नवीन लेखन...

एका आठवड्यात २ किलो वजन कमी करा

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=3V30OXklYCo[/embedyt]

 

ज्यांना वजन घटवण्याची आवश्यकता आहे अशांनी रेग्युलर व्यायाम आणि नियंत्रित आहाराचे नियम काटेकोर पाळले तर आठवडय़ात एक ते दोन किलो वजन सहज घटवू शकाल. त्यापेक्षा अधिक वजन कमी होणं म्हणजे अतिरिक्त चरबी (फॅट) कमी होण्यापेक्षा स्नायूंची झीज घडवतं. ते आरोग्याला अपायकारक ठरू शकतं. पंधरा दिवसांत ४ किलो कमी करण्यासाठी दोन आठवडय़ांच्या योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. प्रत्येकाच्या शरीराची जेनेटिक रचना आणि चयापचय शक्ती वेगळी असते हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच ठरावीक कालावधीत एका व्यक्तीचं वजन लगेच घटेल, पण दुसऱ्याचं कमी होणार नाही. तसंच थायरॉइड आणि हॉर्मोन्सच्या पातळ्यांवरही वजन घटणं अवलंबून असतं. व्यायाम आणि आहाराच्या घालून दिलेल्या नियमांचं जितक्या योग्य प्रकारे पालन कराल तितके चांगले निकाल मिळतील.

वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. मात्र घाबरण्याचं कारण नाही. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता. वाढलेले वजन हा मुळातच अनेकांच्या चिंतेचा विषय असतो. त्यातल्या त्यात स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास असतोच. वजन कमी करण्याचे अनेक मार्ग आहेत.शरीरातले पाणी कमी केले तर वजन कमी होते. शरीरातल्या स्नायुंचा आकार प्रथिने कमी करून कमी केला तर वजन कमी होते.किंवा शरीरातील मेद किंवा चरबी कमी केली तर वजन कमी होते. वजन मुद्दाम कमी करणे हे आरोग्यासाठी चांगले असते. आजारपणात वजन कमी झालेले आरोग्यासाठी चांगले नसते.

तुम्हाला जो योग्य आणि सोयीस्कर वाटेल तो कोणताही व्यायाम केला तरी वजन कमी होते. पण सर्वात चांगला व्यायाम म्हणजे चालण्याचा व्यायाम आहे. त्याने वजन तर कमी होतेच शिवाय सांधेही मोकळे होतात, रक्ताभिसरण सुधारते. पण चालण्याचा व्यायाम म्हणजे रमतगमत चालणे नव्हे. भरभर चालावे. थोडास दम लागायला हवा आणि थोडासा घाम यायला हवा. वजन घटवण्यापेक्षा इंच लॉस किंवा चरबी घटवणं अधिक महत्त्वाचं आहे. वजनात स्नायू, अवयव, हाडं आणि चरबी यांचा समावेश होतो. त्यातली अतिरिक्त चरबी घटवणं हाच उद्देश इंच लॉसमध्ये असला पाहिजे.

— Sanket

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..