मैनेचे मातृहृदय

आम्रवनांतील शोभा बघत,   भटकत होतो नदी किनारी
मैनेची ती ओरड ऐकूनी,   नजर लागली फांदीवरती…१

एक धामण हलके हलके ,  घरट्याच्या त्या नजीक गेली
पिल्लावरती नजर तिची,  जीभल्या चाटीत सरसावली…२,

मैनेच्या त्या मातृहृदयाला,  पर्वा नव्हती स्वदेहाची
जगावयाचे जर पिल्लासाठी,  भीती न उरी ती मृत्यूची…३

युक्त्या आणि चपळाईने,  तुटून पडली त्या मृत्यूवरी
रक्त बंबाळ ते केले शरीर,  चोंच मारीत धामणीवरी….४

अखेर धामण वृक्ष सोडते,  जखमी होवूनी शरिराने
पिल्लामध्ये बसूनी मैना,   शांत करिते हृदय स्पंदने

डॉ. भगवान नागापूरकर
३०९- १८०६८४

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1528 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…