नवीन लेखन...

राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम (ध्वजसंहिता)

२६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली. म्हणूनच हा दिवस आपला गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या आपल्या तिरंगी ध्वजाचा मान राखणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने १९५१ मध्ये पहिल्यांदा ध्वजासंदर्भात काही नियम जाहीर केले. १९६४ मध्ये यात बदल करण्यात आले. १७ ऑगस्ट १९६८ मध्ये यात आणखी काही बदल करण्यात आले. ध्वजाचा आकार, निमिर्ती, रंग आदी सर्व सर्वच बाबतीत हे नियम लागू करण्यात आले.
सूर्यांदयाच्या वेळी ध्वजारोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणे कायद्याने बंधनकारक आहे.

काही खास प्रसंगी सार्वजनिक इमारतींवर रात्रीच्या वेळेसही ध्वज फडकावता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा ॲ‍डव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा.

मिरवणुकीच्या वेळेसही राष्ट्रध्वज अग्रभागी असायला हवा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंदीय मंत्री आदी महत्त्वाच्या व्यक्तींच्याच गाडीवर राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. अन्य कोणालाही आपल्या गाडीवर ध्वज लावता येत नाही. तसेच राजकीय महत्त्वपूर्ण व्यक्ती परदेशात जात असल्यास त्या विमानावर राष्ट्रध्वज लावता येतो. महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यास ध्वज अर्धवट उतरवण्यात येतो. ध्वज खराब झाल्यास तो जमिनीखाली पुरून किंवा जाळून नामशेष करावा लागतो, पण त्या वेळीसुद्धा त्याचा यथोचित मान राखायला लागतो. एकंदरच निमिर्तीपासून शेवटापर्यंत आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मंत्रालय आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरच सगळ्यात मोठे झेंडे फडकताना दिसतात.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..