खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं
विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी ||

चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले
दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले ||

नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी
समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी ||

आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता
पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता ||

काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति,  देखील ती
नाव प्रभुचे त्या वातावरणी,  कुणी न घेती ||

प्रेमळ त्याचा स्वभाव असूनी,  चित्त तयाचे स्वछंदी
रहात होता सुंदर बंगलीं,  अतिशय आनंदी ||

छंद तयाला फुलझाडांचा,  बाग केली छान
विविधतेची झाडे झुडपे,  दिसे शोभावान ||

दिवसभराचे कष्ट करुनी,  फुलवित असे बाग
सुवास सारा दरवळूनी,  डोलती तेथे नाग ||

पक्षी आणि प्राणी जमवूनी,  संग्रहालय दिसले
आवाजांचे सूर निघूनी मग,  मधूर ते भासले ||

मोर नाचे थुई थुई तेथे, नभी येता ढग
आनंदाला सिमा पडेल,  कशी तेथे मग ||

सारे होते नयन मनोहर,  त्या वातावरणीं
संबोधित होता त्या वास्तूला  “निसर्ग ” तो म्हणूनी ||

वेड लागुनी तन्मय झाला,  सौंदर्याच्या ठायीं
निसर्गातील रस सदैव,  शोषित तो राही ||

नास्तिक तो अन् ईश्रर नसे, ही त्याची धारणा
परि तोच भासला खरा आस्तिक समरस होतांना ||

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1585 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…