नवीन लेखन...

गृहनिर्माण संस्थेतील सदस्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेचे हस्तांतरण अधिनियमाबाबत

सोशल मिडिया वर सारखे फॉरवर्ड केले जाणाऱ्या मेसेज मध्ये वरचा क्रमांक लागतो तो “गृहनिर्माण संस्थेत सदस्याच्या मृत्युनंतर हितसंबधाचे हस्तांतरण कसे करावे ” यात अनेक व्यक्ती चुकीचा सल्ला देतात. त्यांना कायद्याचे पुरेसे ज्ञान नसते आणि माहीत नाही हे सांगायला कमीपणा वाटतो. नेहमी कायदेतज्ञ यांचा सल्ला देऊन कागदपत्र केलेले कधीही चांगले. फास्ट फूडची चटक असल्याने सर्व फास्ट करण्यासाठी कायदेतज्ञ यांच्याकडे न जाता गुगलवर शोधून निर्णय घेणारे महाभाग आजही कमी नाहीत असो. आज वरील विषयावर आपणास खालील लेखात माहिती दिली आहे.

वरील विषय समजण्यासाठी अधिनियमातील सुधारणेपुर्वी कलम ३० आणि नवीन सुधारणेनंतर कलम १५४बी-१३ समजणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० हा कायदा सर्व सहकारी संस्थाना लागू होतो. २०१९ च्या नवीन सुधारणे नंतर कलम ३० महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्थांना २०१९ पासून लागू नाही. तर काय फरक आहे हे जाणून घेऊ.

कलम ३०(१)

संस्थेचा एखादा सदस्य मरण पावला असता, संस्था अशा मृत सदस्याचा भाग किंवा हितसंबध नियमानुसार नामनिर्देशित केलेल्या एका किंवा अधिक व्यक्तींकडे किंवा अशारितीने कोणतीही व्यक्ती नामनिर्देशित केलेली नसेल तर, जी व्यक्ती मृत सदस्याचा वारस किंवा कारादेशीर प्रतिनिधी आहे, असे समितीस वाटेल त्या व्यक्तीकडे हातांतरित करील:

परंतु, अशी नामनिर्देशित व्यक्ती वारस किंवा यथास्थिती, कायदेशीर प्रतिनिधी संस्थेचा यथोचितरित्या दाखल करून घेतलेला सदस्य असावा:

आणखी असे की, या पोटकलमातील किंवा कलम २२ मधील कोणत्याही गोष्टीमुळे अज्ञानी किंवा विकलमनस्क व्यक्तीस वारसाने किंवा अन्यथा मृत सदस्याचे संस्थेतील कोणतेही भाग किंवा हितसंबध संपादन करण्यास प्रतिबंध होणार नाही.

कलम १५४बी-१३

संस्थेच्या एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यावर, संस्था त्या संस्थेमधील मृत सदस्याच्या मालमत्तेचा भाग, हक्क, मालकी हक्क व हितसंबंध मुत्युपत्रीय दस्तऐवजाच्या किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्राच्या किंवा कायदेशीर वारसदारी प्रमाणपत्राच्या किंवा ज्या मृत सदस्याची मालमत्ता वारसाने मिळण्यास हक्कदार असतील अशा व्यक्तींनी निष्पादित केलेल्या कुटुंब व्यवस्था दस्तऐवजाच्या आधारे एखाद्या व्यक्तीकडे किंवा व्यक्तींकडे अथवा नियमानुसार रीतसर नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीकडे हस्तांतरीत करण्यात येईल:

परंतु, संस्था, एखाद्या सदस्याच्या मृत्युनंतर, कायदेशीर वारसाला किंवा वारसांना किंवा उत्तराधिकार कायद्यानुसार अथवा मृत्युपात्रान्वये जी त्या सदनिकेची आणि भागांची हक्कदार असेल अशा व्यक्तीला अशा मृत सदस्यांच्या जागी सदस्य म्हणून दाखल करून घेइपर्यंत, नामनिर्देशिताला तात्पुरता सदस्य म्हणून दाखल करून घेईल:

परंतु आणखी असे की, कोणतीही व्यक्ती अशाप्रकारे नामनिर्देशित केलेली नसेल तर, समितीला विहित केल्याप्रमाणे मृत सदस्याचा वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधी असल्याचे दिसून येईल अशा व्यक्तीला संस्था तात्पुरता सदस्य म्हणून दाखल करून घेईल.

वरील दोन्ही कलम वाचल्यावर असे दिसून येते की, कलम ३० प्रमाणे मृत सदस्याच्या मालमत्तेचा भाग, हक्क, मालकी हक्क व हितसंबंध नामनिर्देशित केलेली व्यक्ती (Nominee) याला हस्तांतरीत करणे. तर कलम १५४बी-१३ प्रमाणे मृत सदस्याचे वारस (Legal Heirs) यांना हस्तांतरीत करणे आणि जोपर्यंत दाखला मिळत नाही तो पर्यत नामनिर्देशित व्यक्तीला तात्पुरता सदस्य (Provisional Member) म्हणून दाखल करून घेणे.

– अ‍ॅड. विशाल लांजेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..