राजमाता कैकयी

अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला  ।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला   ।।धृ।।

जेव्हां दशरथ युद्धास जाई  ।
कैकयी त्याच्या सेवेत राही  ।।
राजनीति अन् युद्धनीति ही  ।
अवगत झाली सारी तिजला   ।।१।।

चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला

नजीकच्या त्या देशामधूनी  ।
रावणादी असुरी शक्ती वाढूनी  ।।
सामान्य जनाला जर्जर करुनी  ।
हा हाः कार तो माजविला   ।।२।।

चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला

परिस्थितीला जाणून घेतां  ।
केवळ चौदा वर्षाकरीता  ।।
राम वनी तो पाठवी माता  ।
तोड नसे त्या दूरदृष्टीला   ।।३।।

चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला

माता आणि राजधुरंदर  ।
दुहेरी भूमिका ही शिरावर  ।।
निर्णय घेऊनी अतिशय खडतर  ।
इतिहास जिने घडविला   ।।४।।

चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

रावणवृत्ती महा असूरी  ।
नष्ट केली तिनेच खरी  ।।
मार्ग निवडले जरी कांटेरी  ।
यशस्वी केले रामप्रभुला   ।।५।।

चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

धाडीला नसतां राम वनीं  ।
मारीला असता रावण कुणी ?
स्वतःचे शिरीं कलंक घेवूनी  ।।
धरणीवरचा पाप भार रोकला   ।।६।।

चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1508 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…