नवीन लेखन...

कॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा

रॉक्सी सिनेमा हे कॅनडामधील जुन्या चित्रपटगृहांपैकी एक सिनेमागृह आहे. तसं पहायला गेलो तर कॅनडात Ice Hockey, Niagara Falls सारख्या अनेक प्रसिद्ध गोष्टी आहेत पण इथली नाट्यगृह, चित्रपटगृह एका वेगळ्याच धाटणीने बांधलेली असतात. अशा चित्रपटगृहात चित्रपट पहायला मजा का नाही येणार?

इतिहास :

हे थिएटर १९३० साली बांधण्यात आले. या थिएटरचे बांधकाम विनिपेगच्या रॉथस्टीन थिएटरने केले होते. १९७४ पर्यंत तेच थिएटरचे मालक होते. १९६० ते १९७० च्या पूर्वार्ध काळापर्यंत या थिएटरला कोरोनेट असे नाव होते. पुढे याच दशकाच्या दरम्यान ते ओडियनला भाड्याने देण्यात आले. काही काळाने रोकेमाय थिएटर्स (Rokemay Theatres) नामक संस्थेने ते चालवायला घेतले. जेव्हा या संस्थेने कार्य करण्यास सुरुवात केली त्यावेळी याचे नाव टॉवने सिनेमा (Towne Cinema) असे झाले. ३० मे १९८० रोजी दुसर्‍या इमारतीत दुसरी स्क्रीन जोडण्यात आली. १९७४ – २००५ सालापर्यंत हे थिएटर रोकेमाय थिएटर्सच्या मालकीचे होते. १९८६ – १९९५ हे थिएटर सिनेप्लेक्स ओडियनला भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आले. १९९५ साली हे थिएटर तोपर्यंत बंद झाले, जोपर्यंत रेनबो सिनेमा संस्थेने त्याला विकत घेतलं नाही.

सध्या थिएटरचा अंतर्भाग स्पॅनिश व्हिल्यासारखा सजवण्यात आलेला आहे. इथल्या भिंती लहान बाल्कनीज, खिडक्या व टॉवर्सनी सुशोभित करण्यात आलेल्या आहे. या एकंदरीत सुशोभीकरणामुळे थिएटरला स्पॅनिश खेड्याचा अवतार प्राप्त झालेला आहे. रात्रीच्या गडद आभाळाचा भास होण्यासाठी प्रेक्षागृहातील छत गडद निळ्या रंगाने रंगवलेले असून चांंदण्यांचा भास निर्माण करण्यासाठी चमकणारे दिवे लावलेले आहेत. मुख्य स्क्रीनची आसन क्षमता ४७८ आसनांची असून दुसर्‍या स्क्रीनची आसन क्षमता १४० आसनांची आहे. या थिएटरचं नाव एका सुप्रसिद्ध रेडिओ व्यक्तीमत्व रॉक्सी रोथाफेल यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.

हे थिएटर उत्तर अमेरिकामध्ये बांधले गेलेले सर्वात मोठं सर्वप्रथम वातानुकुलित थिएटर आहे.

कॅनडामध्ये जेव्हा जाल तेव्हा या थिएटरला आवर्जून भेट द्या.

पत्ता : 320 20th St West Saskatoon SK S7M 0X2 

संपर्क : (३०६) ६६५-०५५२

— आदित्य दि. संभूस (कलाकर, दिग्दर्शक, लेखक)

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..