नवीन लेखन...

भूक न लागण्याची कारणे

भूक न लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे ही तक्रार अनेक वेळा केली जाते. भूक न लागण्यामागे काही आजारच असेल असेही नाही. दैनंदिन तणावामुळेदेखील एखाद्या वेळेस भूक लागत नाही. भूक न लागणे हा प्रकार बहुतेक सर्वांबरोबरच कधी ना कधी होतो. काही दिवसांसाठी असं होणं हे सामान्य आहे मात्र अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे. भूक न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अगदी शारिरीक जडणघडणीपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होतो. भूक न लागण्याच्या समस्येकडे जास्त काळ दूर्लक्ष केल्यास शरिरावर त्याचे दिर्घकालीन परिणाम होऊ शकतात.


पचनक्षमता जर योग्य पद्धतीने कार्य करत नसेल तर भूक न लागण्याची शक्यता असते. अशा वेळी काही नैसर्गिक उपायांनी या समस्येपासून सुटका होऊ शकते.अनियमित दिनक्रमाचा परिणाम थेटपणे आपल्या आरोग्यावर पडतो. दिवसभरात जर कमीत कमी सहा तास झोप घेतली नाही तर दिवसभर सुस्ती येते, चिडचिड वाढते आणि थकवा येतो. तसेच भूक न लागण्याची तक्रार सुरू होते. कारण पचनशक्‍तीत झालेल्या गडबडीमुळे ही समस्या उद्भवते. नैसर्गिक उपाय वापरून या समस्येपासून सुटका मिळवता येते.

लोक जाणूनबुजून आपल्या आहारावर दुर्लक्ष करतात , पण अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे लोक आपला आहार योग्य वेळेवर घेऊ शकत नाहीत, कोणाला आपल्या कामामुळे योग्य वेळेवर आहार घेता येत नाही तर कोणाला आपल्या पोटाच्या समस्येमुळे आहार घेता येत नाही. मित्रांनो भोजन हे आपल्या साठी सर्वात महत्वाचे आहे.

भूक न लागण्याची कारणे

1) तुम्ही आजारी असताना शरिरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचा जास्त वापर होत असतो. त्यामुळे भूक कमी लागते किंवा लागतच नाही. मात्र अशा परिस्थितीमध्ये भूक न लागणे हे इंडिकेशन असते की शरिराला आरामाची गरज आहे. मात्र आजारी असताना अधूनमधून थोडं खालल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

2) कावीळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. यापैकी काही विषाणंमुळे विशेषत: हिपॅटायटिस ए या विषाणूच्या संपर्काने होणा-या कावीळमुळे भूक न लागण्याचा त्रास जाणवतो.

3) अनेक औषधांमुळे कमी भूक लागते. साध्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही डिप्रेशन, मायग्रेन, उच्च रक्तदाब, अनेक वर्षांपासूनचे आजार, फुफ्फुसांसंदर्भातील आजार आणि पार्किन्सन संदर्भातील औषधे घेत असाल तर तुमची भूक मरते.

4) जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण असेल तर तुमच्या हृदयाची धडधड आपोआपच वाढते आणि पचनक्रीया मंदावते. त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही.

5) व्यक्तीच्या शारीरिक हालचाली, व्यायाम, खेळ, ऋतू, त्याची मानसिक स्थिती इ. गोष्टींवर भूक लागणं न लागणं अवलंबूृन असतं. आजकाल पाव-बिस्किटांचा अतिरेकी वापर, कॅटबरी, चॉकलेट यासारखे पदार्थ, थंड पदार्थ अन् थंड पेय यांची सवय, भेळ, फरसाण, वेफर्स यांसारख्या पदार्थांचा वापर आणि मैद्याचे पदार्थ यामुळे पोट साफ होत नाही अन् भूक लागत नाही.

6) मधुमेहावर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढल्याने रक्त वाहून नेणाऱ्या नसांवर परिणाम होऊ शकतो. अशावेळेस सर्वाधिक ज्या नसांवर परिणाम होतो त्यापैकी एक नस म्हणजे पोटातील स्नायूंना रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करणारी. कोणत्याही कारणाने या नसेच्या कार्यावर परिणाम झाल्यास अन्ननलिकेतून अन्नपदार्थ सामान्य गतीने पुढे सरकरण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे भूक कमी लागते.

अगदी शारिरीक जडणघडणीपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होतो. भूक न लागण्याच्या समस्येकडे जास्त काळ दूर्लक्ष केल्यास शरिरावर त्याचे दिर्घकालीन परिणाम होऊ शकतात म्हणूनच आपण वेळीच ह्याकडे लक्ष्य दिले पाहिजे.

Sanket

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..