ?

  1. I agree with the thoughts on Sadguru and anugraha. Without our awakening even the God can’t help us He has prepared a time schedule for all of us and to act on time. If we are lethargic he will try to awake us being a pure kind soul. I do agree there is no peace in materialistic world and one need to have a continuous guidance of sadguru. “Sadguru Vachun daivat nahi”.Thanks for Good thought on Anugraha of Sadguru.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..